गायत्री हसबनीस

नव्या ट्रेण्ड आणि डिझायनर कलेक्शनमुळे आपण नवीन काही तरी ट्राय करण्यासाठी प्रेरित होतो. नव्या पद्धतीची फॅशन आली की वापरून झालेले फॅशनेबल कपडे ‘आता ही फॅशन जुनी झालीये’ असं म्हणून आपण बाजूला सारतो. त्या फॅशनचे कपडे पुन्हा कोणीही घालणार नाही असं आपण समजतो, पण प्रत्यक्षात पुन्हा ती फॅशन कोणीच करणार नाही, असा त्याचा अर्थच नसतो मुळी.. काही काळापुरती ती फॅ शन ट्रेण्डबाहेर गेली तरी त्यातील निवडक फॅ शन पुन्हा काही दिवसांनी आपल्यासमोर येते. पुन्हा पुन्हा वापरली जाते, याला फॅशनचा इतिहास गवाह है!

c त्याच्याबरोबरीने नव्या दमाच्या डिझायनर्सनी नवी कोरी फॅशनही आणली पण दोन्हीच्या तुलनेत परत आलेली जुनी फॅशनच जास्त वापरली गेली. जुनी फॅशन म्हटलं की त्यात विंटेज किंवा रेट्रो फॅशनचा समावेश होतो, पण सध्या जुन्या काळात हिट किंवा लोकप्रिय असलेली फॅशन परत वापरली म्हणजे इथे जुनी फॅशन परत आलीये असं म्हणता येणार नाही. कारण तांत्रिकदृष्टय़ा काही फॅशनच्या पद्धती ठरलेल्या असतात आणि त्या तशाच वापरल्या जातात. फक्त काही जुन्या पद्धतीचे कपडे घेऊन त्यावर नवीन प्रयोग करण्याचे काम आजचे फॅशन डिझायनर करीत आहेत. अशा काही निवडक फॅशनच्या पद्धती आहेत, ज्या आज रिपीट झाल्यात. त्या तशा यापूर्वीही कित्येकदा रिपीट होत राहिल्या होत्या त्यामुळे फॅशन रिपीट होणं हाही आज ट्रेण्डचाच भाग बनून गेला आहे. हल्ली सतत वर्षांतून दोन-तीनदा कलेक्शन काढण्याचे वारे प्रचंड आहे. त्यात एखादी फॅशन रिपीट होण्याचीही शक्यता असते. आपली फॅशन कोणत्याही दुसऱ्या डिझायनरकडून पुनरावृत्ती होऊ  नये याची काळजी घेत आपल्या कपडय़ांमध्ये विविधता आणणं हे त्या डिझायनरसमोरचे मोठे आव्हान असते आणि त्यासाठी एखादी फॅशन ट्रेण्डमध्ये आणताना अशा प्रकारची जुनी पॉप्युलर फॅशन परत ट्रेण्डमध्ये बसवण्याचा प्रयत्न डिझायनरकडून होतो. त्यामुळे फॅ शन रिपीट होत राहते.

भारतात जास्त करून पाश्चिमात्य पद्धतीची फॅशन सातत्याने रिपीट केली जाते. खरं तर फॅशन रिपीट होणं हे साहजिकच आहे, असं फॅशन तज्ज्ञांचं मतं आहे. ‘फॅशन सायकल’च्या प्रक्रियेत कधी पंधरा तर कधी वीस वर्षांनी जुनीच फॅ शन नव्याने येते. आपण जसे फॅशनेबल कपडे एखाद्या ओकेजनला वापरून झाल्यावर परत ते दुसऱ्या ओकेजनलाही वेगळ्या पद्धतीने वापरतो तसेच रिपीटेड फॅशनचे होते. यामुळेच एखाद्या दशकाची फॅशन काही वर्षांनी रिपीट होत राहते. विशेष म्हणजे शर्टच्या फॅशनमध्ये अनेक असे प्रकार आहेत जे पॉप्युलर आहेत, त्यातला एक असा प्रकार जो कित्येकदा रिपीट झाला आहे व तोच परत त्याच्या लोकप्रियतेमुळे ट्रेण्डमध्ये येतो. अशा रिपीटेड फॅशन प्रकारांचा हा आढावा..

