गायत्री हसबनीस

आपल्या चेहऱ्यावरील त्वचेचा रंग आहे त्यापेक्षा अधिक उठावदार दिसावा म्हणून आपण फाऊंडेशन, कॉम्पॅक्ट हाताशी घेतो. मेकअप करण्यापूर्वी महागडे कॉम्पॅक्ट डिस्क वापरले जातात. सध्या लग्न म्हणू नका, सणवार म्हणू नका.. नटण्याथटण्यासाठी ही फक्त निमित्तं शोधली जातात. म्हणून सौंदर्य वाढवण्यासाठी कपडे, दागदागिने, चपला, अ‍ॅक्सेसरीज यांचे वेडच पसरलेले ई-बाजारात पाहायला मिळते. मात्र या सगळ्यांची लालूच असली तर चेहऱ्यावरची लाली वाढवायला कोणी विसरत नाही. कितीही फॅशन केली तरी चेहरामोहरा नुसताच उजाड ठेवून चालत नाही. मेकअप हवा, विविध क्रीम्स हवेत फेसपॅक हवेत. मग अर्थात चेहऱ्यावरील रंग खुलून दिसावा म्हणून कॉम्पॅक्टला विसरून चालणार नाहीच. कॉम्पॅक्ट महाग असो किंवा स्वस्त दिवाळी जवळ येऊ न ठेपली असल्याने फाऊं डेशन, कॉम्पॅक्ट पावडर यांची खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. तुमच्या चेहऱ्यावरच्या रंगाशी तंतोतंत जुळून येणाऱ्या काही स्पेशल कॉम्पॅक्ट प्रॉडक्ट आणि पॅक्सची या महिन्यापासून रेलचेल सुरू आहे.

* तुमच्या स्किन कलर टोनला मिळतेजुळते असे विविध प्रकारचे कॉम्पॅक्ट पावडरमध्ये मिळतील. ‘लॉरियल पॅरिस’ची ‘ट्रु मॅच’ पावडर तुम्हाला ७२५ रुपयांत मिळेल. ज्यात हनी, रोझ व्हॅनिला, रोझ बेज, गोल्ड सॅन्ड, गोल्डन बेज, कॅनल सिनॅमन या शेड्स आहेत. तसेच क्रीममध्ये ‘लॅक्मे’कडून ‘नाइन टू फाइव्ह’ सीसी क्रीम फाऊंडेशन २९९, ३२८ रुपये इतके आहे. ‘लॅक्मे’चेच ‘परफेक्ट रेडियन्स’ कॉम्पॅक्टही १५८ रुपयांपासून आहे. याच रेंजमध्ये ‘नोट’ आणि ‘डॅझलर’मध्येही कॉम्प्लेक्शन केअर पावडर आहेत.

* कॉम्पॅक्टच्या कूल, नॅचरल, वॉर्म अन्डरटोनमध्ये अनुक्रमे ‘आर २ सी २’ आणि ‘ आर ३ सी ३’, ‘डी ३ डब्ल्यू ३’, (पान ३ वर)  (पान १ वरून) ‘डब्ल्यू ५’, ‘डी ६ डब्ल्यू ६’ आणि ‘डब्ल्यू ७’ ही कलर रेंज लक्षात घ्यावी. त्यामुळे आपल्या स्किन कलरसाठी योग्य कलर टोन कोणता हे ओळखण्यास मदत होते. ‘फेसेस’ अल्टिमेट प्रो ईल्युमिनेटिंग पावडर कॉम्पॅक्ट ५५३ रुपयांपासून मिळेल. ‘इस्टि लाऊ डर’ कंपनीचा डबल वेअर स्टे पावडर ३,३३० रुपयांत मिळेल. नायकाचा थ्री इन वन कॉम्पॅक्ट तुम्ही सात शेड्समध्ये ४४९ रुपयांत घेऊ  शकता.

