भारतीय पारंपरिक वस्त्रोद्योग पर्यावरणपूरक आहे. आपल्या कापडाची ख्याती विदेशातील हायफॅशनपर्यंत पोचली आहे. भारतीय पारंपरिक वस्त्रोद्योग आणि कला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेणाऱ्या काही तरुण डिझायनर्सपैकी एक आहे मराठमोळी डिझायनर वैशाली शडांगुळे. गेल्या आठवडय़ात रंगलेल्या न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये वैशालीची डिझाइन्स भाव खाऊन गेली. या वर्षी वैशालीसोबत आंचल सुखियाचं ज्युलरी कलेक्शनही लक्षवेधी ठरलं. टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवण्याची कार्यशाळा आपल्यापैकी अनेकांनी शालेय जीवनात एकदा तरी अनुभवली असेल. याचे कधी घरगुती प्रयोगही झाले असतील. पण याचा वापर चक्क न्यूयॉर्क फॅशन वीकच्या आंतरराष्ट्रीय रॅम्पवर झाला आणि तोही या भारतीय ज्युलरी डिझायनरकडून. स्क्रबर, वॉशर पाइप्स, प्लम्बिंगसाठी वापरले जाणारे पाइप्स, पायपुसणी, ए.सी.साठी वापरले जाणारे फिल्टर फोम अशा कल्पनेपलीकडच्या वस्तू वापरून तिने दागिने केले आहेत.

Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
Academic difficulties Psychological assessment Career counseling
ताणाची उलगड: स्वत:ला स्वीकारा

न्यूयॉर्क फॅशन वीक ऑटम/ िवटर २०१७ मध्ये वैशालीनं सादर केलेल्या कलेक्शनचं नाव ‘चातक’ असं होतं. सलग दुसऱ्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये वैशालीचं कलेक्शन सादर झालं. इंटरनॅशल रॅम्पवर तिनं कॉटनसह खादीला आणलं आणि सस्टेनेबल फॅशनचं खणखणीत उदाहरण जगासमोर ठेवलं. आपल्या कलेक्शनबद्दल लोकसत्ता ‘व्हिवा’शी बोलताना डिझायनर वैशाली म्हणाली, ‘चातक पक्षी पावसाची आतुरतेने वाट बघत असतो आणि केवळ पावसाच्या पाण्यानेच आपली तहान भागवतो. त्याप्रमाणे कोणत्याही डिझायनरसाठी आपलं कलेक्शन तयार होत असतानाची प्रोसेस ही चातकासारखीच असते. आपल्याला हवी तशी डिझाइन्स जोवर तयार होत नाहीत तोपर्यंत कोणताही डिझायनर समाधान मानत नाही. मनस्वी डिझाइन्स हीच या वर्षीची थीम होती.’

भारतीय फॅब्रिक्स परदेशातही वाखाणली जातात. न्यूयॉर्कमध्ये सादर झालेल्या माझ्या ‘चातक’ या कलेक्शनमध्ये खादीचा वापर होता. फॅब्रिकपासून डिझाइन्स तयार होतानाची प्रोसेस हीच माझी प्रेरणा होती. म्हणून मी कलेक्शनला चातक नाव दिलं.

वैशाली एस., डिझायनर