ऋतू बदलतो तशी आपल्याकडे फॅ शन बदलते. थंडीतले स्वेटर, उन्हाळ्यातले सनग्लासेस आणि पावसात रेनकोट.. बाजारात दुकानांबाहेर लटकणाऱ्या वस्तू बदलल्या की आपल्याला त्या मोसमातील फॅ शनची जाणीव होते. मात्र हल्ली फॅ शनसाठी कायम तयारीत असणारे बाजारात काय आलंय याची वाट पाहात बसत नाहीत. चपलांच्या बाबतीत जशा ऑल सीझन चपला मिळतात. तशी ऑल सीझन फिट होईल अशी मिक्समॅच फॅ शन सध्या ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील फॅ शन पूर्णपणे बाजूला टाकण्याऐवजी त्यात छोटे-मोठे बदल करून या पावसाच्या सरीतली आपली फॅ शन कशी करता येईल, याचा हा अंदाज..

पाऊस म्हटला की छत्री, रेनकोट, चपला या गोष्टी प्रामुख्याने येतात. या तिन्हींचे ट्रेंड्स दरवर्षी फार बदलतात असं नाही. छत्र्या आणि रेनकोट्समध्ये प्रिंट्सचं, साईझचं, रंगांचं वैविध्य असू शकतं. त्यातही गेल्या काही वर्षांत फ्रिलवाल्या छत्र्या, कधी पर्समध्ये मावतील इतक्या छोटय़ा तर कधी मोठी मूठ असलेल्या उंच, मजबूत छत्र्या वेगवेगळ्या प्रिंट्स आणि रंगात पाहायला मिळतात तीच गोष्ट चपलांची.. चपलांच्या बाबतीतही सँडल्स, खास पावसाळी शूजचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे यावरच आपली फॅ शन केंद्रित न करता कपडे कोणते वापरता येतील, त्यांचे रंग-प्रिंट्स यातले वैविध्य कशा प्रकारचे असेल, त्यावरचे दागिने आणि मेकअपमध्ये कोणत्या नवीन गोष्टी पाहायला मिळतील, याची माहिती घेऊन खास आपली फॅ शन तुम्हाला ठरवता येईल.

life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा

रंग

उन्हाळ्याची सुरुवात होताना बाजारात पेस्टल शेड्स ट्रेंडमध्ये होत्या. पिंक, ब्लू हे रंग आणि त्यांच्या शेड्स ट्रेंड इन होत्या. अनेक आऊटफिट्समध्ये पेस्टल शेड्स वापरात होत्या. पिंक आणि ब्लू हे रंग स्त्री व पुरुष दोघांच्याही आऊटफिटमध्ये दिसून आले. ‘ब्लॅक अँड व्हाइट’सुद्धा खूप वापरले गेले. या वर्षी ‘ग्रीनरी’ हा पेंटोन कलर ऑफ द इयर २०१७ म्हणून निवडला गेला आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात ग्रीन शेड्स अनेक वेगवेगळ्या पद्धतीने कपडय़ांपासून चपलांपर्यंत दिसून येऊ शकतात. तसेच निसर्गापासून प्रेरणा घेऊन अनेक रंग म्हणजेच ब्राऊन, ग्रे, ब्लू, यल्लो यांच्या शेड्स आऊटफिट्समध्ये दिसू शकतील. पावसाळ्यात बरेचदा कपडे खराब होतात. त्यामुळे पेस्टल शेड्स किंवा सटल लाइट शेड्स टाळण्याकडे कल असतो. मात्र त्याऐवजी या रंगांच्या बरोबरीने डार्क शेड्समध्ये ऑलिव्ह ग्रीन, चेरी रेड, नेवी ब्लू, मरून, मार्सला यांचा जास्त वापर होऊ शकेल.

पिंट्र

आत्तापर्यंत कलरफुल पिंट्र्स, फ्लोरल पिंट्र्स, भौमितिक आकारांचे पिंट्र्स आणि पेस्ट्ल शेड्स यांची सांगड घातली गेली होती. अशा पिंट्र्समुळे आऊटफिट्सना अत्यंत फ्रेश लूक मिळतो. त्यामुळे पावसाळ्यातसुद्धा हेच फ्लोरल पिंट्र्स किंवा नसíगक घटकांचे पिंट्र्स ट्रेंड इन असू शकतात. याच्या बरोबरीने िवटेज पिंट्र्स किंवा अँटिक पिंट्र्स ट्रेंडमध्ये येऊ शकतात. फळांचे, पानांचे पिंट्र्स युनिक पद्धतीने सादर केलेले आऊटफिट्सही ट्रेंडमध्ये आहेत.

