फॅशनजगतातला महत्त्वाचा सोहळा म्हणजे लॅक्मे फॅशन वीक नुकताच पार पडला. या सोहळ्यात अनेक डिझायनर्स येतात. नवनवे ट्रेंड आणतात. कलेक्शनमधून नवे प्रयोग होतात. एकूणच फॅशनविश्वातली ही एक मोठीच उलाढाल असते. यंदाही अनेक नवनवे ट्रेंड्स सेट झाले आहेत. याच ट्रेंडी फॅशनविषयी..

रंग

Agreli
जपानच्या चलनाचा कच्चा माल पुरवतो हिमालयाच्या कुशीतला ‘हा’ देश!
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?
92 crores recovered from the implementation of Mumbai Maharera orders
मुंबई महारेराच्या आदेशांच्या अंमलबजावणीतून ९२ कोटींची वसुली
Holi 2024 Follow these skincare and haircare doctor tips to preserve radiance and health during celebrations
रंगपंचमीच्या रंगांपासून त्वचा अन् केसांची काळजी कशी घ्याल? डॉक्टरांनी सुचवले ‘हे उत्तम उपाय

फॅशनमधला हा महत्त्वाचा घटक. या रंगामुळे अनेकदा फॅशन फसते किंवा खूूपच उठावदार होते. लॅक्मे फॅशन वीकमध्ये यंदा अनेक रंग पाहायला मिळाले. फिकट रंगाच्या कलर पॅलेटपासून ते गडद रंगाच्या विविध छटांपर्यंत सगळेच रंग रॅम्पवर अवतरले होते. फिकट रंगांत गुलाबी, तपकिरी, पोपटी, चंदेरी, निळा असे अनेक रंग ट्रेंडमध्ये आहेत. तर गडद रंगांमध्ये प्रामुख्याने काळा, चॉकलेटी, लाल, सोनेरी, मेहंदी असे रंग ट्रेंडमध्ये आहेत. आपण कपडे निवडताना किंवा घालताना नेहमी विरुद्ध रंगाची निवड करतो. पण यंदा हे समीकरण थोडं बदललंय. उदा. जर टॉप फिकट हिरवा, पोपटी असेल तर त्यावर गडद हिरवा स्कर्ट घालता येईल. सेम सेम रंगच ट्रेंडमध्ये आहेत. म्हणजेच एकाच रंगाच्या फिकट आणि गडद छटा वापरून ट्रेंडी लुक मिळवता येतो. गणपती तर संपले, पण नवरात्र तोंडावर आलंय. नंतर दिवाळी आहेच. एकूणच सणांची सुगी सुरू झालीय. या वेळी शक्यतो आपण काळा रंग टाळतो. पण यंदा काळ्याची सर्वात जास्त चलती आहे. रॅम्पवर यंदा  पारंपरिक  कपडय़ांवर काळ्या रंगाची जादू दिसली. फॅशन डिझायनर सुनीता शंकर, अमित अग्रवाल, जयंती रेड्डी यांच्या कलेक्शनमध्ये काळा रंग प्रामुख्याने बघायला मिळाला.

प्रिंट

कोणत्याही प्रिंटमुळे कापडाला नवीन लुक मिळतो. मोठय़ा बोल्ड प्रिंटपासून ते अगदी लहानशा बुट्टीमुळेसुद्धा गारमेंटचा चेहरामोहरा बदलतो. यंदा रॅम्पवर सगळ्या आकारातल्या प्रिंट दिसल्या. फॅशन डिझायनर अजय कुमार यांच्या कलेक्शनमध्ये अ‍ॅनिमल प्रिंटचा वापर केला होता. पांढऱ्या रंगाच्या पाश्र्वभूमीवर रंगीबेरंगी प्राण्यांच्या पक्ष्यांच्या प्रिंटने हे कलेक्शन खुलून दिसलं. तर गौरांग शहा यांच्या ‘चित्रावली’ या कलेक्शनमध्ये मानवी आकृत्या, फुलं, पानांच्या प्रिंट बघायला मिळाल्या. अजंता लेण्या, १८व्या शतकातील कलाकुसर आणि मधुबनी पेंटिंग अशा प्रकारचे अनेक प्रिंट्स अनाविला, नेहा अग्रवाल, मसाबा, राहुल मिश्रा अशा अनेक डिझायनरच्या कलेक्शनमध्ये बघायला मिळाल्या. तर काहींच्या कलेक्शनमध्ये पारंपरिक हँड ब्लॉग प्रिंट्ससुद्धा बघायला मिळाल्या. त्यामुळे यंदा या प्रिंट्स ट्रेंडमध्ये आहेत.

