22 September 2020

News Flash

नया है यह : हेअर टू स्किन केअर..

कामा’ या ब्रॅण्डकडून विविध प्रकारचे अंगरक्षक साबण आणि ऑइलचा लाभ एकत्रितपणे मिळेल

(संग्रहित छायाचित्र)

गायत्री हसबनीस viva@expressindia.com

वाढते प्रदूषण आणि त्याच्या परिणामामुळे सर्वात जास्त चिंता सतावते ती केस आणि त्वचेची. या सीझनमध्ये आपल्या केसांची, त्वचेची निगा राखणं महत्त्वाचं असल्याने त्या संदर्भातील उत्पादनांचा शोध हा अनिवार्य आहे. केसांचा विचार केला तर आयुर्वेदिक तेल, कंडिशनर आणि शॅम्पूपासून अनेक गोष्टींचा शोध घेतला जातो, तर थंडीत कोरडय़ा पडणाऱ्या त्वचेसाठीही कोल्ड क्रीम लोशनचे पर्याय शोधले जातात. या वेळी आयुर्वेदिक उत्पादनांवर एक नजर टाकूयात. अ‍ॅलोवेरा एक्स्ट्रॅक्ट, ग्रेप सीड एक्स्ट्रॅक्ट, हनी एक्स्ट्रॅक्ट, कोल्ड प्रेस्ड स्वीट आमंड ऑइल, कोल्ड प्रेस्ड व्हीटजर्म ऑइल आणि व्हिटॅमिन ‘इ’ अ‍ॅसिटेट असे उपयुक्त गुणधर्म असणाऱ्या हेअर ऑइल्स, बॉडी ऑइल्स आणि हर्बल, अ‍ॅलोवेरा, चारकोल अशा वैविध्यपूर्ण साबणांचा लाभ तुम्ही घेऊ शकता..

’ ‘न्यासा’ या ब्रॅण्डकडून विविध प्रकारचे ऑइल आणि सोप्स उपलब्ध (अंगाचे साबण) आहेत. त्यांचे वर्जिन कोकोनट ऑइल हा नवीन पर्याय ठरू शकतो. या ऑइलने त्वचा मुलायमही होते आणि त्वचेवरचा ग्लोसुद्धा दोन दिवस टिकतो. हे कोकोनट ऑइल केसांचीही काळजी घेते. यात प्रामुख्याने माइल्ड फ्रॅग्रन्स असल्याने इतर फ्रॅग्रन्स ऑइलसह तुम्ही केसांवर आणि त्वचेवरही ते अप्लाय करू शकता. याची किंमत ३४९ रुपये इतकी आहे. याशिवाय ‘न्यासा’चे टेम्पल मोगरा फ्रॅ ग्रन्स ऑइलही ९०० रुपये, तर फक्त हेअर ऑइल २६९, ३००, ५०० रुपयांपर्यंत ‘शॉपर्स स्टॉप’च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. यांचे तुम्हाला विविध पॅक्सही मिळतील ज्यांची किंमत ६७४, रुपयांपासून १,८९०, १,४३९ रुपयांपर्यंत आहे, ज्यात ‘अंडर द ओशन’, ‘सेक्रेड सॅन्डलवूड’, ‘बेरी बेरी’, ‘मनाना कुबाना’ हे फ्रॅ ग्रन्स मिळतील.

’ ‘इनातूर’ या ब्रॅण्डचे ऑलिव्ह ऑइल ३५० रुपयांत चेहरा, त्वचा, केस या तिघांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. या ब्रॅण्डची खासियत म्हणजे यांच्या प्रॉडक्ट्सतर्फे तुम्हाला अरोमा थेरपी मिळते. याच ब्रॅण्डचे मोरोकन ऑर्गन ऑइल ५१९ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. हेअर सिरम तुम्हाला १०० रुपये, तर हेअर ऑइल २०० रुपयांत उपलब्ध आहे. ऑर्गन हेअर सिरम तुम्हाला ५१२ रुपये, तर आमंड ऑइल ५४८ रुपये एवढय़ा किमतीत आहे. हे तुम्हाला ‘अ‍ॅमेझॉन’ आणि ‘स्नॅपडील’वर स्वस्त दरात मिळेल. इनातूरचे अ‍ॅसेन्शियल ऑइल्स ४५० रुपये एवढय़ा किमतीत आहे. त्यात हर्बल बर्गमोट प्युअर ऑइल ४६०, ६०० रुपये इतके खर्चीक आहे, यात रोझ अ‍ॅसेन्शियल ऑइलही आहे. ६०३ रुपयांचे ऑरगन ऑइल कन्डिशनरही तुमच्या बजेटमध्ये आहे. याशिवाय हेअर मास्क तुम्ही ५५७ रुपयांत विकत घेऊ  शकता. कास्टर ऑइल ३३२ रुपये, तर ब्राह्मी तेल, कापूरादी तेल, महानारायण तेल हे काही शुद्ध पारंपरिक हेअर ऑइल तुम्हाला ६१८ रुपये एवढय़ा दरात मिळतील. हर्बल जिंजर हेअर ऑइल ४५० रुपये, तर हर्बल कोकोनट ऑइल ३३६ रुपये एवढय़ा किमतीत मिळतील.