प्लिटेड स्कर्ट

भारतात स्कर्टचे बरेच प्रकार वापरले जातात, त्यात प्लिटेड स्कर्ट हे रिपीट झाले आहेत किंबहुना हा स्कर्टचा प्रकार अनेक वेळा फॅशनच्या गर्दीत परत येत राहिला आहे. प्लिटेड स्कर्टमध्ये एक ‘प्लिट’, दोन किंवा त्यापेक्षा अधिक ‘प्लिट्स’ असणारे स्कर्ट रिपीट होऊ न आता ते ट्रेण्डमध्ये येत आहेत. भारतीय डिझायनर्सनी असे प्लिटेड स्कर्ट्स वेडिंग किंवा ट्रॅडिशनल वेअरसाठी आणले आहेत. पायल सिंगल या डिझायनरने प्लिटेड स्कर्ट ट्रॅडिशनल पद्धतीने आणला आहे. तर डिझायनर सोहाया मिश्रा हिने तिच्या ‘चोला’ या ब्रॅण्डद्वारे प्लिटेड स्कर्ट वुलन फॅब्रिकचा आणला आहे. ‘खरा कापस’ या लेबलनेही काही प्लिटेड स्कर्ट परत आणले आहेत, ज्यात त्यांनीही ऑथेंटिक किंवा क्राफ्टिंगच्या आधारे खादी व कॉटनमध्ये आणलेले प्लिटेड स्कर्ट ट्रेण्डमध्ये आहेत.

सेलर कॉलर

प्रिन्सेस डायना हिने बऱ्याचदा सेलर कॉलरचा अप्पर शर्ट किंवा टॉप कॅरी केला होता. त्यामुळे ती फॅशन तेव्हा प्रचंड हिट झाली होती. तिचा सेलर ड्रेस खूप पॉप्युलर होता. सध्या सेलर कॉलरचा लुक रिपीट झाला आहे आणि केट मिडेल्टन ही सेलर ड्रेस वापरता दिसतेय.

बायशॉप लाँग स्लिव्ह्ज

अभिनेत्री सोनम कपूरने मध्यंतरी एक पांढरा आऊटफिट घातला होता, त्यावरून ती जास्त चर्चेत होती. बायशॉप स्लिव्ह्जचा तिचा तो गाऊन रिपीटेड फॅशनमध्ये मोडतो. आज मोठय़ा ई-कॉमर्स साइट्सवर डिझायनर्सनी बायशॉप टॉप्स आणले आहेत. ट्रान्सपरन्टपासून अगदी कॉटनपर्यंत विविध टॉप्स आहेत. ‘चोला’ या लेबलनेही लेदरचा बायशॉप लाँग स्लिव्ह टॉप आणलाय. अनिता डोंगरेनेही बायशॉप स्लिव्हचे ट्रॅडिशनल वेअर आणलेत. त्यामुळे विविध प्रकारे हे टॉप्स जीन्स, मिनी स्कर्टवर वापरता येतील.

हॅट

सर्वात जास्त आकर्षक दिसणाऱ्या काही हॅटचे आणि कॅपचे नावाजलेले प्रकार फॅशनमध्ये सध्या रिपीट झाले आहेत. ‘बकेट हॅट’ हा प्रकार जो सर्वात जास्त उत्तर युरोपमध्ये वापरला जातो, तो आता भारतीय फॅशनमध्ये साधारणपणे अनेकदा ट्रेण्डमध्ये येऊनही रिपीट होतो आहे. ‘एका’ या लेबलने ही हॅट परत ट्रेण्डमध्ये आणली आहे. या हॅटचे वैशिष्टय़ म्हणजे फार जुन्या संस्कृतीतून आलेली ही हॅट आत्तापर्यंत फॅशन म्हणून स्वत:चे स्थान कायम टिकून आहे. अ‍ॅमेझॉनवर या हॅटचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत.  नकिता सिंग या डिझायनरने सन हॅटची फॅशन तिच्या समर कलेक्शनसाठी रिपीट केलीय. ‘सन हॅट्स’ या साऊथ अमेरिका, लिओ द जानेरोसारख्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. ‘दिल धडकने दो’ सिनेमातील प्रियांकाचा समर लुक सन हॅट घातल्याशिवाय पूर्ण झाला नाही.

