19 January 2019

News Flash

‘कूल’ समर

समर सीझनला समर हॉलिडेजपासून ते डेस्टिनेशन वेडिंगपर्यंत काही खास वेअर्सची चर्चा रंगते आहे.

उन्हाळा डोक्यावर तापला आहे त्यामुळे त्यावर थंडाव्याच्या हमखास उपायांपैकी एक म्हणजे समर कलेक्शन आणि त्यांची खरेदी. दुकांनापासून वेबसाइट, सोशल मीडियापर्यंत सगळीकडेच समर कलेक्शनची चर्चा आहे. काही खास ब्रॅण्ड्स आणि डिझायनर्सनी आपले समर कलेक्शन लाँच केले आहे, तर काही लाँच करण्याच्या तयारीत आहेत. सध्या सेलेब्रिटी ब्रॅण्डसमुळे विविध प्रयोग करणे ओघाने आल्याने नवे काही पर्यायही उपलब्ध झाले आहेत. पण त्यातूनही सध्या पांढऱ्या रंगापासून, फ्लोरल डिझाइन, जम्पसूट, स्वीमसूट, सिल्क फॅब्रिकपर्यंत बऱ्याच गोष्टी ट्रेंडमध्ये आहेत. त्यामुळे समर सीझनला समर हॉलिडेजपासून ते डेस्टिनेशन वेडिंगपर्यंत काही खास वेअर्सची चर्चा रंगते आहे.

हल्ली कोणत्याही मोसमातील कलेक्शन असो बॉलीवूड अभिनेत्री आणि त्यांचे ब्रॅण्ड्स आधी डोकं वर काढतात. आघाडीची अभिनेत्री असलेल दीपिका पदूकोणच्या ‘ऑल अबाऊ ट यू’ या लेबलने रेड, नॉटिकल, मडी ब्राऊन, ग्रीन या रंगाचा हेरिटेज लुक समर कलेक्शनसाठी आणला आहे. त्याचबरोबर पलाझो, लाँग पॅण्ट्स, ऑफ शोल्डर, फु ल हॅण्ड, मॅचिंग फूटवेअर आणि डॉटेड डिझाइनमध्ये ‘वन साइड ऑफ शोल्डर’ लुक आणला आहे. उन्हाळा आणि पांढऱ्या रंगाचा संबंध जुनाच आणि शास्त्रीय आहे त्यामुळे यावर्षीही हा रंग ट्रेंडमध्ये आहेच. ‘मिन्त्रा’वर सध्या हे ट्रेण्डस उपलब्ध आहेत. सोनम कपूरच्या ‘रीझन’ या ब्रॅण्डखाली लाँग हॅण्ड फ्लोरल पॅटर्न टाईप ओपनिंग असणारे सी कलरचे आयलण्ड, बीच वेअरप्रमाणे टी-शर्ट्स आणले आहेत. ‘शॉपर्स स्टॉप’मध्ये ‘रीझन’चे कलेक्शन उपलब्ध आहे. अनुष्का शर्माच्या ‘नूश’ या लेबलखाली बेल्ट्स, लायनर जम्पसूट, पांढऱ्या व काळ्या रंगात ग्राफिक्स असलेला जिम वेअर, जॉगिंग वेअर टाईप स्लिवलेस टॉप, पजामा असे स्टाइल्स् आणले आहेत. तसेच लवकरच ती नवीन समर कलेक्शनही लाँच करणार आहे ज्यात फ्लोरलवर भर असेल. मलायका अरोरा, सुझ्ॉन खान आणि बिपाशा बासूच्या ‘द लेबल लाइफ’द्वारे स्वीमसूट सेमी लायनिंग पद्धतीचे आणले आहेत, तर चिक फॅ ब्रिकचे पलाझो, चेक्समधील ट्राऊ झर, शॉर्ट्स, बेल्ट्स व क्रॉस स्टिचचे फुल हॅण्ड टॉप्स, पेपरमिंट ह्य़ू वन पीस आणले आहेत. तर आलिया भटच्या ‘स्टाइल कॅ्रकर’मध्ये ‘ब्लॅक फ्लोरल ट्रॅडिशनल’ तर बीच वेअरसाठी स्लिव्हलेस टॉप्स, नेट पॅटर्नचे बीच वेअरसाठी टॉप्स, ऑफ शोल्डर, डेनिम जॅकेट्स, डेमिन शॉर्ट्स आणले आहेत. त्यामुळे समर वेअरसाठी विविध सेलेब्रिटी पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत.

