News Flash

टॅटूचा नवा ट्रेण्ड

टॅटू विश्वातही या मंडल टॅटूजचं बरंच प्रस्थ आहे

शरीरावर नक्षीकाम करण्यासाठी टॅटू हे माध्यम तरुणाईमध्ये सध्या सर्वाधिक लोकप्रिय आहे. मुला-मुलींमध्ये हा अगदी कॉमन ट्रेण्ड आहे. जुन्या जमान्यातील गोंदवून घेण्याचं टॅटूइंग होऊन आणि तो जागतिक ट्रेण्ड होऊनही अनेक वर्ष झाली. या टॅटूमध्ये वेगवेगळ्या नक्षीकामाचे ट्रेण्ड सेट होत असतात. काही वर्षी स्वत:चं किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचं नाव टॅटूमध्ये गोंदवून घ्यायचा ट्रेण्ड होता. नंतर ग्रीक देवता, ओम, धार्मिक चिन्ह, वेगवेगळ्या लिपीतली नावं गोंदवून घ्यायची फॅशन आली. सध्या सगळ्यात जास्त चर्चा आहे जॉमेट्रिक टॅटूजची.

जॉमेट्रिक अर्थात भौमितिक रचना असणारी टॅटू एक वेगळीच परिभाषा सांगून जातात. त्या डिझाइनमध्ये लपलेला गíभतार्थही तितकाच रंजक. टॅटूप्रेमींमध्ये अशा प्रकारचे टॅटू प्रसिद्ध होण्यामागे सेलेब्रिटींनी केलेली जॉमेट्रिक टॅटू हे कारण आहेच. पण या डिझाइन्समध्ये हवं तितकं वैविध्य आणता येतं. केवळ टिंब (डॉट्स ) आणि रेषा (लाइन्स) वापरून भन्नाट रचना साकारता येते, त्यामुळे या डिझाइन्सची तरुणाईला भुरळ पडली आहे. भौमितिक रचना अगदी बारकाईने साकारताना टॅटू आर्टिस्टचं कसब मात्र पणाला लागतं.
टॅटू अधिक बोल्ड आणि ठळक बनवण्यासाठी त्याला रंग आणि थ्रीडी डिझाइन्सची साथ दिली जाते. वर्तुळ, चौकोन असे भौमितिक आकार वापरून त्यातून सुरेखसा टॅटू साकारला जातो. असे ‘एलिअन्स टॅटू’चं व्यवस्थापकीय संचालक सनी भानुशाली यांनी सांगितलं. अभ्यासात गोंधळवून टाकणारा भूमिती हा विषय टॅटूच्या रूपात मात्र तरुणाईला आकर्षक वाटतोय. टॅटूप्रेमींसाठी जॉमेट्रिक टॅटूज फार आकर्षणाचा आणि कुतूहलाचा विषय ठरतो. जॉमेट्रिक टॅटूजचे विशेष आकार आणि त्यात दडलेला अर्थ यांमुळे ते नेहमीच सुप्त आकर्षणाचा भाग ठरतात. त्यामुळे मोजक्याच डिझाइन्सपेक्षा आउट ऑफ द बॉक्स जात जॉमेट्रिक डिझाइन्स फॉलो करायला पूर्ण वाव असतो. बीईंग जॉमेट्रिक इज न्यू थिंग.
6
                                                                नैसर्गिक आणि भौमितिक आकारांचा संयोग

जॉमेट्रिक टॅटूचे वेगवेगळे प्रकार

मंडल टॅटू : विश्व, त्यातील ग्रह-तारे असे घटक चिन्हाच्या स्वरूपात मांडण्यासाठी मंडल या आकाराचा वापर हिंदू धर्मात सांस्कृतिक आणि धार्मिक सीमा दर्शवण्यासाठीही केला जातो. टॅटू विश्वातही या मंडल टॅटूजचं बरंच प्रस्थ आहे.ऑरोबोरस टॅटूज
: मंडलाप्रमाणेच ऑरोबोरस हादेखील अनेकांकडून पसंती मिळणारा एक आकार.. सरपटणाऱ्या प्राण्यासारखा.. ग्रीक पुराणकथांमध्ये या चिन्हाचा अर्थ होतो ‘ड्रॅगन.’ सरपटणाऱ्या एकमेकांपासून विरुद्ध पण तरीही समरूप असणाऱ्या ‘यीन व यँग’ एनर्जीजसोबतही या ऑरोबोरस टॅटूजची तुलना केली जाते.
5

ओव्हल टॅटूज : ओव्हल किंवा अंडाकृती आकार म्हणजे कोणा एका तरबेज प्राण्याचं किंवा गुप्ततेचं प्रतीक मानलं जातं. जॉमेट्रिक टॅटूजमध्ये या आकाराचा हमखास वापर केला जातो. त्याामुळे टॅटूला उठाव मिळून त्यातील सांकेतिक गोष्टी आणखीन ठळक होतात.
7
(टॅटू आर्टिस्ट सनी भानुशाली यांनी दिलेल्या माहितीवर आधारित)

viva.loksatta@gmail.com

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 1:57 am

Web Title: tattoo trends
Next Stories
1 हैं कोई जवाब?
2 नृत्यसंगीताचा डिजिटल अवतार
3 फ्लावर
Just Now!
X