परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे, पण तोलही जायला नको. करता येईल असं? स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी दर आठवडय़ाला..

सहाचा अलार्म वाजला. तिनं आळसटून तो बंद केला आणि पांघरूण डोक्यावर घेतलं. पुन्हा झोपेच्या गुंगीत जाता जाता तिला एकदम आठवलं, ‘आज सोमवार!’ तिची झोप पुरती उडाली आणि ती ताडकन उठली. दात घासता घासता गिझर चालू केला आणि कामाला लागली. सगळ्या गडबडीत गरम पातेल्याचा चटका बसला आणि तिला धस्स झालं. ‘झालं, सुरुवातच अशी झाली आजच्या दिवसाची! आता दिवसभर काही खरं नाही.’ त्या विचारानं तिचं काहीच लवकर आवरून होईना. ‘या आईला पण ना, आजच गावाला जायचं काही नडलं होतं का?’ चिडचिड करीत तिनं डबा भरला. एकापाठोपाठ चार-पाच कपडे ट्राय केले. फायनली एक साधासाच काळा टॉप आणि जीन्स निवडली. केसांची पोनी बांधली, मग ती सोडून हाय पोनी बांधली आणि शेवटी केस मोकळेच सोडायचं ठरवलं. लिपस्टिक लावावी की नको? तिचा निर्णय होईना. ‘बाप रे, बघता बघता झाली की जायची वेळ!’ तिच्या छातीत धडधडायला लागलं. नुकतीच जुहीला एक छोटीशी नोकरी लागली होती. आज त्या नवीन नोकरीचा पहिला दिवस!

How to Make Home Made Instant Chilli Rice Dhokla with Leftover Rice Not The Tasty And Quick Recipe
रात्री उरलेल्या भाताचे काय करायचं असा प्रश्न पडलाय ? मग ‘हा’ पदार्थ बनवून पाहा; झटपट होणारी रेसिपी लगेच नोट करा
Operation Nanhe Farishte 1064 children were rescued
‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ काय आहे माहितीये का? मायेला मुकलेल्या चिमुकल्यांना…
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात

तिला मागच्या वर्षीची पूजाची पार्टी आठवली. जुहीला तिथे जाण्याचं इतकं टेन्शन आलं की तिची झोप उडाली होती. शेवटी ऐन वेळी तिनं पूजाला कळवून टाकलं बरं वाटत नाही म्हणून. नेहमी असंच व्हायचं. लोकांशी इंटरअ‍ॅक्ट करायचं म्हणजे तिच्या अंगावर काटा यायचा, तळव्यांना घाम फुटायचा आणि पोटात कसं तरी व्हायला लागायचं. काही वेळा उलटीही व्हायची. प्रचंड टेन्शन यायचं. स्टेजवर जाऊन बोलणं तर सोडाच, वर्गात उभं राहून उत्तर देणं म्हणजेसुद्धा ब्रह्मांड आठवायचं तिला. घरी कोणी पाहुणे आले की तेच. ही आतल्या खोलीत जाऊन बसणार. किती वेळा आईची बोलणी खाल्ली यावरून. शेवटी आई सारवासारव करायची, ‘ती जरा शाय आहे!’ एक-दोन मैत्रिणी सोडल्या तर ती फारसं कुणाशी बोलायची नाही. सारखी मागे मागे राहायची. बाबा सांगायचे, ‘अगं, आजच्या जमान्यात असं वागून कसं चालेल? बोलायचं बिनधास्त!’

