प्रशांत ननावरे

जुन्या-नव्या मुंबईचा उत्तम मिलाफ पाहायचा असेल तर मुंबईच्या उपनगरातील वांद्रय़ाला पर्याय नाही. नेहमीच गर्दीत हरवलेल्या वांद्रय़ाच्या पोटात जितकं आत शिराल तितकी त्याची शांतता आणि सौंदर्य मन मोहून टाकतं आणि आपण मुंबईतच आहोत ना, असा प्रश्न आपल्याला पडतो. सायन आणि वांद्रे पलीकडील शहर १९५१ नंतर मुंबईमध्ये अधिकृतपणे समाविष्ट झालं. अशा प्रकारे मुंबई बेट, पूर्व आणि पश्चिम उपनगरे मिळून बृहन्मुंबई बनली. प्रशासनासाठी त्यांच्यातील भौगोलिक दुरावा दूर झाला तरी प्रत्येकाची सामाजिक-सांस्कृतिक गुणसूत्रे ठसठशीत होती आणि आजही आहेत.

Why was business women Truong My Lan sentenced to death for corruption in Vietnam
भ्रष्टाचाराबद्दल उद्योजिकेला थेट फाशीची शिक्षा… व्हिएतनाममधील घटनेने जगभर खळबळ का उडाली? तेथे मृत्युदंडाचे प्रमाण इतके अधिक का?
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’
after germany us reacts to arvind kejriwal s arrest
अन्वयार्थ : अस्थानी त्रागा..
India is the third most polluted country in the world What are the potential dangers of this
विश्लेषण : भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश! यातून कोणते धोके संभवतात?

वांद्रय़ाचा इतक्या ठळकपणे उल्लेख करण्याचं कारण म्हणजे केवळ मुंबईच नव्हे तर देशातील सर्वोत्कृष्ट बिर्याणी जिथे मिळते त्यापैकी एक रेस्टॉरंट वांद्रय़ात आहे. वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला अवघ्या दोनशे मीटर अंतरावर एस. व्ही. रोडच्या जंक्शनला असलेलं ‘लकी रेस्टॉरंट’ हेच ते ठिकाण. खरं तर रेस्टॉरंटच्या नावावरूनच त्या जंक्शनला ‘लकी जंक्शन’ म्हटलं जातं. काळाप्रमाणे कात टाकलेल्या ‘लकी’ची आज मुंबईतील उंची रेस्टॉरंटमध्ये गणना होत असली तरी त्याचा आजवरचा प्रवास मोठा रंजक आहे.

नाक्यावर असलेलं हे रेस्टॉरंट म्हणजे एकेकाळचा इराणी कॅ फे. इराणमधील  एका प्रांतातून भारतात आलेल्या स्थलांतरितांमध्ये सय्यद अली अकबर हुसैनी हे देखील होते. १९०० मध्ये जन्माला आलेले सय्यद अवघ्या बाराव्या वर्षी म्हणजेच १९१२ मध्ये मुंबईत दाखल झाले. सुरुवातीला सय्यद आपल्या मोठय़ा भावासह मदनपुरामध्ये चहा आणि ब्रून मस्का विकत असत. काही काळानंतर ते पुण्याला गेले, पण लगेचच मुंबईत परतले आणि वांद्रय़ाच्या बाजारात त्यांनी छोटेखानी ‘बॉम्बे रेस्टॉरंट’ सुरू केलं. सय्यद अली नेहमी वांद्रे स्टेशनवर उतरून बाजारात आपल्या रेस्टॉरंटमध्ये चालत जात असत. त्याकाळी वांद्रे फार गजबजलेलं नव्हतं. एके दिवशी आज ज्या ठिकाणी ‘लकी रेस्टॉरंट’ आहे त्या जंक्शनला त्यांनी नवी इमारत पाहिली. त्या इमारतीच्या तळमजल्यावर मोटार शोरूम होतं. सय्यद अलींना ती जागा रेस्टॉरंटसाठी योग्य वाटली. त्यांनी जागेविषयी मालकांकडे चौकशी केली. स्वातंत्र्यपूर्व काळात मोटारींचा धंदा काही तेजीत नव्हता. ती जागा भाडय़ाने द्यायला मालक तयार झाले. सय्यद अली यांनी लगेचच १६५ रुपयांप्रमाणे तीन महिन्यांचं भाडं आगाऊ  दिलं आणि ९ सप्टेंबर १९३८ साली ‘लकी रेस्टॉरंट’ सुरू झालं.