गिंघम चेक्स

चेक्सची पद्धत इतक्या वेळा रिपीट होत राहिली आहे की त्यातला आज कोणता प्रकार नेमका ट्रेण्डमध्ये आहे हे सांगणंही अवघड होऊन जावं. चेक्समध्ये गिंघम चेक्स हे रिपीटेड आहेत जे सत्तरच्या दशकात अमेरिकेत प्रचंड पॉप्युलर होते. तिकडचा कामगारवर्ग गिंघम चेक्स वापरत असे, त्यातून ती फॅशन घरातील टेबलक्लॉथ, उशा, पडदे इतपर्यंत चेक्स म्हणून पॉप्युलर झाली होती आणि आताही आहे. खासकरून लाल, गुलाबी आणि हिरव्या रंगाचे असे ते गिंघम चेक्स आज ‘एका’, ‘पेरो’ या ब्रॅण्डसोबत राहुल मिश्रा, ‘उर्वशी जोनेजा, दिव्या शेठ यांनी परत आणले आहेत. इंडियन वेअरमध्येही चेक्सच्या साडय़ा आणल्या आहेत. ‘एथिक्स’ या ब्रॅण्डच्या कलरफुल चेक्स साडय़ा ट्रेण्डमध्ये आहेत. चेक्स नुसता काळा-पांढरा राहिला नसून आता मल्टिकलरमध्येदेखील उपलब्ध आहे.

जम्पसूट/ ब्लेझर

‘रीझन’ याच लेबलअंतर्गत ब्लेझरची फॅशन रिपीट झाली आहे. ज्यात ‘कॅशमेअरी’ या स्टाइलचे ब्लेझर इन आहेत. त्याचबरोबरीने जम्पसूटमध्येदेखील वेगळे प्रकार आहेत. डेनिम जम्पसूटपासून ते प्रिंटेड जम्पसूट आज ट्रेण्डमध्ये आहेत. ‘झारा’ या वेबसाइटवर असे जम्पसूट पाहायला मिळतील. आरती विजय गुप्ता, ‘द लेबल लाइफ’ यांनी प्रिंटेड जम्पसूट रिपीट केले आहेत. ‘रीझन’ या लेबलनेही प्रिंटेड जम्पसूट आणले आहेत. जुन्या काळातल्या जम्पसूट यावर एकच पॅटर्न असलेले प्रिंट, स्ट्राइप्स किंवा टायगर स्कीन असे प्रिंट्स होते. तर प्लेन जम्पसूटसुद्धा रिपीट झाले आहेत.

रफल्स 

आज रफल्स हे सर्वात पॉप्युलर असे आऊटफिट आहे. क्रीम कलर, यल्लो आणि रेड रंगाचे असे हे रफल्स आज रिपीट झाले तरी सुपरहिट आहेत. हातापासून, नेक, ऑफ शॉल्डर, रफल्स पॅण्टपर्यंत यात विविधता पाहायला मिळतेय. सिमिट्रिकल आणि ए -सिमिट्रिकल असे नवीन रफल्स आले असले तरी रफल्स हा सत्तरीच्या दशकातला पॉप्युलर ट्रेण्ड जवळजवळ पूर्ण रिपीट झाला आहे. पुढच्या बाजूने आणि हाताच्या कडेला रफल्सची फॅशन आहे. ‘रीझन’, द लेबल वाइफ’ आणि ‘शीइन’ या लेबलमध्ये रफल्सची फॅशन रिपीट होऊनही हिट आहेच.

viva@expressindia.com