News Flash

‘कट्टा’उवाच : बूमरँग आणि जीआयएफ

बूमरँगच्या जवळपास असणारी काहीशी जास्त तांत्रिक भाषेतली गोष्ट म्हणजे ‘जीआयएफ’.

बूमरँग जीआयएफ

वेदवती चिपळूणकर

पूर्वीच्या काळी.. म्हणजे खूप खूप खूप पूर्वीच्या काळी.. जेव्हा माणूस जनावरं मारून खात असे, तेव्हा शिकारीसाठी सोयीची अशी अनेक हत्यारं तो बनवत असे. एक वापरून झिजलं की दुसरं हत्यार, दुसरं झिजलं की तिसरं अशी वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं वेगवेगळ्या प्रकारच्या जनावरांच्या शिकारीसाठी बनवली जात असत. त्यातच ‘बूमरँग’ नावाचं एक हत्यार त्या काळातल्या माणसाने तयार केलं होतं जे पूर्णत: फिजिक्सच्या आधारावर बनलेलं होतं. सावजाला मारून ते परत शिकाऱ्याकडे येईल अशा पद्धतीने त्याचं डिझाइन होतं. जितक्या वेळा ते दूर फेकलं जाईल, जितक्या जोराने फेकलं जाईल तितक्या वेगात ते परत यायचं. सध्याच्या इन्स्टाग्रामने आणलेल्या ‘बूमरँग’ या फीचरचं नामसाधम्र्य या प्राचीनकाळच्या हत्याराशी जोडता येईल.

इन्स्टाग्रामच्या ‘बूमरँग’मध्ये मोजून ३ सेकंदांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला जातो आणि व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झालेली एकच एक कृती, एकदा सुलट एकदा उलट अशी परत परत प्ले होत राहते. एक सरळ चालणारा माणूस हा बूमरँगमध्ये एकदा दोन पावलं पुढे टाकतो, एकदा मागे टाकतो, परत पुढे टाकतो, परत मागे टाकतो.. अशी दोन-तीन आवर्तनं झाली की हा बूमरँग व्हिडीओ संपतो. आधी हा व्हिडीओ फक्त इन्स्टाग्रामवर बनवता यायचा, मात्र नंतर इन्स्टाग्रामने स्वत:चं बूमरँग अ‍ॅप तयार केलं. केलेली कृती उलटसुलट आणि परत परत दिसण्यामुळेच कदाचित या फीचरचं नाव बूमरँग ठेवलं असावं.

याच बूमरँगच्या जवळपास असणारी काहीशी जास्त तांत्रिक भाषेतली गोष्ट म्हणजे ‘जीआयएफ’. ‘ग्राफिक्स इंटरचेंज फॉरमॅट’ असा ‘जीआयएफ’चा फुलफॉर्म आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीने तर ‘जीआयएफ’ला क्रियापद म्हणून मान्यता दिली आहे आणि त्याचा डिक्शनरीत समावेश केला आहे. जीआयएफ बनवणे हाच ‘टू जीआयएफ’ या व्हर्बचा अर्थ ऑक्सफर्डमध्ये सांगितला आहे. १९८७मध्ये अस्तित्वात आलेल्या या जीआयएफला प्रसिद्धी मात्र आताच्या काही वर्षांत तेही सोशल मीडियामुळे मिळाली. जीआयएफ आणि बूमरँग यातला मुख्य फरक म्हणजे बूमरँगमध्ये एखादी कृती उलट आणि सुलट अशी दोन्ही पद्धतीने घडते आणि जीआयएफमध्ये मात्र तीच कृती त्याच क्रमाने फक्त पुन:पुन्हा घडत राहते. जीआयएफ बनवताना अ‍ॅनिमेशनही वापरता येऊ  शकतं, मात्र बूमरँगमध्ये प्रत्यक्ष रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओचाच वापर करता येतो. त्यामुळे अनेकदा जीआयएफ हे तांत्रिकदृष्टय़ा वरचढ मानलं जातं.

जीआयएफसाठी मात्र थोडे जास्त कष्ट पडत असल्याने आणि काही वेगळी, जास्त टेक्निकल सॉफ्टवेअर्स वापरावी लागत असल्याने तरुणाईमध्ये बूमरँगच जास्त प्रसिद्ध आणि लाडकं आहे. सुरुवातीला नुसतीच कशाचीही बूमरँग करणारी तरुणाई आता मात्र तिथेही आपली क्रिएटिव्हिटी अर्थात कल्पनाशक्ती वापरू लागली आहे !

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 1:09 am

Web Title: instagram releases boomerang as a gif maker
Next Stories
1 ‘जग’ते रहो : थोडासा ‘ओमानी’ हो जाए
2 ब्रॅण्डनामा : रिबॉक
3 ‘पॉप्यु’लिस्ट : कोरसमधला रांगडा स्वरपट
Just Now!
X