News Flash

इव्हान्काचा अडीच लख्खा!

इव्हांकाने परिधान केलेल्या ‘एम्बब्लिश्ड ब्लॅक जॅकेट’ची किंमत एक हजार २९८ डॉलर म्हणजेच ८३ हजार ५३२ रुपये आहे.

राजकन्या दिसण्याचा नव्हे तर असण्याचा मोह परिकथांनी प्रत्येक ललनेला छकुलीपणापासून घालून दिला असला तरी राजघराणी-परीकथा ओसरलेल्या आजच्या काळात ती मनोपूर्ती होण्याची शक्यता कधीच नसते. पण अमेरिकी राष्ट्राध्यक्षांची लाडकी कन्यका इव्हान्का ट्रम्प हिची भारतभेट राजकन्या दिसण्याची आजच्या फॅशन तंदुरुस्त तरुणींची इच्छा मात्र तातडीने पूर्ण करणारी ठरली आहे. भारतभेटीत तिने परिधान केलेल्या वस्त्रांचे प्रतिरूप अमेरिकी संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध असून त्यांची किंमत ‘केवळ’ अडीच लाख रुपये आहे.

अमेरिकेतील ‘नेट-ए-पोर्टर’ या संकेतस्थळावरील या वस्त्रविक्रीच्या वृत्ताने इव्हान्का ट्रम्प यांच्या आधीच चर्चेत असलेल्या सेलिब्रिटीपदामध्ये आणखी भर पडली आहे. वस्त्र-आभूषणांच्या बाजारात गेल्या काही वर्षांमध्ये तारांकित व्यक्तींनी ल्यायलेल्या वस्त्रांचे ब्रॅण्ड रुजत आहेत. त्यामुळे जागतिक पातळीवर वस्त्रे आणि आभूषणे तयार करणाऱ्या फॅशन डिझायनर्सची नावे गाजत आहेत. अर्डेम मोरालिओग्ल या कॅनडामधील फॅशन डिझायनरने इव्हान्काचा भारतभेटीतील पहिल्या दिवशीच्या उद्योजक परिषदेत वावरण्यासाठीचा संपूर्ण पेहराव डिझाइन केला होता. हैदराबाद शहराचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेऊन त्याची आखणी करण्यात आली होती. त्यानंतर फॅशन शिखरांवर वावरणाऱ्या विविध ड्रेस डिझायनर्सनी मांडलेल्या वस्त्रप्रावणं लेवून ही राजकन्या भारतीय माध्यमांसमोर दोन दिवस दिमाखात मिरवत होती.

