27 September 2020

News Flash

नेलेथॉनचे रंग

नेल आर्ट ही गेल्या काही वर्षांत खूप मोठी झालेली कला.

नेल आर्ट ही गेल्या काही वर्षांत खूप मोठी झालेली कला. सौंदर्यशास्त्रात नखांचं सौंदर्य जपणं तसं जुनं, पण या कलेला नेल आर्ट स्टुडिओच्या माध्यमातून याला वलय प्राप्त झालं. गेल्या चार-पाच वर्षांत मोठय़ा शहरांमधून अनेक नेल आर्ट स्टुडिओ सुरू झाले आहेत. त्यातून अनेक कलाकार मोठे होत आहेत. नखं रंगवायची स्पर्धा असते आणि ती आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात येते, याचं आता आश्चर्य वाटायला नको. कारण आपल्या देशातच या नेल आर्टच्या स्पर्धा आता चांगल्या लोकप्रिय व्हायला लागल्या आहेत.

11स्टाइलस्पीरच्या वतीने गेली दोन र्वष नेलेथॉन नावानं राष्ट्रीय पातळीवर एक स्पर्धा आयोजित करण्यात येते. तिसरी स्टाइलस्पीक नेलेथॉन नुकतीच मुंबईत पार पडली. भारतातील नामवंत नेल आर्ट प्रोफेशनल्स यामध्ये सहभागी झाले. नखं रंगवण्यासाठी आणि सजवण्यासाठी रंगांबरोबरच खडे, स्फटिक, छोटय़ा प्रतिमा आणि इतरही अनेक अभिनव गोष्टींचा वापर सहभागी कलाकारांनी केला होता. देशभरातून आलेल्या तब्बल १०० नेल टेक्निशियन्सनी आपली कला दाखवली. वेगवेगळ्या नऊ कॅटगरीमध्ये स्पर्धा रंगली. या स्पर्धेमध्ये यशस्वी होणारे कलाकार सोलमध्ये होणाऱ्या ओएमसी आंतरराष्ट्रीय नेलआर्ट स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय नेलआर्टिस्ट जर्मनीच्या कॉर्नेलिया वोलफ्रम आणि उझबेकिस्तानच्या लैला वझिरोवा यांनी २०१६ मधले नेल ट्रेण्ड्स काय असतील याविषयी लाइव्ह डेमो दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2016 1:05 am

Web Title: nail art 2
टॅग Loksatta,Viva
Next Stories
1 व्हिवा दिवा: प्रियांका गंगनाईक
2 क्लिक: ये दोस्ती हम नहीं तोडेंगे..
3 व्हिवा लाऊंजमध्ये नेमबाज राही सरनोबत
Just Now!
X