15 August 2020

News Flash

सेलिब्रेशनचा कपडेपट!

घरापासून आणि शहरापासून कुठे तरी लांब जाऊन इयर एण्ड साजरा करायचा ही पद्धत काही नवीन नाही.

(संग्रहित छायाचित्र)

वेदवती चिपळूणकर

३१ डिसेंबरच्या पार्टीजचे सगळ्यांचे प्लॅन्स झालेच असतील. दर वर्षी काही तरी नवीन प्रकारे इयरएण्ड साजरा करायची इच्छा सर्वानाच असते. दर वर्षी काही तरी नवीन गोष्टी ट्रेण्डमध्ये असतात. कधी थीम पार्टीज तर कधी पूल पार्टीज, कधी फॅमिली गेटटुगेदर्स तर कधी रियुनियन्स! प्रत्येक पार्टीनुसार, त्याच्या थीमनुसार आपण आपले आऊटफिट्स ठरवत असतो. या वर्षीच्या इयर एण्ड पार्टीजसाठी काही आऊटफिट आणि अ‍ॅक्सेसरी टिप्स !

सरत्या वर्षांला सलाम करताना आणि नव्या वर्षांच्या उगवत्या सूर्याचे स्वागत करण्यासाठी आपण नेमकं  कुठे, कधी, कोणाबरोबर असावं याचे आपले बेत निदान महिनाभर तरी सुरू असतात. सगळ्यांनाच नवीन वर्षांच्या स्वागतासाठी भव्य हॉटेल किंवा क्लबमध्ये जावंसं वाटतं असंही नाही. कोणी पाठीवर बॅग टाकून भ्रमंतीलाही निघणारे असतात. तर अनेकदा घरच्यांबरोबर किंवा मित्रांबरोबर फार्महाऊसवर डेरा टाकला जातो. पार्टी मग ती तुम्ही कशीही, कुठेही करा मात्र त्या प्रत्येक ठिकाणानुसार तुमचे कपडे, तुमच्या अ‍ॅक्सेसरीजमध्येही नावीन्य आणणं शक्य आहे..

क्लब आणि रिसॉर्ट पार्टी

क्लब आणि रिसॉर्ट पार्टी या काही आपल्या पिढीला नवीन नाहीत. आजकाल सर्वाना परवडतील अशा डिस्काऊंट्समध्ये या पार्टीज ठिकठिकाणी होतात. विविध ठिकाणी असणाऱ्या इयर एण्डच्या सेलचा यासाठी फायदा करून घ्यायला हरकत नाही. या वर्षी ग्लिटर आणि मेटॅलिक कलर्सची चलती फॅशन मार्केटमध्ये दिसते आहे आणि अनेक पार्टीजच्या थीमही ‘डॅझल’ या प्रकारात मोडणाऱ्या आहेत. वेस्टसाइड, लाइमरोड अशा ऑनलाइन ब्रॅण्ड्सनी खास पार्टीवेअर बाजारात आणले आहेत. याशिवाय, मिंत्रा, फ्लिपकार्टवरही पार्टीवेअरसाठी खूप वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. मुख्य म्हणजे थीमनुसार स्टायलिंग ही काही केवळ मुलींची मक्तेदारी राहिलेली नाही. मेन्स फॅशनमध्येही डॅझल, मेटॅलिक आणि ग्लिटर या थीमच्या आऊटफिट्स आणि अ‍ॅक्सेसरीजनी प्रवेश केलेला आहे. वुमेन स्टायलिंगमध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की संपूर्ण लुकमधला एखादाच एलिमेंट किंवा दोन डिस्टन्ट एलिमेंट्स हे या ग्लिटर थीमनुसार असले पाहिजेत, नाही तर तो लुक खूप भडक दिसण्याची शक्यता आहे. उदा. स्कर्ट आणि हॅट मेटॅलिक घेऊ न बाकी एलिमेंट्स प्लेन रंगाचे ठेवावेत. मेटॅलिक आऊटफिटवर अ‍ॅक्सेसरीज शक्यतो अजिबात चमक नसलेल्या घालाव्यात जेणेकरून आऊटफिट आणि अ‍ॅक्सेसरीज दोन्ही एकमेकांना ‘आऊटशाइन’ करणार नाहीत. मेन्स स्टायलिंगमध्ये ग्लिटर जॅकेट्स आणि मेटॅलिक शूज हे पेअर करता येतील किंवा सॅटीनचा ग्लेझ असलेला शर्ट आणि मेटॅलिक फिनिशचे शूज हेही चांगलं कॉम्बिनेशन ठरू शकेल.

