News Flash

‘कट्टा’उवाच : ओओटीडी

या ट्रेण्डला फॉलो करीत आजकाल मात्र कोणीही आपले फोटो पोस्ट करताना हा हॅशटॅग वापरत असतं.

(संग्रहित छायाचित्र)

आताची तरुणाई अनेकदा शॉर्ट फॉम्र्समध्ये बोलत असते. अनेक हॅशटॅग हेसुद्धा मोठय़ा वाक्यांचे किंवा टायटल्सची केलेली छोटी रूपं असल्याचं पाहायला मिळतं. संपूर्ण बोलणं हे कदाचित कमीपणाचं मानलं जात असावं किंवा त्यात जो वेळ जातो तेवढा वेळ तरुणाईकडे कदाचित नसावा. त्यामुळे अनेक ‘एक्स्प्रेशन्स’चे शॉर्ट फॉम्र्स बनवून तरुणाई वापरताना दिसते. सुरुवातीला चॅटमध्ये थोडय़ा प्रमाणात आलेले शॉर्ट फॉम्र्स इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या हॅशटॅगमुळे एकदम भरात आले, बोलण्यात शॉर्ट फॉम्र्सचा सहज समावेश होऊ  लागला. हसण्यापासून ते प्रशंसा करण्यापर्यंत सगळ्या प्रकारे व्यक्त होण्यासाठी यांचा वापर केला जाऊ  लागला.

‘इन्स्टाग्राम’वर प्रसिद्ध असलेल्या हॅशटॅगपैकी फॅशनविश्वात विशेष वापरला जाणारा हॅशटॅग म्हणजे ‘ओओटीडी’ (डडळऊ). याचं पूर्ण रूप आहे ‘आऊटफिट ऑफ द डे’. फॅ शन ब्लॉगर्स आणि स्टायलिस्ट यांच्याकडून सर्वाधिक वापरला जाणारा हा शॉर्ट फॉर्म आहे. प्रत्येक दिवसाच्या आऊटफिटबद्दल लिहिताना आणि फोटो पोस्ट करताना फॅ शन ब्लॉगर्स हा हॅशटॅग वापरतात. फॅ शन स्टायलिस्टही एकेका दिवशी केलेल्या स्टायलिंगचे फोटो आणि डिटेल्स पोस्ट करताना ‘ओओटीडी’ हा शब्द अनेकदा फोटोच्या कॅप्शनमध्ये पाहायला मिळतो. स्वत:चा एखाद्या दिवसाचा आऊटफिट आवडलेले अनेक सेलेब्रिटीसुद्धा ‘ओओटीडी’ वापरून आपले फोटो पोस्ट करतात. एखाद्या विशेष फेस्टिव्हलच्या किंवा इव्हेंटच्या निमित्ताने एखाद्या सेलेब्रिटीसाठी डिझाइन केलेलं आऊ टफिट सोशल मीडियावर पोस्ट करताना अनेक डिझायनर्सही ‘ओओटीडी’ या हॅशटॅगने फोटो कॅप्शन करतात.

या ट्रेण्डला फॉलो करीत आजकाल मात्र कोणीही आपले फोटो पोस्ट करताना हा हॅशटॅग वापरत असतं. त्या फोटोत आपण लेहंगा घातलाय की पजामा हे न पाहता बिनधास्त ‘ओओटीडी’चा हॅशटॅग वापरून इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करून मोकळे होतात. कॉमन झालेल्या ट्रेण्डमध्ये आपणही असावं याचा हा अट्टहास बघताना त्या ‘ओओटीडी’चा सगळा अर्थच गायब होतो, त्याचं महत्त्वच राहत नाही आणि तो फक्त एक ‘ट्रेण्ड’ म्हणून शिल्लक राहतो. अगदी बेसिक घरातला टी-शर्ट, झोपाळलेले डोळे आणि भुतासारखे विस्कटलेले केस अशा अवतारातल्या फोटोलाही ‘ओओटीडी’ ही कॅप्शन पाहून मात्र हसू अगदी आवरत नाही!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 1:20 am

Web Title: ootd hashtag on twitter and instagram
Next Stories
1 ‘जग’ते रहो : फिट अ‍ॅण्ड फाइन
2 हॅट्स ‘ऑन’
3 भाषेचा ‘नाद’खुळा!
Just Now!
X