20 September 2018

News Flash

ये रेशमी जुल्फे..

‘लॅक्मे फॅशन वीक’च्या या सीझनमध्ये विशेषकरून केशरचनेवर जास्त भर देण्यात आला होता.

वर्षांतून दोनदा होणाऱ्या ‘लॅक्मे फॅशन वीक’चा ‘समर रिसॉर्ट २०१८’ हा सीझन नुकताच पार पडला. आपल्या प्रत्येक सीझनमधून वर्षभराचे ‘ट्रेण्ड’ ठरवणारा भारतातला हा सगळ्यात मोठा फॅशन वीक मानला जातो. प्रत्येक वेळी कोणत्या तरी एका बाबतीत काही हटके करून ते लोकप्रिय करण्यात ‘लॅक्मे फॅशन वीक’चा मोठा वाटा असतो. अ‍ॅक्सेसरीजपासून ते चपलांपर्यंत दर वेळी कोणत्या तरी एका गोष्टीवर विशेष फोकस करून त्यात काही तरी वेगळे ट्रेण्ड्स आणले जातात. या वेळी केशरचनेचे भन्नाट ट्रेण्ड्स पाहायला मिळाले.

HOT DEALS
  • BRANDSDADDY BD MAGIC Plus 16 GB (Black)
    ₹ 16199 MRP ₹ 16999 -5%
    ₹1620 Cashback
  • ARYA Z4 SSP5, 8 GB (Gold)
    ₹ 3799 MRP ₹ 5699 -33%
    ₹380 Cashback

‘लॅक्मे फॅशन वीक’च्या या सीझनमध्ये विशेषकरून केशरचनेवर जास्त भर देण्यात आला होता. समर सीझन असल्याने बन्स, अर्थात ज्याला आंबाडा म्हणतात अशा मोकळ्या केशरचनांनी रॅम्पवर लक्ष वेधून घेतलं. अनेक डिझायनर्सनी कपडय़ांच्या डिझाइन्ससोबतच हेअरस्टाइलची विशेष काळजी घेतलेली दिसली. वधूने केस मोकळे सोडण्याच्या जुन्या ट्रेण्डला मागे सारत ब्रायडल डिझाइन्सवरही केसांचे वेगवेगळ्या प्रकारचे बन्स आणि विशेषकरून वेण्या अशा हेअरस्टाइल्स या वेळी डिझायनर्सनी रॅम्पवर आणल्या. केसांमध्ये खोटय़ा केसांच्या रंगीत बटवेण्या गुंफून त्यांची वेणी किंवा बन बांधण्याचा प्रयोगही या वेळी यशस्वीरीत्या करण्यात आलेला पाहायला मिळाला.

बॉयकट आणि बॉबकट असलेल्या केसांपासून ते मोकळ्या सोडलेल्या लांबसडक केसांपर्यंत सर्वाना फ्लॉन्ट करता येतील असे हायलाइट केलेल्या केसांचे ‘हेअरकलर ट्रेण्ड्स’ या वेळी ‘लॅक्मे सॅलोन’ने रॅम्पवर आणले. ध्रुव कपूर आणि रागिणी आहुजा यांनी त्यांच्या डिझाइन्ससोबतच ‘लॅक्मे सॅलोन’च्या मदतीने ‘लॅक्मे सॅलोन फ्री स्पिरिट्स’ हा शो सादर केला ज्यात कपडय़ांच्या डिझाइन्ससोबतच त्यांना साजेशी हेअरस्टाइल आणि कलर किंवा हायलाइट्सचाही प्रभावीपणे वापर केला गेला होता. ‘या हेअरट्रेण्ड्सना सांभाळणं थोडं कठीण असलं तरी उन्हाळ्याच्या दृष्टीने हेअरकट केला गेला तर कोणत्याही लुकला सहज शोभून दिसतील अशा पद्धतीने हे ट्रेण्ड्स डिझाइन केलेले आहेत. लाल आणि निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमधून तयार झालेले हे हेअरट्रेण्ड्स मजेण्टा, ज्वेल टोन अशा शेड्समध्ये पार्टीवेअर आणि ऑफिसवेअर अशा दोन्हीवर सहजपणे फ्लॉन्ट करता येतील,’ असं लॅक्मे सॅलोन हेअरच्या नॅशनल क्रिएटिव्ह डायरेक्टर हीना दळवी यांनी सांगितलं. ‘साधासा बन बांधून पुढचे केस बॅक-कोंबिंग करून पिन्सनी कन्फर्म करून मेसी बन ही हेअरस्टाइल कोणालाही सहजपणे करता येईल,’ अशी टीपही हीना दळवी यांनी दिली. कोणत्याही आऊ टफिटवर केसांचं काय करायचं हा प्रश्न सतावणाऱ्या सगळ्यांना या ‘लॅक्मे फॅशन वीक’ने नक्कीच नवीन कल्पना दिल्या आहेत.

viva@expressindia.com

First Published on March 2, 2018 12:34 am

Web Title: lakme fashion week summer resort 2018 fashion trends