आऊटफिट

नेहमी वापरण्यासाठी सध्या रीब्ड जीन्स आणि त्याबरोबर क्रॉप टॉप्स, लूज टीशर्ट्स वापरात होते तसेच स्ट्रेट कट ड्रेसेस, मॅक्सी ड्रेसेसही सर्रास वापरले जात होते. त्यात भर म्हणून जीन्सचे अजूनही वेगवेगळे प्रकार पावसाळ्यात बघायला मिळतील. त्यामध्ये फुल लेन्थ ऐवजी शॉर्ट लेन्थ जीन्स, डेनिमऐवजी इतर रेन फ्रेंडली फॅब्रिकमधील पँट्स असतील. तर सध्या प्रचंड लोकप्रिय असलेले ऑफ शोल्डर्स, कोल्ड शोल्डर म्हणजे स्ट्रॅप टॉप्स, डीप स्लीव्ह असे स्लीव्हटॉप्स या पावसाळ्यातही ट्रेंड इन असू शकतील. पार्टीज किंवा सेलिब्रेशन्ससाठी प्लेटेड स्कर्ट्स, फ्लेयर्ड स्कर्ट्स, स्किनी ड्रेस, पार्टी गाऊन्स असे आऊटफिट्स ट्रेंड इन होते त्यांचेही विविध प्रकार पावसाळ्यात असतील. इंडियन वेयरमध्ये डिझाइन केलेल्या घेरदार कुर्तीज आणि त्याबरोबर घेरदार पँट्स टीम अप केलेला लुक उन्हाळ्यात ट्रेंड इन होता. पावसाळ्यात या पँट्सचा घेर कमी झालेला असेल, कुर्तीजच्या बाबतीतही कमीतकमी घेर, स्ट्रेट ए लाइन कुर्ती, हाय साइड स्लीट आणि त्याबरोबर टीम अप केलेल्या पँट या ट्रेंड इन ठरतील. नायलॉन, शिफॉन, पॉलिस्टर, सिल्क या फॅब्रिकमधील कपडय़ांचा वापर जास्त असेल.

ज्वेलरी

ज्वेलरीमध्ये ओव्हरसाइज नेकपीसेस, इयिरग्स, नोज िरग्स ट्रेंड  होती. ऑक्सिडाइज ज्वेलरी तसेच वेगवेगळ्या भौमितिक आकाराच्या ज्वेलरी बाजारात दिसतील. ग्राफिटी असलेले ब्रोचेस, नोजिरग्स, इयरकफ्स इत्यादी पावसाळ्यात ट्रेंड इन असेल. परंतु त्यांचा आकार मध्यम किंवा लहान असेल.

फूटवेयर

बूट्स, स्नीकर्स, बॉक्स हिल्सना पूर्णपणे टाटा करायची गरज नाही. याचेच विविध प्रकार पावसाळ्यातही वापरता येतील अशा पद्धतीने बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्यासाठीचे मटेरिअल बदलले आहे. तसंच त्यावर वेगवेगळे पिंट्र्स, कलर्सही पाहायला मिळतील. बॉक्स हिल्स आणि रबरी स्नीकर्स याही वर्षी मार्केट गाजवणार आहेत. त्या तुलनेत फ्लॅट फूटवेयर मात्र कमी प्रमाणात उपलब्ध असेल.

मेकअप

पावसाळ्यातील फ्रेश वातावरणात मेकअपसुद्धा खूप फ्रेश परंतु मॅट पद्धतीचा पाहायला मिळेल. लीप कलर, आय श्ॉडो, ब्लश खूप नसíगक रंगांमध्ये आणि मॅट पद्धतीतलेच उपलब्ध असतात. पिंक, पीच या रंगांतील ब्लश खूपच ट्रेंड इन असेल. लाइट ब्लू, ग्रीन, यलो इत्यादी नसíगक शेड आय ब्रो पॅलेटमध्ये पाहायला मिळेल. लीप कलरमध्ये पिंक, हॉट पिंक, चेरी रेड, मार्सला, ब्राऊन, नुड शेड या शेड्स ट्रेंड इन असतील.

टीम व्हिवाने तुमच्यासमोर पावसाळ्यातील ट्रेंड्स काय असू शकतील यांची यादी दिली आहे. आता या यादीनुसार तुमची फॅशन ठरवा आणि काय काय खरेदी करायचं ते ठरवा. हॅप्पी शॉपिंग!!

viva@expressindia.com