गुगलइतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले वॉचलेले काही कण अर्थात काही मस्ट वॉचव्हिडीओ.

MS Dhoni Review System as Umpire Gives Wide Ball in CSK vs LSG match IPL 2024
IPL 2024: धोनी रिव्ह्यू सिस्टीम! पंचांचा निर्णय अन् लगेचच माहीचा रिव्ह्यूसाठी इशारा, पाहा काय घडलं?
WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
Electric Cycle
Doodleची इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला एम एस धोनी, व्हिडीओ झाला व्हायरल

जाहिरातींमध्ये सिनेस्टार्स भलामण करीत असलेल्या उत्पादनांची उचल तातडीने होते, हा शोध बडय़ा उद्योजक आणि उत्पादकांना जगभर टीव्हीप्रसार सारख्याच प्रमाणात झाल्यानंतर लागला. त्याचा वापर करून कंपन्यांनी बक्कळ फायदा उचलला. पण काही वर्षांतच त्यात सारखेपणा आला. लोक सिनेस्टारच्या जाहिरातींना सरावले. मग उद्योजकांनी आपले उत्पादन अधिक वेगळ्या प्रकारे ठसविण्याचे मार्ग शोधायला सुरुवात केली. दोन हजार सालानंतर टीव्हीच्या ढीगभर चॅनल संख्येने प्रेक्षकवर्गाची एकाच चॅनलवरची भक्ती संपुष्टात आली आणि इंटरनेट, यूटय़ूबचा प्रेक्षकवर्ग तयार होऊ लागला. नेमके हेच बीएमडब्ल्यू कंपनीने हेरले. चित्रपटांमध्ये या काळात जेवढे प्रयोग झाले, तितकेच जाहिरातींमध्येही होत होते. ‘बीएमडब्ल्यू’ गाडीच्या प्रचारासाठी २००१मध्ये तयार झालेला आठ शॉर्टफिल्म्सचा ‘हायर’ नावाचा जुडगा पाहणे या काळातील जाहिरातक्रांती पर्वाला अनुभवण्यासाठी सर्वोत्तम ठरेल.

‘बीएमडब्ल्यू’ कंपनीने पारंपरिक जाहिराती बनविण्याऐवजी त्या काळात सर्वाधिक चलती असलेल्या प्रयोगशील दिग्दर्शकांना एकत्रित केले. त्यांना बीएमडब्ल्यू गाडी केंद्रस्थानी ठरवून लघुपट बनविण्याचे आव्हान दिले. बीएमडब्ल्यू प्रचाराचा मुद्दा ओढून-ताणून न आणता अ‍ॅन्ग ली, वाँग कर वै, गाय रिची, आलेहान्द्रो इनारूत, जॉन वू, टोनी स्कॉट आदी दिग्दर्शकांनी आपल्या शैलीत लघुपट बनविले. यातल्या प्रत्येक लघुपटात क्लाइव्ह ओव्हेन हा ड्रायव्हर आणि त्याची बीएमडब्ल्यू गाडी नायकरूपात दाखल होते. एखाद्या व्यक्तीला सुरक्षितरीत्या निश्चित स्थळी पोहोचविण्याचे काम करण्यासाठी सेकंद पणाला लावणाऱ्या क्लाइव्ह ओव्हेनच्या वेगवेडय़ा करामती येथे दिसतात. वृद्ध व्यक्तीला दरोडेखोरांपासून वाचविण्यापासून (अ‍ॅम्ब्यूश) ते हेलिकॉप्टर आणि शस्त्रांनी सज्ज दहशतवाद्यांना धूळ चारण्यापर्यंत (एस्केप) अनेक वेगक्लृप्त्या सादर केल्या जातात. आठ ते दहा मिनिटांच्या काळामध्ये एक आख्खा चित्रपट पाहत असल्याचा अनुभव येथे येतो. गाय रिची याच्या ‘स्टार’ नावाच्या लघुपटात अरेरावी, उन्मत्त अशा पॉपस्टारची खिल्ली उडविण्याचा प्रकार आहे. त्यात खुद्द मॅडोना ही गायिकाच वलयांकित पण गर्विष्ठ पॉप स्टारच्या भूमिकेत आहे. लहर आली म्हणून आपल्या ताफ्यातील गाडी वगळून ती ‘ड्रायव्हर’च्या गाडीत बसणे पसंत करते. तिकडे ‘ड्रायव्हर’शी हुज्जत घालते. ड्रायव्हर मग तिची जिरविण्यासाठी भन्नाट वेग दाखवत जे काही करतो, त्याने या पॉपस्टारचे स्टारपद गळून पडते.  एस्केप नावाच्या शॉर्टफिल्ममध्ये ड्रायव्हर आणि त्याची गाडी शिताफीने थेट हेलिकॉप्टर पाडू शकण्याची करामत दाखवून दिली आहे. प्रत्येक दिग्दर्शकांची खास विषयवैशिष्टय़े या लघुपटांमधून समोर आलेली आहेत. उदा. टोनी स्कॉटच्या लघुपटात (बीट द डेव्हिल) दृश्यांचा वेग आणि आत्मा विकण्याची विचित्र कथा येते. अलीकडे बर्डमॅनने सर्वाना माहिती झालेला मेक्सिकोचा दिग्दर्शक आलेहान्द्रो इनारुत अमली पदार्थाच्या जगताला (पावडर केग) मांडताना दिसतो.

