नोकरीपेक्षा स्वतचा व्यवसाय करायचा हे उराशी बाळगलेलं स्वप्न अमेरिकेत गेल्यानंतर पूर्ण करणारी बिझनेस वुमन शीतलच्या कॉर्पोरेट अनुभवाविषयी..

क्षेत्र कोणतंही असो, आज पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियाही प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. देश असो अथवा परदेश, आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्या अथक परिश्रम घेताना दिसतात. आपला स्वतचा व्यवसाय असावा, उद्योजिका व्हावं, असं स्वप्न अनेक जणी पाहतात. पण अनेकींच्या बाबतीत काही कारणांनी ते राहून जातं. इच्छा आणि जिद्द यांच्या जोरावर तुम्ही कुठंही असलात तरी तुम्ही तुमची स्वप्नं प्रत्यक्ष जगू शकता, हे अमेरिकेतील तरुण उद्योजिका शीतल कुलकर्णीकडे बघून कळतं. लहानपणापासून मुंबईत वाढलेली मध्यमवर्गीय शीतल.. जिने कधी मुंबईबाहेर जावं लागेल असा विचारदेखील केला नव्हता, ती आज अमेरिकेत राहून स्वतचा व्यवसाय सुरू करून विस्तारत आहे. एल. एस. रहेजा महाविद्यालयामधून आíकटेक्चरची पदवी तिने घेतली आणि मनात स्वतचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न तयार होत असतानाच लग्न झालं मग वयाच्या पंचविसाव्या वर्षी ती आपल्या नवऱ्यासोबत अमेरिकेला गेली. सुरुवातीस केवळ एका वर्षांसाठी जायचं म्हणून दोघे अमेरिकेत गेले होते. पण नंतर संधी मिळाली आणि आता दोघे तिथेच स्थायिक झाले आहेत. तिथे गेल्यानंतर काही महिन्यांतच शीतल तिथल्या एका नावाजलेल्या आíकटेक्चर आणि डिझाईन कंपनीत कामाला लागली. काही र्वष तिने प्रोजेक्ट आíकटेक्ट आणि त्यानंतर डिझाइन प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून एका स्टेज डिझाईन कंपनीत काम केलं. नोकरी सुरू असली तरी मनात एक स्वतंत्र उद्योजिका बनण्याचं स्वप्न तिनं कायम उराशी बाळगलं होतं. ते स्वप्न तिला स्वस्थ बसू देईना. तिच्या इच्छेला नवरा जयदीप याचा पूर्ण पािठबा होता.

शीतल आíकटेक्ट आणि डिझायनर असल्याने मग ‘बजेट ब्लाइंड’ या प्रसिद्ध कंपनीची फ्रँचायझी घेण्याचं तिने प्रथम ठरवलं. त्यानुसार रीतसर अ‍ॅप्लाय करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोन ठिकाणी म्हणजे- मिनिआपॉलिस आणि सेंट पॉल फ्रँचायजी घेण्याचं ठरलं. त्यासाठी शीतल ‘बजेट ब्लाइंड’च्या कॅलिफोíनयाच्या मुख्य ऑफिसमध्ये जाऊन आवश्यक प्रशिक्षण घेऊन आली. त्यानंतर ती सर्टफिाइड फ्रँचायजी ओनर आणि व्यावसायिक म्हणून काम करू लागली. सध्या ती ‘इन्स्पायर्ड आऊटलुक’ या कंपनीची व्यवस्थापक म्हणून तसेच बजेट ब्लाइंड ऑफ नॉर्थवेस्ट मेट्रोचं काम पाहते. व्यवस्थापनाच्या कामाबरोबर स्वतच्या कंपनीची पूर्णवेळ प्रिन्सिपल स्टाइल कन्सल्टंट म्हणूनही ती काम करते.

‘‘नवीन लोकांना भेटायला मला आवडतं. त्यांच्या गोष्टी, अनुभव ऐकून मी स्वत समृद्ध होते. त्यांच्या स्वप्नातल्या घराला स्वतच्या डिझाइन्सचा टच देऊन त्यांचं स्वप्नातलं घर त्यांना देण्याचा माझा प्रयत्न असतो. नवरा आयटी कंपनीमध्ये नोकरी करतो आणि वीकएण्डला मला व्यवसायात मदत करतो.’’ असंही शीतल आवर्जून सांगते.

गेली बारा र्वष ती अमेरिकेत स्थायिक असली तरी अजून भारताशी जोडलेली नाळ घट्ट आहे. उऌअठउए फाऊंडेशन ही सेवाभावी संस्था ती आणि तिचे पती चालवतात. या संस्थेच्या माध्यमातून ती भारतातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणाचं कार्य करते. त्यासाठी अमेरिकेतील मित्रमंडळींकडून निधी जमा करते. याविषयी सांगताना शीतल म्हणाली, ‘‘एक आई म्हणून मला कायमच असं वाटत की, जगात अशी बरीचशी मुलं आहेत, ज्यांना चांगलं आयुष्य जगायची संधीदेखील मिळत नाही. मी अशा एखाद्या मुलाच्या आयुष्यात जरी काही फरक आणू शकले तर मी माझं आयुष्य सार्थकी लागलं असं मी समजेन.’’

करिअर सांभाळून ती आपल्या घराकडे, गौतम आणि सिद्धार्थ या जुळ्या मुलांकडे लक्ष देते. शिवाय आपल्या आवडीनिवडीही तिने जोपासल्या आहेत. ‘डान्स इंडिया डान्स’मध्ये तसेच ‘नॉर्थ अमेरिका मॉम २०१४’ मध्ये ती सहभागी झाली होती. सध्या ती नेहा दामले यांच्यासोबत ‘लव्ह स्टोरी.. दिलसे’ या म्युझिकल प्रॉडक्शनसाठी नृत्य प्रशिक्षक आणि क्रिएटिव्ह हेड म्हणून काम पाहत आहे. तसेच तिला कविता लिहिण्याची, ब्लॉग लिहिण्याची आवड आहे. आता तिने स्वतच्या हॅण्डमेड ज्वेलरी डिझाईन सॅफ्रोन पोइस या नावाने सुरू केलं आहे. फावल्या वेळात ती तिच्या डिझाईन निर्मिती करते. गेली दहा र्वष गौरी-गणपतीची प्रतिष्ठापना करते आहे व आपली संस्कृती तिथेदेखील जपत आहे. देशाबाहेर असली तरी देशाविषयीची, मुंबईविषयीची ओढ असल्याचं व ‘‘तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे राहता, यापेक्षा तुमच्याकडे जे सर्वोत्कृष्ट आहे ते तुम्ही जगाला द्या आणि तसेच सर्वोत्कृष्ट तुम्हाला आयुष्याकडून मिळेल,’’ असं शीतल सांगते.

कोमल आचरेकर