07 August 2020

News Flash

ये रेशमी जुल्फें..

‘मेकओव्हर’ करण्याची इच्छा असेल तर हेअर स्टाइल त्यात सर्वात महत्त्वाची आणि मोलाची भूमिका पार पाडते.

तेजश्री गायकवाड

डिसेंबर सुरू झाला की खरं म्हणजे इयर एंडचेच वेध लागतात. सगळ्याच अर्थाने आपला इयर एंड मेमरेबल करण्यासाठी आपले अथक प्रयत्न सुरू असतात. मग ३१ डिसेंबरच्या रात्री आपण कुठे जायचे, नवीन वर्षांचे स्वागत कसे करायचे याचे बेत आखले जातात. इयर एंडचे सेलिब्रेशन नेमक्या कशा प्रकारे करायचे याचे बेत आखणाऱ्या तरुणाईला त्यांच्या नियोजनानुसार त्यांचे ड्रेसिंग, हेअरस्टाइल कसे करता येईल. थोडक्यात त्यांचे दिसणे कसे खुलवता येईल यासाठीचे हे दोन खास लेख..

आपल्याला सुंदर बनवण्यात अनेक गोष्टींचा सहभाग असतो. त्यातली एक गोष्ट म्हणजे आपले केस. केवळ सुंदर केस असूनही चालत नाही. त्यांची रचनाही तितकीच आकर्षक असावी लागते. आपल्या व्यक्तिमत्त्वात उठाव आणणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये हेअर स्टाइल हासुद्धा अविभाज्य भाग आहे. अनेक मुलं-मुली आपल्या केसांबद्दल खूपच जागरूक असल्याचं आढळून येतं. अनेकांना आपल्या हेअर स्टाइल्स महिन्या-महिन्याला बदलायला आवडतात. कारण हेअर स्टायलिंगमधले लेटेस्ट ट्रेण्ड त्यांना आपलेसे करायचे असतात. ‘मेकओव्हर’ करण्याची इच्छा असेल तर हेअर स्टाइल त्यात सर्वात महत्त्वाची आणि मोलाची भूमिका पार पाडते. आता हेअरस्टाइल करायची म्हणजे आपले केस चांगले असायलाच हवेत. त्यात आता डिसेंबरमध्ये फक्त सेलिब्रेशन, पार्टी यांचाच मूड असणार आहे. त्यामुळे त्यासाठी छान आणि हटके तयार होणं आलंच. या सगळ्यात आपल्या केसांचा पोत सांभाळून वेगवेगळ्या हेअरस्टाइल करायच्या तर अनेक गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, असे एक्स्पर्ट हेअरस्टायलिश सांगतात.

डिसेंबर हा थंडीचा महिना. थंडीमध्ये केसांची जास्त काळजी घ्यावी लागते. तीच काळजी काय आणि कशी घ्यावी शिवाय नवनवीन हेअरस्टाइल करताना काय लक्षात घ्यावं याबद्दल ब्लूम हेअर ट्रान्स्प्लांटचे डॉ. विनोद सोनावणे सांगतात, ‘थंडीचा महिना केसांसाठी चांगला असतो, कारण घाम येत नाही. थंडीमध्ये केसांची काळजी आतून घेतली पाहिजे म्हणजे आपल्या आहारातून केसांचं पोषण केलं पाहिजे,’ असं ते सांगतात. थंडीत उन्हाळ्याप्रमाणे सारखं पाणी प्यायलं जात नाही, तरीही रोज १० ते १२ ग्लास पाणी प्या. फळं, हाय प्रोटीन असलेले तीळ, मेथी, हिरव्या भाज्या खाण्यात असायला हव्यात, पण उडीदडाळ आणि मटण यांचे पदार्थ टाळा, असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर थंडीमध्ये साहजिकच केस ड्राय होतात. अशा वेळी आपण स्टाइल म्हणून केलं जाणारं पर्मनंट आयनिंग किंवा स्ट्रेटनिंग करू नका. काही तासांसाठी केलं जाणारं टेम्पररी आयनिंग किंवा स्ट्रेटनिंग करू शकता. केसांसाठी मोठय़ा दाताचांच कंगवा वापरा. केसांना खूप तेल लावलं की त्यांची वाढ होते, असं पूर्वीपासून सांगितलं जातं, पण खरं तर योग्य प्रमाणात तेल लावलं तरच त्याचा उपयोग होतो, असं ठाम मत डॉ. विनोद व्यक्त करतात.

