News Flash

उलट सुलट

सोशल न्यूज डायजेस्ट

सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर 11काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट

दिल्ली ऑड इव्हन लॉजिक
दिल्लीमधील रस्त्यांवरील गाडय़ांची संख्या कमी करण्याचा उपाय केजरीवाल सरकारनं शोधून काढलाय. त्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार नवीन वर्षांपासून एक दिवसाआड सम आणि विषम रजिस्ट्रेशन नंबर असलेल्या गाडय़ाच रस्त्यावर आणता येतील. म्हणजे पहिल्या दिवशी सम नंबर असलेल्या गाडय़ा रस्त्यावर येतील तर दुसऱ्या दिवशी विषम नंबर असलेल्या गाडय़ा. म्हणजे तुमची गाडी रोज दिल्लीच्या रस्त्यांवर फिरवता येणार नाही. साहजिकच यावर प्रतिक्रिया उमटल्यानं #दिल्ली ऑड इव्हन लॉजिक हा हॅशटॅग फारच चर्चेत होता. ‘सध्या दिल्लीमध्ये राहणं हे केमिकल गॅस चेंबरमध्ये राहण्यासारखं आहे’, अशी टीका करीत दिल्ली हायकोर्टानं वाढत्या प्रदूषणावर ताशेरे ओढल्यानंतर केजरीवाल सरकारनं हा निर्णय घेतलाय. यामुळं दिल्लीतील गाडय़ांमुळं होणारं प्रदूषण जवळपास निम्म्यानं कमी होईल, असं काहींना वाटल्यानं त्यांनी या योजनेचं समर्थन केलंय, तर काहींनी याला विरोध केलाय. काहींनी ‘इज केजरीवाल बिकमिंग तुघलक ऑफ मॉर्डन इंडिया?’ असा सवाल केलाय, तर काहींनी ‘देल्हीवाले अब नाचो, पाच साल केजरीवाल, केजरीवाल..’ अशी बोचरी टीकाही केल्येय.

डझनभर स्माइलीज प्लीज
सोशल मीडियावरचं लाडकं मेसेजिंग अ‍ॅप ठरलेल्या व्हॉट्सअ‍ॅपवर डझनभर स्माइलीज अवतरत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये (2.12.372) या स्माइलीज अ‍ॅड करण्यात आलेत. मात्र या व्हर्जनचं अपडेट ऑटोमॅटिक होणार नाहीये. ते वेबसाइटवरून डाऊनलोड करावं लागेल आणि लवकरच ते गुगल प्ले स्टोअरवरही येईल. या नव्या व्हर्जनमध्ये अनेक झक्कास फेसस्माइलीज आणि कॅरेक्टर्स असल्यानं चॅटिंगची मजा आणखी वाढणारेय. इमोजीच्या प्रकारांनुसार फूड, स्पोर्ट्स, अ‍ॅक्टिव्हिटीज असे भाग करण्यात आलेत.

चेन्नई रेन्स..
चेन्नईत गेल्या काही दिवसांत शतकातला विक्रमी पाऊस कोसळला आणि तिथलं जनजीवन विस्कळीत झालं. तिथल्या शाळा-कॉलेजेस, बँका-उद्योगधंदे बंद पडलेत. अनेक जण बेघर झालेत. आपलं दु:ख बाजूला ठेवून समोरच्या संकटग्रस्तांना शक्य ती मदत करण्याच्या चेन्नईकरांच्या स्पिरिटला नेटकरांनी सलाम केलाय. वीज उपलब्ध होती, त्या भागातल्या चेन्नईकरांनी इतरांच्या सुरक्षेचे अपडेट्स सोशल मीडियावरून दिले आणि त्यांची काळजी करणाऱ्या जिवलगांना दिलासा मिळाला. सामान्यांप्रमाणेच रजनीकांत, धनुष, महेशबाबू, वरुण तेज, सायना नेहवाल अशा अनेक सेलिब्रेटींजनीही आपापल्या आर्थिक मदतीचा हात चेन्नईकरांसाठी पुढं केला. शाहरुख खाननं एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्याच वेळी मुख्यमंत्री जयललिताच बाहुबलीसारख्या कशा पूरग्रस्त जनतेच्या तारणहार आहेत, हे एका पोस्टरच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि तो फोटो व्हायरल झाला. त्याबरोबरीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेन्नई दौऱ्याचा फोटो ‘पीआयबी’नं बदलून ट्विट केला होता आणि त्यावर नेटकरांनी ‘अब की बार फोटोशॉप सरकार’ अशा तीव्र आशयाच्या प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. काहींनी आणखी बोचरे फोटोशॉप करून ते फोटो अपलोड केले होते. त्यामुळं ‘पीआयबी’नं अपलोड केलेले फोटो काढण्यात आले.