याशिवाय हॉलीवूडमधील सर्वच आघाडीचे सहकलाकार यात असल्यामुळे त्या कलाकारांच्या अभिनयाचीही जुगलबंदीही पाहायला मिळते. एखाद्या उत्पादनासाठी जाहिरातीला पर्याय म्हणून तयार झालेल्या या शॉर्टफिल्मसना इतकी लोकप्रियता मिळाली, की त्यांच्या अनुकरणासाठी इतर कंपन्याही वेगाने कामाला लागल्या. मर्सिडीज बेंझनेदेखील याच प्रकारे शॉर्टफिल्म करण्याचा घाट घातला. तो आज तितकासा लक्षात राहिलेला नसला, तरी ही अशा प्रकारची सुरुवात असल्याने मोठय़ा प्रमाणावर पाहिला गेला. बीएमडब्ल्यू शॉर्टफिल्म सीरिजला पाहण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे तिचा चित्रपटांवरही पडलेला प्रभाव.

दिग्दर्शक ल्यूक बेसन याने या मालिकेपासून प्रेरणा घेऊन ‘ट्रान्स्पोर्टर’ हा चित्रपट तयार केला. तीन चित्रपटांच्या ट्रान्स्पोर्टर मालिकेत ड्रायव्हरची भूमिका जेसन स्टेथमने खूप गाजवली. याच काळात आपल्याकडे ‘धूम’ हा वेगवेडा चित्रपट दाखल झाला होता. त्या चित्रपटाची नक्कलप्रेरणा ही जरी फ्रेन्च ‘टॅक्सी’ ही चित्रपटमालिका असली, तरी नंतर आलेल्या ‘धूम’ मालिकांवर ट्रान्स्पोर्टरचा प्रभाव होता. ‘एकदा ठरविले की स्वत:चेही न ऐकणारा’ ट्रान्स्पोर्टरमधील नायक आपल्या हिंदी सिनेमांत सहज आयात झाला. हायर मालिका पाहिली, तर जगभरातील चित्रपटांमध्ये दशकभरात उतरलेल्या वेगवेडाच्या जत्रेचा अंदाज येईल.

 ‘ हायरमालिकेतील मस्ट वॉच लिंक्स

https://www.youtube.com/watch?v=BsWXkuyIdoY

https://www.youtube.com/watch?v=mrLYQnjzH7w

https://www.youtube.com/watch?v=VOzdhfLMk9c

https://www.youtube.com/watch?v=-znm_6I4Ro0

https://www.youtube.com/watch?v=8Hw5evszrYY  

viva@expressindia.com