‘जग हे पुस्तक आहे आणि जे प्रवास करत नाहीत, ते एकाच पानावर आयुष्यभर खोळंबून राहतात,’  कुणा भटक्याने प्रवासाची केलेली ही व्याख्या. अनेक जण मित्र-मत्रिणी, कुटुंबीय किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत प्रवास करत असतात. कुणासोबत तरी फिरण्याच्या मग कहाण्या तयार होतात, धमाल मस्ती होते आणि प्रत्येक वेळी भेटल्यावर वर्षांनुर्वष त्या गमती चघळल्या जातात; पण काही भटके असे आहेत, जे स्वत: एक दंतकथा बनून जातात. कारण एकटय़ाने भटकंतीचे अनुभवच तसे असतात. ते जेव्हा परत येतात, तेव्हा  व्यक्ती म्हणून बदललेले असतात किंवा आपल्या आकलनाच्या पलीकडचं बोलत असतात. असं का होतं? मुळात त्यांना एकटय़ाने भटकायला का आवडतं? आणि एकटय़ाने भटकणारी जर मुलगी असेल तर संपूर्ण कहाणीच बदलून जाते. अशा मुलींची मानसिकता काय असते? एकल भटक्या मैत्रिणींकडून अर्थात सोलो ट्रॅव्हलर्सकडून हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न..

मुक्त, स्वतंत्र, स्वच्छंद अनुभव

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Iran Israel Attack Live Updates in Marathi
Iran Attack Israel : “आमच्यावर कोणी हल्ला करत असेल तर….”, भारतातील इस्रायलच्या राजदूतांनी दिला इशारा
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
scorching heat
उन्हाच्या झळांनी हापूस आंबा काळवंडला; डाळिंब, द्राक्ष, भाजीपाल्यावर परिणाम
  • दीप्ती शाह, चार्टर्ड अकाऊंटंट

एकटीने फिरणं ही संकल्पना कधीच माझ्या ध्यानीमनी नव्हती. पण २०११ साली मी जेव्हा दुबईमध्ये नोकरी करत होते तेव्हा भारतात परतण्यापूर्वी दुबई फिरण्याचा निर्णय घेतला. तेव्हा एकटीने फिरण्यातच खरी गंमत आहे, हे मला उमगलं आणि गेली पाच र्वष मी स्वच्छंदपणे फिरतेय. दुबई, इजिप्त, थायलंड आणि चेक रिपब्लिकचे व्हिसा माझ्या पासपोर्टवर आहेत. मुळात व्यक्ती म्हणून माझी काही तत्त्वं आहेत, जी सगळ्यांच्याच पचनी पडतील असं नाही. त्यामुळेही असेल कदाचित मला एकटीने भटकायला जास्त आवडतं. मला धावपळ अजिबात आवडत नाही, ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी भरपूर वेळ घालवायला आवडतो, कमीत कमी पशात राहायला आणि राहत्या ठिकाणी झोपून राहण्यापेक्षा लवकर उठून फिरायला मी प्राधान्य देते.

शाळेत असल्यापासूनच मला पिरॅमिडबद्दल आकर्षण निर्माण झालं होतं. त्यामुळे दुबईनंतर मी ठरवून इजिप्तला गेले. त्यावेळी इजिप्तमध्ये राजकीय उलथापालथ सुरू होती, पण मला त्याचा त्रास नाही झाला. एकटीने फिरताना माझ्यावर बलात्कार न होवो आणि मुख्य म्हणजे त्यानंतर माझा खून न होवो एवढीच भीती मला होती. पण त्या भीतीनेही मला कधी रोखलं नाही. मी मूळची नवसारीची. पण मुंबईत माझ्या मामांकडे राहते आणि त्यांनीही मला नेहमीच प्रोत्साहन दिलं. फिरण्यासाठी नवीन ठिकाण शोधताना त्यामागे काहीतरी कारण असतं. म्हणजे बौद्ध संस्कृती आणि ड्रॅगनच्या ओढीने मी थायलंड गाठलं. एनिड ब्लिटॉन हिचं लेखन वाचून चेक रिपब्लिकला गेले. मला पक्षी खूप आवडतात. म्हणून मी दुबईमध्ये स्काय डायव्हिंगही केलं. खरं तर स्वत:ती भीती दडपण्याचंही कारण त्यामागे होतं. एकटं फिरताना तिथल्या संस्कृतीची अधिक जवळून ओळख होते, आपण पसे वाचवायला शिकतो, कुठेही राहता येतं.

‘काउच सर्फिग’सारख्या वेबसाइट्सच्या माध्यमातून मला माझ्यासारखे भटके भेटले आणि त्यांच्या घरीच राहायचे निमंत्रणही मिळाले. शिवाय देशोदेशीचे बॅगपॅकर्स प्रवासादरम्यान भेटले. ओळखी झाल्या. त्यातून स्वस्तात आणि सेफ राहण्याचे पर्याय सापडत गेले. फिरायला गेल्यावर कोणतंही गॅजेट मी वापरत नाही. भरपूर लोकांशी बोलते, मग नवे मित्र मिळतात. त्यातूनच मला ऑपेरा पाहायला मिळाला, कैरो विद्यापीठात जायला मिळालं. माझ्या पहिल्या प्रवासानंतर मला आवर्जून वाटलं की, प्रत्येकाने एकटय़ाने प्रवास करायला हवा. कोणीतरी असतं तेव्हा तुम्ही त्यांच्यावर विसंबून असता. पण एकटय़ाने प्रवास करताना जी असुरक्षितता असते ती तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी खूप मदत करते.