’ ‘कामा’ या ब्रॅण्डकडून विविध प्रकारचे अंगरक्षक साबण आणि ऑइलचा लाभ एकत्रितपणे मिळेल. यात कामा आयुर्वेदा सुगंधादी बॉडी ट्रीटमेंट १,२५० रुपयांत मिळेल. यात जे जेली लीफ आहे ते त्वचेला कोमल आणि मुलायम राखण्यासाठी उपयुक्त आहे. यातील चेरी आणि अश्वगंधा सूर्यकिरणांपासून त्वचेला सुरक्षित ठेवते. सिसामम इंडिकम ऑइलमुळे केस गळणे तर थांबतेच त्याशिवाय माती, धूळ, प्रदूषण यांपासूनही बचाव होतो. कामाचे कोकम आमंड बॉडी बटर ६९५ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. ज्वालिनी आणि नल्पाम्रादी स्किन ट्रीटमेंट ४९५ रुपयांत आहे. कामा आयुर्वेदा ब्रिंगाडी हेअर ट्रीटमेंट ८९५ रुपये एवढी आहे. ‘कामा’चं कुकुमादी फेसस्क्रब १,१९५ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. मधुवती आणि हंसध्वनी अ‍ॅसेन्शियल ऑइलही ८२५ रुपये एवढय़ा किमतीत आहे. त्यांचा टर्मरिक साबण ५९५ रुपये, तर ऑरगॅनिक सिसम ऑइल ६९५ रुपये आहे.

’  ‘ओमवेद’चा हॅन्डमेड नीम आणि तुलसी साबण ४०४ रुपयांत मिळेल. यात अ‍ॅन्टी जर्म फॅक्टर आहे. खादी नॅचरल्सचा ‘आयुर्वेदिक प्युअर नीम सोप’ १७९ रुपयाच्या पॅकमध्ये मिळेल. ‘खादी हर्बल नीम सोप’देखील ११९ रुपयांच्या पॅकमध्ये मिळेल. याशिवाय, खादीचे ‘लावण्या प्लांट मास्क’ही आयुर्वेदिक असून ४९५ रुपयांत उपलब्ध आहे. खादीचे यांग ऑइल २६० रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. जॅस्मिन ऑइल प्रामुख्याने वापरले जात असल्याने यावर १० टक्के सूट आहे याशिवाय ‘हर्बल ब्लॅक हेना’ची किंमत २०० रुपये इतकी आहे. ‘खादी प्रोमोग्रेनेट क्रीम’ही याच किमतीत आहे.

’ ‘बायोटिक’चे अ‍ॅडव्हास आयुर्वेदा बायो व्हिटॅमिन बॉडी मसाज ऑइल १३५ रुपये आहे ज्यात गंधपुरा तेल, खस तेल, गुलाब तेल, जाप तेल, भुईमूग तेल इ. घटकांचा समावेश आहे. त्यांचे सायट्रॉन ऑइल १३५ रुपये असून अ‍ॅवोकाडो ऑइल १३१ रुपयांपर्यंत मिळेल. याच किमतीत कॅरेट सीड ऑइलही आहे. रोझ आणि गार्नियम ऑइल २८० रुपये इतके आहे. बायो विंटर केअर ऑइल ३५५ रुपये आणि ३६० रुपयांपर्यंत ‘अ‍ॅमेझॉन’वर उपलब्ध आहे. बिटर ऑरेंज बॉडी ऑइल मुलांसाठी २०० रुपयांपासून मिळेल. वॉलनट ऑइलही याच किमतीत आहे. ककम्बर ऑइलची मागणी वाढली असून ते २७५ रुपयांपासून मिळेल.

’ ‘हिमालया’चे विविध प्रॉडक्ट्स बाजारात आले आहेत. यात १४९ रुपयांत नीम ऑइल, ९८ रुपये एवढय़ा किमतीत सीड ऑइल, १२४ रुपयांत अ‍ॅलोवेरा ऑइल असे पर्याय उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त ‘लॉटस’चे नॅचरल केअर पॅक्स आले असून त्यावर ३०% सूट आहे. ४०० ते १००० रुपये अशी त्यांची रेंज आहे. ‘पालपोलिव्ह’चे अरोमा अ‍ॅब्सोल्यूट ऑइल २८७ रुपयांत मिळेल. त्याचबरोबर ‘फोरेस्ट’कडून अ‍ॅसेन्शियल ऑइल्स ४,४२५ रुपयांपासून मिळतील. ‘डव्ह’ , ‘बजाज’, ‘पॅराशूट’, ‘डाबर’ यांच्या प्रॉडक्ट्सतर्फे नेहमीप्रमाणेच हेअर ऑइल्स उपलब्ध आहेत. व्हॅसलिनचे बॉडी ऑइलसुद्धा उपलब्ध आहे.

आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स घेतानाही उत्पादनापासून दोन वर्षांच्या आतच त्या वापरल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे तारखा तपासूनच खरेदी करावी. यंदा आयुर्वेदिक उपायांचा वापर करून पहायला काहीच हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 12:25 am

Web Title: tips for healthy hair and skin
Next Stories
1 ब्रॅण्डनामा : रावळगाव टॉफी
2 बॉटम्स अप : नितळ व्होडका
3 क्रिस्पी नाचोजचा देशी अवतार
Just Now!
X