ऑस्कर दोषीच
कृत्रिम पायांच्या साहय्यानं विक्रम करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील धावपटू ऑस्कर पिस्टोरियसला त्याची प्रेयसी रिवा स्टिनकॅम्पच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेय. २०१३ मध्ये व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी रिवाची हत्या झाली होती. या प्रकरणाच्या आधी आपल्या अपंगत्वावर मात करून धावणाऱ्या ब्लेड रनर ऑस्करच्या वाटय़ाला आलेल्या कौतुकाप्रमाणेच, किंबहुना थोडी अधिकच टीका आणि धिक्कार सोशल मीडियातून पोस्ट केला गेला.
अजिंक्य रहाणे
एकाच कसोटीच्या दोन्ही डावांत शतक ठोकणारा अजिंक्य रहाणे हा पाचवाच भारतीय ठरलाय. त्यामुळं ट्विटरवर #अजिंक्य रहाणे हा हॅशटॅग ट्रेण्डिंगमध्ये आहे. दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या डावात अजिंक्यनं २०८ चेंडूंमध्ये आठ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद शंभर धावा केल्या. पहिल्या डावात अजिंक्यनं २१५ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि चार षटकारांसह १२१ धावांची खेळी केली होती. त्यानं पाच तास खेळपट्टीवर तळ ठोकून महत्त्वाची भागीदारी रचली आणि भारताच्या डावाला आकार दिला. याआधी विजय हजारे, सुनील गावस्कर, राहुल द्रविड आणि विराट कोहली यांनी ही कामगिरी बजावली होती. गावस्कर यांनी तीनदा आणि द्रविडनं दोनदा हा पराक्रम गाजवलाय.

राधिकाचा Myntra व्हायरल
अनेकदा प्रेग्नंट महिलांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या योग्य अधिकारांपासून वंचित ठेवलं जातं. त्या आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव केला जातो. कारण एकच, त्या प्रेग्नंट असतात. पुढं ती जबाबदारी त्या सांभाळू शकतील का, वगैरे पुरवणी उत्तरं या कारणांना जोडली जातात. मिन्त्राच्या ‘अनौक’ या ब्रँण्डच्या जाहिरातीत अभिनेत्री राधिका आपटेनं हाच मुद्दा मांडलेला दिसतोय आणि #राधिका आपटे हा हॅशटॅग सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झालाय.

बाबा झकरबर्ग
बाबा होणं हे फिलिंग लई भारी असतं. हे बाबापण सामान्याचं असो किंवा सेलेब्रेटीजचं. फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्ग हा चर्चेतलाच चेहरा. इतके दिवस फेसबुकचा जनक म्हणून ओळखला जाणारा झुकेरबर्ग आता वास्तव जीवनातला बाबा झालाय. मार्कची पत्नी प्रिसीला चॅनला गेल्या आठवडय़ात मुलगी झाली आणि मार्कनं ही गोड बातमी फोटोसकट शेअर केली. मार्क-प्रिसीलानं त्यांच्या लेकीला- मॅक्सला लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालंय. मार्कनं त्याच्या नावावरचे फेसबुकचे ९९ टक्के शेअर्स दान करायचं ठरवलंय. ‘डय़ुरिंग अवर लाइव्हज्’ या संस्थेला ही रक्कम तो देणारेय. त्यामुळं #मार्क झकरबर्ग हा हॅशटॅग टॉप ट्रेण्डिंगमध्ये होता.

                                                              वाह ऊर्मिला..
8हटके मेकओव्हर आणि रावडी लुकमुळं ‘मँगो डॉली’ची चर्चा सध्या होतेय. ही ‘मँगो डॉली’ आहे अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर. आतापर्यंत सालस, निरागस, नृत्यप्रधान भूमिका करणाऱ्या ऊर्मिलाचा हा नवा अवतार आहे ‘गुरू’ या चित्रपटातला. संजय जाधव दिग्दर्शित ‘गुरू’मधल्या अंकुश चौधरीच्या सनग्लासेसच्या स्टाइलबाजीप्रमाणे ऊर्मिलाचा हा लुक आणि तिच्या तोंडचे संवाद यामुळं ‘गुरू’विषयीची उत्सुकता वाढलेय.

 

बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन
बॅटमॅन आणि सुपरमॅनच्या चाहत्यांना चर्चेचं गुऱ्हाळ चालवण्यासाठी एक नवीन ट्रेलर लॉन्च झालाय तो ‘बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन’ या चित्रपटाचा. त्यामुळं ‘फेसबुक आणि ‘ट्विटर’वर #बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन हा हॅशटॅग ट्रेण्डिंगचा विषय ठरला होता. ‘हा चित्रपट मला बघायचाच आहे’, ‘ऑसम ट्रेलर’, ‘अमेझिंग’, ‘एक्सायटेड’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या ट्रेलरवर उमटल्यात.
फॉरवर्डेड..
वर्षांचा शेवटचा महिना चालू आहे. वर्षभर सोशल मीडियावरून का होईना, आपल्या सुख-दु:खात सामील होऊन आपल्या चेहऱ्यावर स्मित खेळवणाऱ्या मित्रमंडळींना थँक्यू म्हणणारा फोटो व्हायरल होतोय.
9

 

10
नौदल दिन आणि सशस्त्र सेना झेंडा दिवसांच्या निमित्तानं नेटकरांनी  सैनिकांप्रति आदरभाव प्रकट केला. या दिनांनिमित्तानं अनेक फोटो अपलोड केले गेले.

 

viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2015 1:20 am

Web Title: trending topics on social media
Next Stories
1 लेट्स ‘रॉक’
2 केऑस
3 फॅशनचे प्रयोग करणं आवश्यक
Just Now!
X