सायली सोमण

प्रत्येक ऋतूत आपल्या पेहरावांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. वातावरणाचा अंदाज घेऊ न प्रत्येक ऋतूत आपल्या देशातील हवामानाप्रमाणे, राहणीमान आणि रोजच्या सवयींप्रमाणे, आपला पेहराव कसा असावा, कुठले कापड किंवा सूत वापरावे, कुठल्या स्टाइलचे कपडे, अ‍ॅक्सेसरीज, फुटवेअर त्या त्या ऋतूनुसार घालायला उत्तम याचा एक आढावा घेऊ या.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
How much added sugar does your Favorited packet
तुमच्या आवडत्या चिप्समध्ये साखरेचे प्रमाण किती असते? ते कसे ओळखावे घ्या जाणून…
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
climate changes Heat wave warning in Vidarbha
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, येत्या ४८ तासात…

आपण भारतात आणि त्यातही आशिया खंडांमध्ये राहत असल्यामुळे आपल्याला जवळजवळ सगळ्याच प्रकारचे ऋतू अनुभवायला मिळतात. प्रत्येक ऋतूमध्ये जसे वातावरणात-हवामानात बदल होतात त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या राहणीमानातील सवयी बदलतात. उदाहरणार्थ थंडीत भूक जास्त लागते तर उन्हाळ्यात तहान जास्त लागते, उन्हाळ्यात आपल्याला घामामुळे चिक चिक होते तर पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे भिजतो म्हणून त्रासतो. थंडीत बाहेर फिरायला दिवसा आवडतं तर उन्हाळ्यात उकडू नये म्हणून रात्री छान वाटतं; एरवी उन्हाळ्यात खोलीतला पंख किंवा एसी सतत सुरू असतो पण हिवाळ्यात मात्र ते नको वाटतं, इत्यादी. तसंच प्रत्येक ऋतूत आपल्या पेहरावांच्या गरजाही वेगवेगळ्या असतात. प्रत्येक ऋतू सगळ्याच देशांमध्ये सारखा नसतो, देशांमध्ये तर सोडाच एकाच देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये पण वातावरणात तफावत असते. या वातावरणाचा अंदाज घेऊ न प्रत्येक ऋतूमधील आपल्या देशातील हवामानाप्रमाणे, राहणीमान आणि रोजच्या सवयींप्रमाणे, आपला पेहराव कसा असावा, कुठले कापड किंवा सूत वापरावे, कुठल्या स्टाइलचे कपडे, अ‍ॅक्सेसरीज, फुटवेअर त्या त्या ऋतूनुसार घालायला उत्तम याचा एक आढावा घेऊ या.

सध्या नुकतीच सगळीकडे पावसाची झिमझिम सुरू झाली असल्याने पावसाळ्यात साजेसे वाटतील आणि वावरायला सोपे जातील, अशा फॅशनेबल कपडय़ांवर पहिल्यांदा नजर टाकू या.सर्वप्रथम कुठले कापड किंवा सूत निवडावे याचा विचार करू या. मुळात पावसाळ्यात कपडे वाळायला वेळ लागतो आणि त्यामुळे कपडे फार वेळ दमट राहतात. अशा वेळी वॉटर रिपेलन्ट फॅ ब्रिक.. थोडक्यात पटकन वाळतील अशा सुताचे उदाहरणार्थ विस्कोस रेयॉन, पातळ कॉटन, लिनेन, पॉली क्रेप इत्यादीपासून बनलेले कपडे निवडावेत. या कपडय़ांची फॅशन लक्षात घ्यायची तर त्यांचे सिल्हाऊट्स शक्यतो खूप घेरदार किंवा खूप घट्ट – बॉडी फिट न घेता स्ट्रेट फिटिंगची असावी. यामागे खूप महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे कपडे एकदा भिजले की ते अंगाला चिकटतात, त्यामुळे जितके ढगळ कपडे वापरू तितके अंगाला कमी चिकटतील. तसंच खूप ढगळ किंवा घेरदार कपडे घालू नये कारण ते पटकन खराब होतात. स्त्रियांनी शक्यतो उठावदार प्रिंट्सचे निळा, हिरवा, मरून, मस्टर्ड अशा रंगांमधील केप्री लेंथ पॅण्ट्स, मिडी ड्रेसेस, स्कर्ट्स, कुर्ते इत्यादी कपडय़ांचा वापर करावा. फुटवेअरमध्येही शक्यतो पाण्यात खराब होणार नाहीत अशा मटेरिअलच्या सॅण्डल्स किंवा चपला  असाव्यात. तसेच स्वत:ला पावसात भिजण्यापासून वाचवण्यासाठी सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रान्स्परन्ट विनाइल प्लास्टिकमधील रेनकोट्स आणि रेन जॅकेट्स खूप चर्चेत आहेत. शिवाय टेक्नोसॅवी लोकांसाठी खास जी. पी. एस. ट्रॅकर असलेल्या ट्रेण्डी डिझाइनच्या छत्र्याही सध्या बाजारात खूप बघायला मिळतायेत.