राजकन्येची वस्त्रभूषणे

‘फ्लोरल प्रिंटेड जिनेव्हा कटआऊट प्लेटेड जॅक्वार्ड मिडी ड्रेस’ या नावाची फोड केल्यानंतर त्यावर असलेल्या देश प्रभावाचा आणि आकाराचा अंदाज आला असेल. हा ड्रेस ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याची किंमत ३०२०.५० डॉलर इतकी म्हणजेच दोन लाख २८ हजार ४६० रुपये आहे. अर्डम मोरालिओग्लू यांची ही वस्त्र कलाकृती ऑनलाइन पाहण्यास मोफत पण खरेदीस वाजवी किंमत देऊन घेता येणार आहे. ऐतिहासिक आणि कलात्मक गोष्टींना वेळोवेळी आपल्या फॅशनचा भाग करणाऱ्या इव्हान्काने ताज फालुकानामा पॅलेसमध्ये धातूचे सुंदर नक्षीकाम असलेला ‘अलाईस ड्रेस’ परिधान केला होता. हा ड्रेस अमेरिकेत शैलीदार वस्त्रप्रावरणे तयार करणाऱ्या टोरी ब्रच यांनी तयार केला होता. त्याची किंमत ३,४९८ अमेरिकन डॉलर अर्थात २ लाख २५ हजार ११३ रुपये इतकी आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी इव्हांकाने ‘अ‍ॅण्डी हाय नेक शॉर्ट स्लीव्ह फ्लोरल प्रिंट लाँग ड्रेस’ परिधान केला होता. यातील वैशिष्टय़पूर्ण लाल रंगाच्या ड्रेसमध्ये इव्हांकाचे राजकन्यापण उठून दिसत होते. हा ड्रेस बर्गडॉफ गुडमॅन या संकेतस्थळावर ७९५ अमेरिकन डॉलर म्हणजेच ५१ हजार १६२ रुपयांना उपलब्ध आहे. हा ड्रेस सलोनी लोधा या लंडनस्थित भारतीय फॅशन डिझायनरने बनवून दिला आहे. इव्हांकाने परिधान केलेल्या ‘एम्बब्लिश्ड ब्लॅक जॅकेट’ची किंमत एक हजार २९८ डॉलर म्हणजेच ८३ हजार ५३२ रुपये आहे. हा ड्रेसही टोरी ब्रच यांनीच डिझाइन केला आहे. इव्हांकाच्या प्रत्येक ड्रेसमध्ये तिची भारतीय संस्कृतीबद्दल असलेली आवड डोकावत होती. प्रत्येक ड्रेसवर असलेल्या फुलांच्या नक्षीपासून ते नाजूक भारतीय शैलीचे कशीदा काम लक्ष वेधून घेत होते.  इव्हांकाने फॅशनच्या माध्यमातून भारतीयांवर छाप पाडण्यासाठी केलेला प्रयत्न आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनी उच्चरवात व्यक्त केला. काही वृत्तवाहिन्यांनी या वस्त्रांमध्ये मिरवणाऱ्या राजकन्येचा लाइव्ह टीव्ही शो गाजविला तर बहुतांश वृत्तपत्रांची पहिली पाने तिच्या देखण्या वस्त्रछबींनी नटवण्यात आली होती. या पेहरावामधून भारताच्या प्राचीन आणि श्रीमंत संस्कृतीचे दर्शन घडल्याचे भारतीय फॅशनतज्ज्ञांचे म्हणणे होते.

ड्रेसमध्ये काय?

संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ड्रेसच्या कपडय़ामध्ये पॉलिस्टर आणि सिल्कचा वापर करण्यात आला आहे. हा ड्रेस तयार करताना त्यामागच्या संकल्पनेमागची प्रेरणा विशद करण्यात आली आहे. त्या प्रत्येक ड्रेससोबत कोणती आभूषणे जोडता येतील त्यांचीही  किमतीसकट माहिती देण्यात आलेली आहे. हा ड्रेस अमेरिकेच्या संकेतस्थळावर असला तरी भारतात मागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रक्रियेचीही माहिती त्यात देण्यात आली आहे.

अर्डमची जादू..

गेली दहा वर्षे अर्डम मोरालिओग्लू फॅशन जगतामध्ये स्थिरस्थावर असलेले नाव आहे. नुकतेच त्यांनी उघडलेल्या लंडनमधील राजबिंडय़ा फॅशन स्टोअरची चर्चा या क्षेत्रात भरपूर गाजली. त्यांच्या वस्त्रकलेमध्ये तुर्की आणि ब्रिटिश कलांचा प्रभाव मोठय़ा प्रमाणावर दिसतो. काही दिवसांपूर्वी त्यांनी तयार केलेल्या ‘फॉल १७’ कलेक्शनवर अठराव्या शतकातील सुलतानी परंपरेतील वस्त्र आभूषणांचा पगडा होता. इव्हान्काच्या ‘फ्लोरल प्रिंटेड जिनेव्हा कटआऊट प्लेटेड जॅक्वार्ड मिडी ड्रेस’ यामध्ये काळ्या रंगांचे दागिने आणि इतर आभूषणांचा समावेश करण्यात आला होता. ज्यामुळे अर्डेमच्या वस्त्रकलेची जादू इव्हान्का जगभरावर पाडत होती.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 12:55 am

Web Title: ivanka trump dress ivanka trump india tour
Next Stories
1 कल्लाकार : संवेदनांचा कोलाज
2 आऊट ऑफ फॅशन : जांभूळ आख्यान
3 ब्रॅण्डनामा : नॅचरल आइस्क्रीम
Just Now!
X