फार्महाऊस आणि आऊटडोअर पार्टी :

घरापासून आणि शहरापासून कुठे तरी लांब जाऊन इयर एण्ड साजरा करायचा ही पद्धत काही नवीन नाही. मात्र शहरातून बाहेर पडलं की महत्त्वाची गोष्ट जाणवते ती म्हणजे थंडी! त्यामुळे आऊटडोअर पार्टीजसाठी स्टायलिंग करताना थंडीचंही भान ठेवावं लागेल. पी.यू. बूट्स हे थंडीसाठी योग्य म्हटले जातात. साइड झिपर आणि बॅक झिपर असलेले पी.यू. बूट्स या सीझनला ट्रेण्डमध्ये आहेत. ब्लॅक, ब्राऊन, टॅन, मस्टर्ड हे रंग या बूट्समध्ये इन आहेत. आऊटडोअरला डान्सचा बेत असेल तर हे शूज नाचताना अडथळा निर्माण करणार नाहीत याची खात्री करून घ्या. स्वेटशर्ट्स आणि हूडीज हे नेहमीचे विंटर पार्टनर असले तरी त्यांच्यासोबत अ‍ॅक्सेसरीज निवडताना त्या शक्यतो वूडन, क्विलिंग किंवा मॅट फिनिशच्या असाव्यात. वुमेन्स आणि मेन्स दोन्ही फॅशनमध्ये सध्या ‘कॅमो जॅकेट्स’ ट्रेण्डिंग आहेत. कॅमो जॅकेट्सनी संपूर्ण स्टायलिंगचा बोल्डनेस दिसून येतो. त्यासोबत अ‍ॅक्सेसरीज निवडताना बोल्ड स्टेटमेंट करणाऱ्या मोठय़ा आणि ठळक निवडलेल्या अधिक उठून दिसतील.

फुगे, रिबन्स, बबल्स अशा सगळ्या डेकोरेशन्सनी साधारणत: थर्टी फर्स्ट पार्टीज सजलेल्या असतात. मात्र ‘थीम पार्टी’ या सध्या भरात असलेल्या संकल्पनेमुळे जर कुठे थीम पार्टीला जायचा बेत असेल तर मात्र आपल्याला काय आवडतं यापेक्षा थीममध्ये काय बसेल याचा विचार प्रामुख्याने करायला हवा. त्यातही आपल्याला काय चांगलं दिसतं आणि कम्फर्टेबल आहे याची सांगड त्या थीमशी घालावी लागेल. जर स्वत:च पार्टी करण्याचा विचार असेल तर आपल्या आवडीनिवडीला मोकळं रान आहे. बेत काहीही असला तरी त्याची तयारी मात्र आत्तापासूनच करावी लागेल. इअर एण्ड सेल अजून चालू आहेत तोपर्यंत एन्जॉय शॉपिंग!

हॉस्टेल आणि रूम पार्टी

हॉस्टेलवर राहणारे किंवा रूम शेअरिंग बेसिसवर राहणारे अनेक जण ‘थर्टी फर्स्ट’साठी घरी किंवा नेहमीच्या मित्रमैत्रिणींना भेटायला जाऊ  शकत नाहीत. अशा वेळी अनेकदा इनडोअर पार्टीज प्लॅन केल्या जातात. हाऊस पार्टीजनाही आपण एखादी थीम नक्कीच ठरवू शकतो. मात्र थीम नसेल तरीही ‘कॉम्फि’ आणि ‘पार्टीवेअर’ असे दोन्ही असणारे आऊटफिट्स निवडावे लागतील. ओव्हरसाइज टीशर्ट्स, लूज बॉटम्स किंवा चक्क पजामा, क्वर्की प्रिंट्स किंवा स्लोगन्स असलेले टीशर्ट्स, स्वेट क्रॉप टॉप्स, लोकरीचा श्रग किंवा चक्क स्वेटर, हुडी जॅकेट अशा आऊटफिट्सनी आणि क्वर्की हेअरबॅण्ड्स किंवा हेडगिअर्स, पफी इअर हँगिंग्ज अशा अ‍ॅक्सेसरीजनी हाऊसपार्टीचा लुक पूर्ण करता येईल. मुलांना कॅमो शॉर्ट्स, सुपरहिरो बॉक्सर्स, जॉगर्स पॅन्ट्स, सॅण्डोज असे सगळे ‘कम्फर्टेबल’ पर्याय मोकळे राहतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2018 1:35 am

Web Title: outfit and accessories tips for new years party
Next Stories
1 फॅशनदार : पुढची फॅशन..
2  ‘जग’ते रहो : मध्यरात्रीच्या सूर्याचा देश
3 ‘कट्टा’उवाच : शॉवर
Just Now!
X