एम्ब्रॉयडरी

यंदा रॅम्पवर एम्ब्रॉयडरी केलेले कपडे तसे कमी बघायला मिळाले. ज्या कापडांवर हे केलं होतं ती हलकी एम्ब्रॉयडरी होती. त्यामुळे यंदा अशाच सुटसुटीत एम्ब्रॉयडरीचा ट्रेंड आहे. अनाविला, निकिता सिंग, शैलेश सिंघानिया अशा काही डिझायनरने त्यांच्या कलेक्शनमध्ये लाइट थ्रेड वर्क आणि हलकेसे जरी वर्क केलं होतं. तर सोनम आणि पारस मोदी, मनीष मल्होत्रा, अम्होघ, फाल्गुनी शेन यांसारख्या डिझायनरच्या कलेक्शनमध्ये जरीवर्कसोबत छोटे मणी, सिक्वेन्स आणि टॅसलचं काम पाहायला मिळालं. यंदा एम्ब्रॉयडरीऐवजी जास्त वापर टॅसलचा झाला आहे. सध्या ते खूपच ट्रेंडमध्ये आहे. अगदी कपडय़ांपासून ते दागिने, चप्पल, बॅगा सगळीकडे याचीच चलती आहे.

सिल्वेट्स

यंदा रॅम्पवर कट्सची जादू चांगलीच चालली. अगदी सगळ्याच फॅशन डिझायनरच्या कलेक्शनमध्ये कट्सचा कलात्मक वापर दिसून आला. नॉर्मली साइड कट, फ्रंट हे दोनच प्रकार आपल्याला माहिती आहेत. पण यंदा हाताच्या बाह्यांवरती कट्स, क्रॉस कट्स, क्रॉप टॉपला ऑफ फ्रंट कट्सपासून ते तळाला खालच्या बाजूला कट्स असे अनेक प्रकार ट्रेंडमध्ये होते. यासोबतच रॅम्पवर लेअरिंगही पाहायला मिळालं.  लेदर, नेट, टिशू फॅब्रिकचे जॅकेट्स ट्रेंडमध्ये होते. बाह्यांमध्ये फुग्यांच्या बाह्या, संपूर्ण लांब बाह्या, मध्यम आकाराच्या थ्री फोर्थ, कफ्तानी स्टाइल, ट्रम्पेट, किमोनो, लेग ऑफ मटन, बिशप, बेल अशा प्रकारांचा बोलबाला होता. ओव्हर साइज म्हणजे थोडय़ाशा ढगळ कपडय़ांचा ट्रेंड यंदाही कायम आहे. अगदी फिटिंगचे कपडे कधी कधी आपला वावर अडचणीचा करतात, अशा वेळी हे जरा अघळपघळ कपडे बरे पडतात. आगामी सणासुदी, लग्नसराई या सगळ्या धम्माल माहोलात यंदा मिक्स अँड मॅचचा ट्रेंड असणार आहे. ब्लाउजऐवजी साडीसोबत क्रॉपटॉप, लाँग ब्लाउज, जॅकेट ब्लाउज, लाँग कुर्त्यांवर स्कर्ट, ए लाइन फॉर्मल पँटवर फ्रंट कट कुर्ते हे मिक्स अँड मॅचचे प्रकार ट्रेंडमध्ये आहेत. यासोबतच वर्षांनुर्वष चालत आलेले लेहेंगा चोली, अनारकली, जम्प सूट्स या गोष्टीही ट्रेंडी आहेतच.

viva@expressindia.com