डिझाईनर कीर्ती तुलाच्या ‘डूडएज’ या लेबलखाली तिने पोलका डॉटच्या साइड सिमच्या पॅटर्नमध्ये यॉक टाईप फुल हॅण्ड वन पीस आणले आहेत, त्यामुळे पाठच्या बाजूला एक वेगळाच लुक मिळतो. तसेच फ्री साइजमध्ये ‘प्लिट व्रॅप जॅकेट्स’ही आणले आहेत. शिवाय, फ्लोरल आणि लायनिंग पॅटर्नमध्ये ग्राफिक्स व डूडलिंग डिझाईनर वन पीस, जम्पसूट, गाऊ न, किमोनो रोब पाहायला मिळतील. स्लोगन प्रिंटमध्ये टय़ूनिक, चिक फॅब्रिकचे शर्ट्स आणि लाँग जॅकेट्स आणले आहेत. खास उन्हाळ्यात विण्टेज लुक कॅरी करायचा असेल तर पॅचवर्कवर जास्त भर देत असल्याचे कीर्ती सांगते. एथनिक वेअरसाठी पूर्ण बंद पॅटर्नचे कपडे या वेळी उठावदार दिसतील, असेही तिने सांगितले. रीना सिंग या डिझाइनरचा ‘एका’ हाही नावाजलेला ब्रॅण्ड आहे. या लेबलअंतर्गत तिने डॉटेड डिझाइनवर पांढरा आणि फिकट गुलाबी रंग वापरून प्रयोग केले आहेत. त्यातून समर सीझनमध्ये अंग झाकणारे हॅण्डवूलन, ऑरगेंजा फॅब्रिकचे ब्लॉक प्रिंटेड, स्ट्राईप, लिनन टय़ुनिक, फ्लोरल एम्ब्रॉयडरीतील मल्टिस्ट्राईप लिनन ड्रेस तसेच ऑरगेंजा फॅ ब्रिकचे स्कार्फ उपलब्ध क रून दिले आहेत. तिनेही पांढऱ्या रंगावर जास्त भर दिला आहे. तर स्लिपपासून इनर पद्धतीचे सन बेक्ड कलरच्या कियारा टय़ुनिकवरही भर दिल्याचे पाहायला मिळते. ‘पॅण्टेलून्स फॅ शन’ने या वेळेस खास कलेक्शन आणले आहे. त्यात स्लोगन टी, कोरसेट बेल्ट, टायर्ड मेश टॉप, स्ट्राइप बॉडीकोन ड्रेस, चेक्स मिनी स्कर्ट, पिनाफोर लेस कॉल्ड शोल्डर टॉप, टायअप कुलॉट्स, स्ट्राइप टॅन्क, मेश बॉम्बर, टायफ्रन्ट कुलॉट, बॉण्डेज बॉडीकोन ड्रेस अशा विविध हटके स्टाइल्स बाजारात आणल्या आहेत.

समर सीझनमधील डिझाइनर्सचे ट्रेंड्स

आकर्षक प्रिंट्स

डिझायनर पायल प्रताप हिने स्ट्राइप्स, चेक्स, बॉटनिकल प्रिंट्स, क्रीम व इंडिगो या रंगाचा वापर जास्त केला आहे. तर श्रुती संचेतीने बोहेमियन लुकसाठी पांढऱ्या रंगाचा प्रिंट फॅक्टर आणला आहे ज्यात कॅज्युअल वेअरसाठी लाँग स्कर्टही ट्रेण्डमध्ये आहे. डिझाइनर वेण्डेल रॉड्रिग्जने कपडय़ांवरच्या क्राफ्टिंगचा उत्तम मिलाफ सादर केला आहे. ज्यात डार्क व फिकट रंगांचे उत्तम कॉम्बिनेशन आहे. तसेच स्टोल किंवा स्कार्फप्रमाणे वेण्डेलच्या लिफ-शेप सिल्हाऊटचा विचार करायला हरकत नाहीच, ज्यात त्यानेही बेल्ट व लाँग स्कर्टचा पर्याय खुला ठेवला आहे. त्याच्या क्राफ्टिंगमुळेच (कपडय़ांच्या डिझाइन रचनेत केलेल्या प्रयोगामुळे) लाइन पॅटर्न जास्त आकर्षक दिसतो. स्ट्राइप्सप्रमाणे पोल्का डॉटच्या ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट’ पद्धतीचाही स्प्रिंग लुकही वाखाणण्याजोगा आहे. अनुज मोदीने पांढरा रंग ट्रेंडमध्ये ठेवताना डायिंगवर जास्त भर दिलाय त्यामुळे पट्टेरी व फ्लोरल लुकसाठी अनुज मोदीचे कुर्त्यांचा विचार नक्कीच करता येईल.

फूटवेअर

लेदरचे रॉयल स्टाइल फूटवेअर ‘द लेबल लाइफ’ने आणले आहेत. निकिता सिंगने न्यूड लेसअप शूज आणले आहेत. तर ईशा धिंग्राचे व्हाईट मोकॅझिन्स शूज तसेच फ्लॅट सिपऑन्स शूज पार्टीवेअरसाठी मस्त वाटतील. अनामिका खन्नाचे ब्लॅक बूट्स, सुमिरन कबीर शर्माचे ग्लॅडिएटर्स अनिता डोंगरेचे एम्ब्रॉयडरीतले स्लिपऑन हे ब्रायडल वेअरसाठी योग्य ठरतील. मेन्सवेअरमध्ये आयुषमान मित्राचे प्लॅटफॉर्म ऑक्सफॉर्ड्स तर राजेश प्रताप सिंगचे ट्रॅकिंग बूट्स खास समर कलेक्शनसाठी आणले आहेत. तरुण ताहिलीयानीचे सिण्ड्रेला हिल्सही ट्रेण्डमध्ये आहेत.