या अशा अडचणीला एक नाव आहे, Social Anxiety Disorder (SAD) मुळात ही असते समाजात वावरायची भीती. तसं बघायला गेलं तर याचा एक स्पेक्ट्रम असतो. थोडय़ाशा लाजाळूपणापासून ते हतबल व्हायला लावणाऱ्या प्रचंड धसक्यापर्यंत! जितके आपण ‘लोग क्या कहेंगे’ हा विचार करतो, तितकी ही चिंता अधिक छळते. मित्र-मैत्रिणी नसणे, सगळीकडे मागे पडणे, महत्त्वाच्या गोष्टी टाळणे, स्वत:च्या कोशात राहणे, अ‍ॅडिक्शन्स, एकाकीपणा, नोकरी-धंद्यात न जमणे असे याचे किती तरी परिणाम. आणि त्याचबरोबर आपण सोशल का नाही आहोत, आपल्याला कोणीच मित्र नाहीत, कोणी आपल्याला गटात घेत नाही, याबद्दल वाईटही वाटतं. जी माणसं इंट्रोव्हर्ट असतात त्यांना या सगळ्यामुळे काही फारसा फरक पडत नाही. कारण मुळात त्यांना एकटं राहायला आवडतं. पण बुजरे लोक मात्र मनापासून असं वागत नसतात. आपण लोकप्रिय व्हावं, समूहामध्ये ठामपणे आपल्याला बोलता यावं, खूप सारे दोस्त असावेत अशी त्यांना सुप्त इच्छा असते. पण वेळ येते तेव्हा मात्र ते हाय खातात. खूपदा त्या प्रसंगाचं इतकं भयानक काल्पनिक चित्र उभं करतात की तिथे पोहोचण्याआधीच त्यांचे हातपाय गळालेले असतात, तोंडाला कोरड पडलेली असते, काखा घामानं ओल्याचिंब झालेल्या असतात. हातात काही तरी घट्ट धरून ठेवणं, बोटं मोडणं, अस्वस्थ हालचाली करणं, मनातल्या मनात काय बोलायचं याची उजळणी करणं, असं सगळं सुरू होतं. काही वेळा स्मोकिंग किंवा ड्रिंक्सचा पांगळा आधार घेतला जातो. ही भीती अकारण असली तरी इतकी तीव्र असते की त्याचा एक मोठ्ठा बागुलबुवा तयार होतो. तुम्ही हॅरी पॉटरचे सिनेमे पहिले असतील तर त्यात एक बोगार्ट असतो. आपल्या मनातल्या वाईटातल्या वाईट भीतीचं रूप हा बोगार्ट घेतो. पण हॅरी जेव्हा न घाबरता त्याला सामोरा जातो तेव्हा तो धुक्यात विरून जातो.

एखादी गोष्ट टाळणं हा उपाय नाही हे जुहीला कळत होतं, पण वळत नव्हतं. या वेळी मात्र तिनं ठाम निश्चय केला नोकरी मिळवण्याचा. पूजाच्या सल्ल्यानं ती तिच्या सायकॉलॉजिस्ट मैत्रिणीला भेटली. तिनं तिचं काऊन्सेलिंग केलं. ती म्हणाली, ‘तुला नक्की कशाकशाची भीती वाटते याची एक लिस्ट कर. तिथे नकळत केल्या जाणाऱ्या अननेसेसरी हालचाली अव्हॉइड कर. प्रत्येक जण स्वत:तच इतका मश्गूल असतो की तुझं अस्वस्थ होणं त्यांच्या लक्षातही येत नाही. आणि आलं तरी त्यांना फारसा फरक पडत नाही. शिवाय अशा प्रसंगांना तोंड देऊन आल्यावर त्यात आपलं काय काय चुकलं यावर कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा तुला काय करता आलं याबद्दल स्वत:ला शाबासकी दे. स्वत:ला सांग की जमेल मला.’

नेहमी होणारे सगळे त्रास याही वेळी जुहीला झालेच, पण तसंच दामटून ती इंटरवूामध्ये बोलली. आणि तिला चक्क मिळाली की ती नोकरी! आता तिला थोडा कॉन्फिडन्स आलाय. अचानक ती अतिशय धाडसी, आऊटगोइंग मुलगी होणार नाहीये हे तिला माहितेय. पण त्या बुजरेपणावर कामापुरती तरी मात करायचं तिनं ठरवलंय.

viva@expressindia.com