News Flash

‘उद्योगिनीची सकारात्मकता भावली..’

स्पा आणि वेलनेस एक्सपर्ट रेखा चौधरी यांच्याबरोबरचा संवादाचा कार्यक्रम

स्पा आणि वेलनेस एक्सपर्ट रेखा चौधरी यांच्याबरोबरचा संवादाचा कार्यक्रम अनेक अर्थाने प्रेरणादायी ठरला. एक गावाकडची स्त्री शहरात स्थिरावून व्यवसाय सुरू करते आणि आघाडीची ‘बिझनेस वुमन’ होते, याची कथा प्रेरक ठरलीच; शिवाय या संवादातून ‘स्पा’विषयी असलेले गैरसमजही दूर झाले. वेलनेस क्षेत्रांतील सद्यस्थिती आणि भरपूर नोकरीच्या संधींबद्दल सांगून रेखाताईंनी या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शन केले. एका वेगळ्या क्षेत्राबद्दल माहिती मिळाली आणि एक वेगळा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन उपस्थित बाहेर पडले.

 

1zनवा दृष्टिकोन मिळाला
आजचा कार्यक्रम खूप छान वाटला. सध्या मी ब्युटी आणि वेलनेस क्षेत्रात नवीन आहे. रेखा चौधरींबरोबरचा हा संवादाचा कार्यक्रम माझ्यासाठी त्या दृष्टीने खूप माहितीपर ठरला. खूपच छान अनुभव होता. या क्षेत्राकडे बघायचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. सुरुवात कशी करावी, त्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात याबद्दल जवळून जाणून घेता आले. इन्स्पिरेशन मिळालं.
– शलोमी डोळस


2zपालकांचा विरोध
कमी होईल
मी ब्युटीशियनचा कोर्स केला आहे. मी या क्षेत्रात काम केलंय, परंतु स्पा म्हणजे नेमकं काय, या व्यवसायाबद्दल जाणून घेता आलं. या क्षेत्रातील विविध संधींबद्दल जाणून घेता आलं. त्याचबरोबर काही पालकांचा आपल्या मुलांना या क्षेत्रात काम करण्याला विरोध असतो. तो अर्थातच गैरसमजापोटी असतो. परंतु या कार्यक्रमामुळे नक्कीच तो दूर होईल असं वाटतं.
– रिबेका कोळी


3zकामावरची निष्ठा भावली

कोणत्याही क्षेत्राला कमी समजण्याचं कारण नाही. त्यापेक्षा आपल्या कामावर निष्ठा असणं महत्त्वाचं, याची जाणीव आजच्या कार्यक्रमातून झाली. काम करण्यासाठी कोणत्याही भाषेचा अडथळा नसतो हे समजलं. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे आणि कशा प्रकारे पॉझिटिव्हिटी बाळगली पाहिजे याचा उत्तम पाठ आजच्या ‘व्हिवा लाउंज’मधील रेखाताईंच्या अनुभवामुळे मिळाला.
– तेजश्री भोसले


4zउद्योजिकेचा प्रेरणादायी अनुभव

उद्योजिका बनण्यासाठी किती छोटय़ा छोटय़ा गोष्टी महत्त्वपूर्ण असतात. आजूबाजूच्या गोष्टींतून, वातावरणातून कसं शिकता येतं आणि आणि त्याच आपल्याला एका विशिष्ट उंचीवर नेण्यास मदत करत असतात, हे आजच्या व्हिवा लाउंजमधून नव्याने कळलं. आपण आनंदी असलो तर सगळं कुटुंब आनंदात असतं, दुसऱ्यांनाही आनंद वाटता येतो, हे रेखाताईंनी त्यांच्या अनुभवांतून सांगितलं. मी आता पगारातून जमवलेल्या रकमेतून स्पासारखा एखादा उद्योग सुरू करणार. ही प्रेरणा आजच्या कार्यक्रमातून मिळाली.
– मृदुला घोगरे


5zवेगळी दृष्टी देणारा संवाद

आपण शारीरिक आणि मानसिक ताण घालवण्यासाठी ‘स्पा’मध्ये जातो. आरोग्यपूर्ण सौंदर्याचा हा मार्ग आहे. पण तरीही आपल्याकडे स्पाविषयी भलते गैरसमज आहेत. मसाज सेंटर म्हणून या व्यवसायाला हिणवलं जायचं. या व्यवसायाला प्रतिष्ठा नव्हती. पण आज या क्षेत्राच्या आवाक्याबद्दल, जागतिक स्तरावरील संधींबद्दल रेखा चौधरींनी सांगितलं़ त्यामुळे या क्षेत्राकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळाला.
– सोहा हळणकर

6zन्यूनगंड दूर करण्यास मदत
मी स्वत: आता ब्युटीशियन कोर्स करत आहे. पार्लरच्या गोष्टी, तिथल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स मला चांगल्या प्रकारे माहिती आहेत आणि मी त्या सराईतपणे करते. तरीही लोकांपुढे व्यक्त कसं व्हायचं, आपलं ज्ञान त्यांच्यापर्यंत कसं पोचवायचं, हे मला कळत नव्हतं. रेखा चौधरी यांनी माझ्या मनातील इंग्लिश न येण्याचा न्यूनगंड काढण्यास मदत केली. त्याबद्दल त्यांचे खूप आभार. माझ्या पुढच्या वाटचालीसाठी नक्कीच त्यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरेल.
– श्रद्धा देसाई


7z‘स्पा’ची कन्सेप्ट क्लिअर

सध्या मी आयकॉन इन्स्टिटय़ूटमध्ये ब्युटीशियन टीचर म्हणून कार्यरत आहे. स्पा, स्किन आणि हेअर हे माझे मुख्य तीन विषय आहेत. स्किन आणि हेअरकडे बहुतेक मुलींचा कल दिसून येतो; पण स्पा म्हणजे नक्की काय ते अजून लोकांपर्यंत नीट पोहचलं नसल्यामुळे स्पा शिकण्यासाठी विद्यार्थी कमी असतात. पण आज रेखाजींच्या मार्गदर्शनामुळे स्पा ही कन्सेप्ट क्लिअर झाली. त्यामुळे नक्कीच या क्षेत्राकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन चांगला होईल. त्यांचं मार्गदर्शन माझ्यासाठी प्रेरणादायी ठरलं आणि जाणवलं की अजूनही आपल्याला बरंच काही शिकण्याची आवश्यकता आहे. मी त्या दृष्टीने आता नक्कीच प्रयत्न करेन.
– श्रेया कामेरकर

 

संकलन : कोमल आचरेकर, प्राची परांजपे, अमृता अरुण.
छायाचित्रे : मानस बर्वे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2016 1:10 am

Web Title: rekha chaudhary in viva lounge shares her opinion
Next Stories
1 विदेशिनी: येस, यू कॅन..
2 खाबूगिरी: ‘शोर्मा’ना क्या!
3 सौंदर्याची परिभाषा बदलतेय?
Just Now!
X