वरल उल्लेख केलेले फॅब्रिक , सिल्हाऊट्स, रंगसंगती याचा मेळ असलेले शर्ट्स, केपरी, पॅण्ट्स जॉगर्स, स्ट्रेट ट्राऊजर्स यांचा वापर पुरुषांनी करावा. फुटवेअर्सचा विचार करतानाही रबरी सॅण्डल्स, क्रॉक्स आणि दिसायला लेदरसारखे पण रबरपासून बनवलेले फॉर्मल शूज वापरावेत.

उन्हाळ्यातील पेहराव हाही बऱ्याच प्रमाणात पावसाळी पेहरावासारखा असतो. फक्त काळजी घ्यावी की कुठल्याही प्रकारचे सिंथेटिक कापड वापरू नये. कॉटन, लिनेनपासून बनलेल्या कपडय़ांनाच प्राधान्य द्यावे. गडद रंगांपेक्षा फिके अथवा पेस्टल कलर्स वापरावेत. या सर्व ऋतूंमधील माझा आवडता ऋतू म्हणजे हिवाळा! फक्त व्यक्तिगत नाही त्यामागे कारण असेही आहे की एक फॅशन डिझायनर म्हणून मला या ऋतूत काहीही वज्र्य नसते. त्यामुळे मला या काळात बरेच प्रयोग करता येतात. उलट ऋतूची गरज म्हणून मला मल्टिलेअर फॅशन अथवा सिल्हाऊट्सचे वेगवेगळे प्रयोग करता येतात. या ऋतूत सर्व रंगही वापरता येतात. वेगवेगळ्या स्टाइलचे स्वेटर्स, जॅकेट्स, श्रग्ज, लाँग श्रग्ज, पोलो नेक, स्कर्ट्स, जेिगग्ज अशा विविध पर्यायांनी बाजार फुललेला असतो. त्यामुळे तुम्हाला निवडीलाही भरपूर वाव मिळतो. अ‍ॅक्सेसरीजमध्ये स्कार्फ , मफलर, कॅप्स, रंगीत सॉक्स, स्टॉकिंग्ज इत्यादी वापरल्यास तुमचं व्यक्तिमत्त्व अजूनच खुलून येतं. हिवाळयात कुठल्याही प्रकारे अंगात वारं शिरू नये याची अवश्य काळजी घ्यावी. त्यामुळे या अ‍ॅक्सेसरीज महत्त्वाच्याही ठरतात आणि फॅ शनही करता येते. म्हणून हिवाळ्यात चपलांची निवड करतानाही पाय संपूर्ण झाकले जातील, अशा चपला वापराव्यात.

मला फॅ शन डिझाइनरम्हणून काम करताना प्रकर्षांने जाणवतं ते असं की बऱ्याच वेळेला लोक बाहेरच्या देशातील फॅशनचं तसंच आंधळेपणाने अनुकरण करतात, त्यामुळे कुठलीही नवीन फॅ शनआली की ती अजमावण्याअगोदर आपल्या हवामानाला आणि आपल्या दिनचर्येला अनुकूल आहे का?, याचा नक्की विचार करावा. छान दिसण्यासाठी स्वत:ला अवघडून घेण्यापेक्षा स्वत:ला साजेसं आणि आरामदायी वाटेल असे कपडे घातल्यावर आपण अजून छान दिसतो. म्हणूनच म्हणते, स्टे कम्फर्टेबल अ‍ॅण्ड यू विल ऑल्वेज बी इन फॅ शन!!!

viva@expressindia.com