 

नवा आत्मविश्वास दिला

  • गौरी मोहिते, इंटिरिअर डिझायनर

मी काही वर्षांपूर्वी पहिल्यांदा एकटीच अमृतसरला गेले होते, तो अनुभव खूप चांगला होता. जर मी उत्तर भारतात एकटी फिरू शकते तर भारतात कुठेही एकटीने फिरू शकते हा आत्मविश्वास मला त्यातून मिळाला आणि माझ्या भटकंतीला सुरुवात झाली. ग्रुपमध्ये फिरायला गेल्यावर काही लोक अ‍ॅक्टिव्ह, काही फॉलोअर्स असतात आणि बरेचदा तुम्ही त्यांच्यामध्येच अडकून पडता. पण एकटय़ाने फिरताना आपल्यालाच सगळ्या गोष्टी करायच्या असतात, त्यातून नवीन ओळखी होतात. राजकारण, संस्कृती, खाण्यापिण्याचे विषय निघतात, मग बऱ्याच गोष्टी शेअरही करता येतात. शहरांची, वास्तूंची, जागांची माहिती आपण स्वत:हून करून घेतो, कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी तोडगा काढायला शिकतो आणि तीच प्रवासाची खरी मजा आहे, असं मला वाटतं.

मला गडबड, गोंधळ आवडत नाही. माझे प्लान आयत्या वेळी ठरतात, अशा वेळी कुणाचं बंधन नको असतं. प्रवासादरम्यान चांगले-वाईट असे दोन्ही अनुभव आले आहेत, पण त्यातूनही खूप शिकायला मिळतं. मी आजवर एकटीने अमृतसर, चंदिगढ,  हृषीकेश, मनाली, डेहरादून, गोवा, तारकर्ली या ठिकाणी फिरून आलेय.

मला बुलेटवरून एकटीने फिरायला आवडतं. राजस्थान, गोवा, पुणे, लोणावळा, कोल्हापूर या ठिकाणी मी बुलेटने गेली आहे. उत्तर भारतात खूप भटकंती केल्याने आता पुन्हा त्या भागात गेल्यावर माझे तिथले मित्रच माझ्यासाठी बाईकची व्यवस्था करतात. महाराष्ट्राबाहेर गेल्यावर मी चांगल्या हॉटेलमध्ये राहते. पण बुलेटने फिरताना मी टेन्ट घेऊन जाते, त्यामुळे कुठेही राहता येतं. रोडसाइड फूड आवडत असल्याने खाण्याचं टेन्शन नसतं. प्रवासादरम्यान मी जागांचे आणि नव्याने झालेले मित्र माझे फोटो काढतात. राजस्थानमध्ये तर एका कॅब ड्रायव्हरने पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत माझे खूप फोटो काढले. आता भारताबाहेर आणि विशेषकरून जिनेव्हाला फिरायला जायची माझी खूप इच्छा आहे.

 

व्यक्तिमत्त्व बदललं

  • अशफिना चारनिया, फूड ब्लॉगर

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मी इंटरनेटवर सìफग करत असताना मला एका संकेतस्थळावर हैदराबादला जाणाऱ्या विमान तिकिटांवर सूट असल्याचं पाहायला मिळालं आणि मी लागलीच ते बुक करून टाकलं. मी पहिल्यांदाच एकटीने प्रवास करत असल्याने फार उत्साहात होते. आणि आता त्यानंतर एकटीने फिरण्याचा माझा उत्साह आणखीच वाढला आहे. फूड आणि ट्रॅव्हल ब्लॉगर असल्याने मी मित्र-मत्रिणींसोबत याआधी भारतभर फिरले आहे. पण हैदराबादचा अनुभव सर्वात वेगळा होता. मी खूप मूडी असल्याने आणि पहिल्यांदाच एकटी गेल्यामुळे अनेक गोष्टींमध्ये अडचणही आली, पण त्यावर मात कशी करायची हे आता मला समजलं आहे. आयत्या वेळी सेल्फी स्टीक बिघडल्याने रिक्षावाल्याकडून आणि इतर लोकांकडून योग्य फ्रेमचे फोटो कसे काढून घ्यायचे हेदेखील मी आता शिकले आहे. हैदराबादमध्ये मी जास्तीत जास्त स्थानिक बाजार, ठिकाणांना भेटी देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ते शहर वेगळ्या नजरेतून पाहायला मिळालं. हैदराबाद हे शहर खूप सोयीसुविधांनी युक्त आहे, पण त्याच्याविरुद्ध तुलनेने कमी सुविधा असलेल्या हम्पी शहराची भेटही लक्षात राहणारी होती. प्रवासामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात बदल होतो, तुम्ही अधिक खंबीर होता, असं मला जाणवलंय. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी एकटीनेच जाण्याची माझी इच्छा आहे आणि प्रयत्नही असणार आहे. एकटीने भारतीय शहरांत हिंडताना राहण्याचा प्रश्न सुरुवातीला जाणवला. पण मी आधीच चौकशी करून हॉटेल बुकिंग्ज केल्यामुळे आता प्रश्न जाणवत नाही.