अ‍ॅक्सेसरीज

अनुपमा पायलचे शेल, सी स्टोन लाँग नेकपीस हा सी साइड लुक ट्रेंडमध्ये आहे. शंतनू निखिलचे ब्लेट बक्लस, ट्राइबल पद्धतीचे नेकपीस, पाम रिंगचाही वापर आऊ टवेअरसाठी होऊ  शकतो. अंजली पटेल मेहताचे टास्सेल (मोठे नेकपीस), फॅ ब्रिक इयरिंग्ज टय़ुनिकसोबत आकर्षक वाटतील. तर कप्रेसीचे चीक वॉलेट्स, क्लच, बॅकपॅक व फाल्गुनी शेन पिकॉकचे जामदनी खादी बॅग्जही ट्रेंडमध्ये आहेत.

समर वेडिंग

या समर सीझनलाही लग्नाच्या पेहरावासाठी फ्लोरलाच फॅशन डिझायनर्सची पसंती आहे. पण फार फ्लोरल वाटू नये म्हणून सब्यसाचीने उष्ण रंगसंगतीच्या रंगांना खूप महत्त्व दिलंय. रंगांचा अफलातून कॉण्ट्रास त्याने वापरला आहे. त्यामुळे या समर सीझनला लग्नासाठी रंगांचे उत्तम पर्याय त्याने आणले आहेत. निळा-पोपटी, हिरवा-गुलाबी, जांभळा-पिवळा आणि पांढरा यातल्या कॉण्ट्रासचे पर्याय समर ब्राइडल वेअरसाठी आहे. सध्या मार्केटमध्ये फिक्या रंगसंगतीच्या लेहेंग्यापासून, साडी, जम्पसूट तसेच मेन्सवेअरमध्ये नेहरू जॅकेट, शेरवानी यांना जोरात मागणी असेल. त्याचप्रमाणे ऑरगेंझा फॅब्रिकचा वापर त्याने केला आहे त्यामुळे समर कलेक्शनसाठी या फॅ ब्रिकपासून तयार केलेल्या खासकरून टॅ्रॅडिशनल लुक म्हणून इव्हिनिंग वेअरसाठी उपयोग करू शकता.

बीचवेअर

सेमी लायनिंग, स्ट्राइप स्वीमसूट खासकरून रेड, ब्ल्यू रंगांमध्ये ‘द लेबल लाइफ’ने आणले आहेत. त्यातही गोल्डन कलर ट्रेंडमध्ये आहे. व्हाइट स्ट्राइपचा बिकिनी लुक, व्हाईट रीम समग्लासेस, खादी कलर हॅट्स, फ्लोरल बीचवेअरही ‘जबाँग’वर उपलब्ध आहेत. तसेच ट्रान्सपरंट स्टॉलही पांढऱ्या, पिवळ्या रंगाचे बीचवेअर म्हणून मस्त वाटतील.

फॅशनचा विचार करता सध्या सोशल मीडिया हा परवलीचा शब्द झाला आहे. चोवीस तास ऑनलाइन राहून फॅशन डिझायनर्स, ब्रॅण्ड्सना फॉलो करणं, त्यांच्या नवनव्या कलेक्शनवर नजर ठेवणं सोपं झालं आहे. त्यामुळे नवं काय हे कळत असलं तरी कित्येकजा त्या ड्रेसची वैशिष्टय़ लक्षात न घेताच आपण तो खरेदी करतो. त्यामुळे नक्की कोणता ड्रेस सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी आणि रात्री पार्टीवेअर म्हणून वापरावा यातला गोंधळ कमी करण्यासाठी ‘फोरएवर ट्वेण्टीवन’ने काही खास कलेक्शन आणले आहेत. त्यात जीन्समध्ये फ्लोरल प्रिंट असलेले डेनिम्स, हॉरिझोन्टल स्ट्राइप टॉप, बेल बॉटम पॅण्ट, बटन स्कर्ट, मल्टिस्ट्राइप स्वीमसूट, पोलका डॉटेड शर्ट्स, फ्लोरल जॅकेट हे अगदी सिम्पल कॅज्युअल वेअर म्हणून वापरू शकतो. नेहमीपेक्षा या वेळी खास समरसाठी खरोखरच ‘कूल’ वाटतील आणि करता येतील असे भरपूर पर्याय खरेदीसाठी उपलब्ध आहेत. मग वाट कसली पाहताय..

viva@expressindia.com

First Published on March 30, 2018 12:32 am

Web Title: summer fashion summer clothes collection