इराणी चहा, कॉफी, बन मस्का, ब्रून मस्का, ऑम्लेट, समोसा, खिमा पाव, मटन चॉप्स, दाल आणि बिर्याणी असे हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच पदार्थ सुरुवातीला इथे मिळत असत. आज ‘लकी’च्या मेन्यूमध्ये तीनशेहून अधिक पदार्थ आहेत. ‘लकी’ देखील एकेकाळी स्टोअर होतं. रोजच्या वापरातील वस्तू आणि औषधंही इथे मिळायची. ‘लकी’च्या भिंतीना असलेल्या काचा, लाकडी खुच्र्या आणि लाकडी टेबलावर अंथरलेल्या टेबलक्लॉथवर ठेवलेली काच इराणी कॅ फेच्या आठवणी आजही जागृत करतात. कॅ फे सुरू करण्यापूर्वी इराणी लोक चोर बाजारात जात आणि तिथून वस्तू खरेदी करत असत. भिंतींना बेल्जियम मिरर, झेकोस्लोव्हाकीयाच्या मजबूत आणि टिकाऊ  लाकडी खुच्र्या असा इराणी कॅ फेचा थाट असे. वडिलांप्रमाणेच वयाच्या दहाव्या वर्षी सफर अली यांनी या व्यवसायात उडी घेतली. सफर अली यांनी वांद्रय़ाच्या नॅशनल कॉलेजमधून विज्ञान शाखेत पदवी संपादन केली आणि त्यानंतर पूर्णवेळ रेस्टॉरंटमध्ये लक्ष घातलं. अनेक इराणी कॅ फे पार्टनरशीपध्ये चालत असत, पण ‘लकी’ची मालकी पहिल्यापासूनच एकाच म्हणजे हुसैनी कुटुंबीयांकडे आहे. १९८४ साली सफर अली यांचा मुलगा मोहसिन याने ‘लकी’ची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि व्यवसायाचा विस्तारही करायला सुरुवात केली. अठ्ठय़ाहत्तर वर्षीय सफर अली आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत शिरले आहेत.

काही दशकांपूर्वी वांद्रेकरांसाठी ‘लकी’ म्हणजे विरंगुळ्याचं ठिकाण होतं. लोक इथे बसून चहा पीत, गप्पा ठोकत असत. ‘लकी’चा चहा इतका प्रसिद्ध होता की एक गृहस्थ दादरवरून वांद्रय़ाला टॅक्सीने येत आणि चहा पिऊन परत जात असत, अशी आठवण सफर अली सांगतात. त्याकाळी रात्री उशिरापर्यंत दुकानं उघडी असत. ‘लकी’ जंक्शन हे महत्त्वाच्या व्यक्तींना पाहण्याचं ठिकाण होतं. महात्मा गांधी, पोप, पंडित जवाहरलाल नेहरू या रस्त्यावरून जाताना त्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी उसळली होती असं सफर अली सांगतात.

इराणी-मोगलाई पद्धतीची दम बिर्याणी ही लकीची खासियत आहे. ‘लकी’ सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून इथे बिर्याणी मिळते. त्यामुळे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध आणि जुन्या बिर्याणीमध्ये तिचा समावेश होतो. पूर्वी मोठय़ा भांडय़ांमध्ये भट्टीवर तयार केली जाणारी बिर्याणी आता गॅसवर शिजवली जाते एवढाच काय तो बदल इतक्या वर्षांत झालेला आहे. ती बनवण्याची पद्धत आणि त्यामध्ये वापरले जाणारे पदार्थ यामध्ये काडीमात्रही बदल झालेला नाही. बिर्याणी बनवणं, सव्‍‌र्ह करणं आणि खाणं देखील एक कला आहे, असं सफर अली म्हणतात. बिर्याणी खाताना त्यासोबत चटणी किंवा रायत्याची आवश्यकता भासायला नको, असं त्यांना वाटतं. तो एक परिपूर्ण आहार आहे आणि आम्ही गेली अठ्ठय़ात्तर वर्षे ती तशीच तयार करत आहोत, असं ते मोठय़ा आत्मीयतेने सांगतात. दिवसातून दोन वेळा इथे चिकन आणि मटन बिर्याणी तयार केली जाते. दिलीपकुमार, सचिन तेंडुलकर, शाहरूख, सलमान आणि विविध क्षेत्रांतील मंडळींच्या आवडत्या पदार्थामध्ये ‘लकी’च्या बिर्याणीचा समावेश होतो.

‘लकी’मध्ये आजही इराणी चहा, कॅरेमल कस्टर्ड मिळतं, पण इराणी कॅ फे संकल्पनेच्या पलीक डे आता या व्यवसायाचा विस्तार झालेला आहे. मुंबई बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना राहण्यासाठी हॉटेल, फास्ट फुड जॉइंट, आइसक्रीम पार्लर, पार्टी हॉल, ग्रार्डन सिटिंग, वॉलेट पाìकग अशा सुविधाही आता ‘लकी’ पुरवतं. सय्यद अली यांना नशिबाने ही जागा मिळाली म्हणूनच त्यांनी त्याचं नामकरण ‘लकी’ असं केलं होतं. आज इतक्या वर्षांनंतरही मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर ‘लकी’चं भाग्य उजळलेलं आहे. एकेकाळी मुंबईचं वैभव असणारे इराणी कॅ फे परिस्थितीशी जुळवून घेता न आल्याने बंद पडले. पण ‘लकी’ने बदलत्या परिस्थितीसोबत स्वत:लाही बदललं आणि शहराच्या पाठीवर वेगळं अस्तित्व निर्माण केलं. नावात काय आहे, असा सवाल इंग्लंडमधील थोर साहित्यिक व कवी विल्यम शेक्सपिअर यांनी सोळाव्या शतकात विचारला होता, पण नावात बरंच काही दडलेलं असतं हे शेक्सपियरसाहेबांना ‘लकी’ला भेट दिल्याशिवाय कळणार नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

viva@expressindia.com