आपल्या केसांना स्टाइल करायचं म्हटलं किंवा खास पार्टीसाठी तयार व्हायचं असा विचार आला की आपली पावलं थेट पार्लरकडे वळतात. सध्या कोणत्या हेअरस्टाइलचा ट्रेण्ड आहे आणि केसांची काळजी घेऊन ती स्टाइल फॉलो कशी करायची याबद्दल बोलताना तन्वी सलोन आणि स्पाच्या तन्वी आणि श्रद्धा शिंदे सांगतात, आपण तीन ऋतू फॉलो करत असलो तरी मराठी सहा ऋतू आहेत, त्यातला आता वसंत ऋतू सुरू आहे जो केसांसाठी चांगला आहे. केसांना थंडीमध्ये बाहेरून शाइन आणि हेल्दी ठेवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता, असे सांगत काही चटकन होणारे उपाय त्यांनी सुचवले. जास्वंदीच्या फुलांना काही साधारण तापमानापर्यंत पाण्यामध्ये तापवून त्यात कापूर टाकून तुम्ही हे तेल वापरू शकता. तुम्हाला हेअरस्टाइल घरी करायची असल्यास आणि त्यासाठी कोणत्या मशीनचा वापर करणार असल्यास त्या चांगल्या ब्रॅण्डच्याच वापरा. केसांना मशीन वापरून सेट करताना आधी केस शाम्पू आणि कंडिशनरने नीट धुवून घ्या, ड्रायरने नीट सुकवून त्यावर हीट प्रोटेक्टर लावूनच मशिनरीचा वापर करा, असं त्या म्हणतात. हेअरस्टाइलमध्ये मुलींचा कल हा खूप पिना, आर्टिफिशल डेकोरेशन याकडे अजिबात नाही, कारण त्यामुळे काही तासांनंतर डोकं दुखायला लागतं. आपल्यासाठी हेअरस्टाइलची निवड करताना तुम्ही अगदीच मोठमोठय़ा हेअरस्टाइल करू नका कारण त्यामुळे तुम्ही वयापेक्षा मोठे दिसत. आपल्या चेहऱ्यानुसारच हेअरस्टाइल करा, असं सांगतानाच मुलींना सध्या मेकओव्हर करायला आवडते आणि त्यांचा कल हा शॉर्ट केसांकडे आहे जो त्यांना वेगळाच आणि नवीन लुक देतो, असं त्यांनी सांगितलं.

सेलिब्रेशन म्हणजे रंगांची उधळण असते. त्यामुळे हेअरस्टाइलमध्येही रंगांचा ट्रेण्ड आहे. बबली, यंग, फन लव्हिंग अशी प्रतिमा असणऱ्या मुली नॉर्मल लाल, ब्लोंडपेक्षा  वेगवेगळ्या रंगांना पसंती देतात. तुम्ही पार्टीसाठी इंडोवेस्टर्न काही घालणार असाल किंवा अगदी पूर्णपणे वेस्टर्न घालणार असाल तर फ्रेंच रोल, केस मोकळे सोडून त्यात बाऊन्स आणणे किंवा मेस्सी हेअरस्टाइल करू शकता. मेस्सी हेअरस्टाइल करायलाही कष्ट करावेच लागतात, स्प्रे, सिरप लावून तसा लुक निर्माण केला जातो. आपण काय कपडे घालणार आहोत, आपल्याला काय झाकायचं आहे काय हायलाइट करायचं आहे हे ठरवून नंतरच तुम्ही हेअरस्टाइलची निवड करावी, असं तन्वी शिंदे सांगतात.

मुलींप्रमाणे मुलंही हेअरस्टाइल करतातच. त्यामुळे पार्टीसाठी तयार होताना हेअरस्टाइल किंवा हेअरकट आवर्जून केला जातो. ‘थंडीमध्ये तेलकट त्वचा असलेल्यांना त्रास होत नाही, असं म्हटलं जातं, पण आजच्या प्रदूषित वातावरणात कोणत्याही प्रकारचे केस खराब होतातच. यावरच्या उपायांमध्ये तेल फार महत्त्वाचं ठरतं. तुम्ही यासाठी खोबऱ्यांचं तेल, बदामाचं तेल आणि त्यात मेडिकलमध्ये मिळणारी कॅपसूल टाकून हे मिश्रण केसांना दोन ते तीन मिनिटं लावून मसाज करू शकता. कोरफडीचा गर आणि ई-कॅपसूलची पेस्ट करूनही तुम्ही वापरू शकता,’ अशी माहिती हेअरस्टायलिस्ट आणि लुक डिझायनर विवेक लोखंडे यांनी दिली. थंडीत नेहमी केसांना तेल लावताना बोटानेच लावा. मसाज करा आणि गरम स्कार्फ लावून केसांना हीट द्या. थंडीचे महिने हे केस वाढण्यासाठी तसे खास उपयुक्त नसतात, त्यामुळे या सीझनमध्ये शॉर्ट हेअरकट आणि हेअरस्टाइलचीच फॅशन असते, असेही त्यांनी सांगितले. मुलेही त्यांचा लुक ठरवताना आधी दाढी आणि मिशी अशा दोघांची स्टाइल ठरवतात आणि त्याचनुसार हेअरस्टाइल ठरवतात. हेअरस्टाइलमध्ये साइड पार्टिशन हा लुक ट्रेण्डमध्ये आहे जो ऑफिस ते पार्टी असा कुठेही कॅरी होऊ  शकतो. आपल्याकडे अनेकांचे चेहरे हे ओव्हल आकाराचे आहेत त्यामुळे त्याचनुसार हेअरस्टाइल केली जाते. अंडरकट ही हेअरस्टाइल फार ट्रेण्डमध्ये आहे, ही स्टाइल तुम्ही कुठेही सहज कॅरी करू शकता. ही हेअरस्टाइल म्हणजे अगदी रॉयल लुक असतो. या खेरीज पेपर आणि सॉल्ट हा लुक सध्या फार गाजतोय आणि पुढील पाच वर्षे हा लुक किंवा हेअरस्टाइल खूप अधिराज्य गाजवणार, असेही विवेक  लोखंडे यांनी सांगितले. थंडीचा महिना आणि त्या अनुषंगाने घ्यावी लागणारी केसांची काळजी लक्षात घेऊनच आपल्याला दमके दमके हेअरस्टाइल्स करायच्या आहेत हे विसरून चालणार नाही!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2018 1:39 am

Web Title: outfit and hairstyles for new years eve party
Next Stories
1 सेलिब्रेशनचा कपडेपट!
2 फॅशनदार : पुढची फॅशन..
3  ‘जग’ते रहो : मध्यरात्रीच्या सूर्याचा देश
Just Now!
X