नामांकित ब्रॅण्ड्सच्या जन्माची, साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेणारं हे सदर.

ब्रँड्स केवळ उत्पादन तयार करीत नाहीत तर ते विश्वास निर्माण करतात. ते उत्पादन हेच एक विशेषण होऊन जातं. टायरच्या विश्वाचा विचार करता अन्य कोणतंही नाव भारतीयांसमोर येतच नाही. टायर म्हणजे एमआरएफ.

loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
According To Rohit Shikhar And Rishabh Are Dirty
VIDEO : रोहितने सांगितलं ‘या’ दोन क्रिकेटपटूंसह कधीच रूम शेअर करणार नाही; म्हणाला, “ते दोघे राहतात अगदी गचाळ…’
korean skincare, K-beautyUnlock the secrets
तुम्हालाही हवीये Glass skin? कोरियन लोकांच्या सौंदर्याचे काय आहे रहस्य? तज्ज्ञांनी सांगितल्या टिप्स
Habit of chewing gum is good or not for health know drawbacks and benefits
च्युइंगम खाताय? च्युइंगम खाण्याचे तोटे वाचून बसेल धक्का; ही सवय तात्काळ सोडा, अन्यथा..

ज्या कंपन्या भल्या मोठय़ा गुंतवणुकीने सुरुवात करीत नाहीत, तर छोटय़ा छोटय़ा पायऱ्या घेत पुढे येतात, अनेकदा भविष्यात त्यांचा पैस विस्तारलेला दिसतो. एमआरएफची कहाणीदेखील अशीच आहे.

भारत स्वतंत्र होण्याच्या अगदी एक वर्ष आधी १९४६ साली के.एम.माम्मेन मपिल्लाई या नवउद्योजकाने खेळण्यातल्या फुग्यांचा उद्योग एका छोटय़ाशा शेडमध्ये सुरू केला. चेन्नईमधल्या तिरुवोट्टीयार इथल्या या कारखान्यात मशिन्सची वानवा होती. तरीही फुगे, इंडस्ट्रियल ग्लोव्हज, गर्भनिरोधक उत्पादनं इथे तयार होत होती. १९५२ मध्ये या छोटय़ाशा उद्योगाने वाहनांच्या चाकावर बसवण्यात येणाऱ्या ट्रेड रबरच्या उत्पादनात शिरायचं ठरवलं. त्यासाठी रबर मिलची पहिली मशीन फॅक्टरीत आली.

एका छोटय़ाशा उद्योगाने मारलेली ही उडी मोठीच होती. पाहता पाहता चार वर्षांत कंपनीने ट्रेड रबर बनवण्याच्या उद्योगातला ५०% वाटा हस्तगत केला. एमआरएफ अर्थात मद्रास रबर फॅक्टरीचे नाव सर्वदूर झाले. त्यानंतर कंपनीचा आलेख चढताच राहिला. इतका की, काही परदेशी कंपन्यांना त्यामुळे भारतातून गाशा गुंडाळावा लागला. १९६४ साली भारतातर्फे एमआरएफच्या माध्यमातून पहिल्यांदा टायर्सची परदेशात निर्यात झाली. आणि इथे जन्म झाला एमआरएफच्या मसलमॅनचा. अवजड टायर आपल्या मजबूत पीळदार हातांनी उचलून धरणारा तो मसलमॅनचा लोगो सोबत पाहताना टायर म्हणजे एमआरएफ आणि एमआरएफ म्हणजे मजबुती हे समीकरण जुळले.

एमआरएफने १९४६ साली अवजड ट्रकसाठी मजबूत टायर्सचं उत्पादन सुरू केलं. चारचाकी असो वा दुचाकी किंवा दूरदूरच्या दुर्गम भागात पोहोचणारे ट्रक, या साऱ्यांचे पाय एमआरएफमुळे भक्कम झाले. १९८९ मध्ये एमआरएफने एका वेगळ्या क्षेत्राकडे पावलं वळवली. अमेरिकेतील हॅसबो इंटरनॅशनल या विख्यात खेळण्यांच्या कंपनीशी हातमिळवत त्यांनी ‘फनस्कूल इंडिया’ हा ब्रँड आणला.

१९९३ मध्ये के.एम. मपिल्लाई यांना उद्योग-व्यवसायातील भरीव कामगिरीसाठी पद्मश्री हा सन्मान मिळाला, तर २०१४ मध्ये जगभरातील टायर्स बनवणाऱ्या कंपन्यांत एमआरएफने १५ वा क्रमांक पटकावला आणि २०१५ मध्ये फोर्ब्स मासिकाच्या यादीत भारतातील सर्वोत्तम पन्नास ब्रँडमध्ये स्थान मिळवले. आतापर्यंत उद्योग क्षेत्रातील अतिशय सन्मानाचा जे डी पॉवर पुरस्कार एमआरएफने एक-दोन नव्हे तर तब्बल १२ वेळा पटकावला आहे. मोटर स्पोर्ट्स दुनियेतही हा ब्रँड नामांकित आहे. शिवाय फॉम्र्युला रेसिंग स्पर्धाचं आयोजनही त्यांनी केलेलं आहे.

एमआरएफची टॅगलाइन आहे tyres with muscles. त्या मसलमॅनकडे पाहताना आणि एकूणच गाडीचालकांचा अनुभव ऐकता एमआरएफची ही टॅगलाइन सार्थकी ठरते. संपूर्ण भारतातल्या रस्त्यांचा स्वभाव लक्षात घेता त्यानुसार आपला दणकटपणा दाखवणारे हे टायर्स सर्वसामान्यांच्या कुतूहलाचा भाग नसले तरी फिरत्या चाकावरती ज्यांचं जीवन अवलंबून आहे अशा ड्रायव्हर्सकरिता तो अतिशय महत्त्वपूर्ण हिस्सा आहे.

एका छोटय़ाशा खोपटापासून इतका मोठा व्यवसाय विस्तारण्याची स्वप्नं पाहणाऱ्या मपिल्लाई यांच्या दृष्टीला खरंच सलाम करावासा वाटतो. आपल्या आयुष्यात कोणत्या संधी हुकल्या, कशा अडचणी आल्या याचे पाढे वाचत आपल्या अयशस्वीपणाची कारणं देणारे, अनेक असतात. पण स्वातंत्र्योत्तर उद्यमशील भारताच्या उद्योग-व्यवसायात आपलं भरीव योगदान देऊन उत्पादनाच्या जोडीने एक विश्वास बांधून ठेवणारे फारच कमी.. के. एम. मपिल्लाई हे त्यातलंच एक नाव!

आदर्शाच्या शोधात असलेल्या नवतरुण पिढीसमोर पडद्यावर चकाकणारे सिनेस्टार जितक्या प्रभावीपणे येतात तितकी ही खऱ्याखुऱ्या स्टार्सची नावं का येत नाहीत बरं? ती आली पाहिजेत. तरच पुढची पिढी घडेल.. अगदी एमआरएफ टायर्ससारखीच! मजबूत, विश्वासार्ह आणि न थकता चालत राहणारी!

viva@expressindia.com