* फाऊं डेशन फक्त लिक्विडपुरते काम न करता अ‍ॅस्ट्रिन्ग्जंट, मॉस्चरायझर आणि सनस्क्रीन म्हणूनही काम करते. पण यातही मॉइश्चरायझर जास्त प्रमाणात वापरले जाते त्यामुळे त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक अशा काही निवडक प्रॉडक्ट्सचा विचार योग्य ठरेल. त्यातही ड्राय स्किनची समस्या लक्षात घेऊ नच प्रॉडक्ट खरेदी करा. ‘लॅक्मे’तर्फे नवीन पीच मिल्क इन्टेन्स मॉइश्चरायझर आले आहे. ३९९ रुपयांपासून तुम्हाला मिळेल. ‘बायोआयुर्वेदा’चे कॉम्प्लेक्शन केअर टिन्ट मॉइश्चरायझर फेस क्रीम १,८५५ रुपयांत उपलब्ध आहे. ते तुम्ही त्वचेच्या रक्षणासाठी म्हणूनही वापरू शकता. ‘न्यूट्रोजिना’चा हेल्दी स्किन कॉम्पॅक्ट १,०२० रुपयांपासून १,६७८ रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

* लॉन्ग लास्टिंग प्रॉडक्ट हे क्रीम, लिक्विडमध्येही मिळते असा काहींचा समज असतो पण इथे ऑइली स्किनचाही विचार करावा. त्यामुळे क्रीम किंवा लिक्विड वापरण्यापेक्षा पॅनस्टिक फाऊंडेशन वापरणे योग्य ठरेल. ‘कलरेसन्स’चे रोलॉन पॅनस्टिक पिंक बेज १७५, ३८४ रुपयांत तर ‘एन.वाय.एक्स’ कंपनीचेही मेकअप स्टिक मिळेल ज्यात युनिव्हर्सल, टॅन, डीप रिच हे टोन आहेत. ८३५ रुपये एवढी त्याची किंमत आहे. यावर तुम्हाला फ्री ऑफर्सही मिळतील. ‘मेबेलिन न्यूयॉर्क ’चे ‘फिट मी’ पॅनस्टिक टॉफी, बफ बेज, नॅचरल बेज, पोर्सलेन, प्युअर बेज टोन्स ५५० रुपयांत उपलब्ध आहे.

* ‘एवॉन’मध्ये जास्तकरून लिक्विड फाऊं डेशन उपलब्ध आहे. ६०० रुपयांपासून त्यांची किंमत आहे. ‘मॅक’ या ब्रॅण्डचे रुपये ७९९ पर्यंत कॉम्बो पॅक्स मिळतील. यावेळी लिक्विड फाऊं डेशनपेक्षा कॉम्पॅक्टचे पर्याय भरपूर उपलब्ध करून देण्यात आले आहेत व मोठय़ा ब्रॅण्डकडून कॉम्पॅक्टला स्फूर्ती दिलीये. मुख्य म्हणजे यात भरपूर शेड्स आहेत ज्या मेकअपला आधार देतील. १४४ रुपयांत लॅक्मे रोझ फेस पावडर आहे ज्यात फिकट गुलाबी रंग आहे. १६० रुपयांचे मेबेलिन न्यूयॉर्क व्हाइट सुपर फ्रेश कॉम्पॅक्ट आहे ज्यात मॅट व पोअरलेस फाऊंडेशन १४ शेड्समध्ये आहे. ‘लोटस’कडून तुम्हाला हर्बल लिक्विड फाऊं डेशन २९२ रुपयांत मिळेल. तर ‘ब्लू हेवन’चा कॉम्बो पॅक तुम्ही १३० रुपयांत घेऊ  शकता.

* फाऊंडेशन चेहऱ्यावरील ऑइलही कंट्रोल ठेवते, तुम्ही तेही अप्लाय करु शकता. लॅक्मे अ‍ॅब्सोल्यूट ऑरगन ऑइल सिरम फाऊंडेशन हे रोझ सिल्क आणि आमंडमध्ये ५७८ रुपयांत मिळेल. ‘मार्स’ व ‘डर्मोकोल’ कंपनीचे ऑइल कंट्रोल फाऊंडेशन २२५ रुपयांत मिळते, मात्र अ‍ॅन्टिऑक्सिडंट, हायड्रेड ऑइल फाऊंडेशनचा विचार जास्त करावा. ‘ग्लॅम २१’ या ब्रॅण्डकडून अ‍ॅन्टिऑक्सिडंट ऑइल कंट्रोल स्किन फाऊं डेशन ३५० रुपयांत मिळेल.

यावेळी लिक्विड, पावडर, पॅनस्टिक, सिरम इत्यादीचा वापर वाढला आहे. त्यामुळे रोजच्या ब्रॅण्डपेक्षा त्वचेच्या आरोग्य्याच्या दृष्टीने विविध प्रकारच्या ब्रॅण्डचा विचार तुम्ही अमलात आणू शकता. फाऊं डेशनचाही स्किनकेअरसाठी विविध अंगाने वापर करता येईल का हेही नक्की पाहावे.