21 February 2019

News Flash

फॅशनचा ‘नॉस्टॅल्जिया’

‘जुनं ते सोनं’ ही उक्ती आज जवळपास प्रत्येक क्षेत्राला चपखल लागू पडली आहे.

विंटेज – रेट्रोलुकचा मेळ साधत अभिजात कलेक्शन विकसित करणारे सब्यासाची, रितू कुमार, शैलेश सिंघानियांसारखे अनेक फॅशन डिझायनर्स आणि त्यांचे लेबल्स सध्या सेलिब्रिटींमध्येही लोकप्रिय ठरले आहेत. जुन्याची परिमाणं संपली असं आपण म्हणतो पण अजूनही ती नशा फॅशन डिझायनर्सच्या नवनव्या कलेक्शनमधून जाणवते आहे. जुन्या शैलीत सतत नवे प्रयोग करून त्यात आपली वेगळी शैली विकसित करत तो नॉस्टॅल्जियाचा काळ परत फॅशनमध्ये डिझायनर्सच्या टचमुळे कायमस्वरूपी रुजू पाहतोय.

जुन्याला नव्याचा थाट देण्याची किमया कलाकार घडवत असतात किंबहूना आजही रसिकांना जुन्यातच रमायला आवडतं. आपल कलेतून आपली खूप र्वष जुनी परंपरा जपणारे कलाकार आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. आपल्याकडे कपडय़ांच्या बाबतीत विचार करता, प्रत्येक राज्य अग्रेसर आहेच. त्यातून जुन्याला नवं रूप देण्याची किमया आजचे फॅशन डिझायनर करत आहेत. एकोणिसाव्या शतकातील वस्त्रपरंपरा पुन्हा नव्या ढंगात आधुनिक पद्धतीने रॅम्पवर आणायची आणि आपले कलेक्शनही त्या पद्धतीने पुढे न्यायचे असा रिवाजच फॅ शन डिझायनर्समध्ये पडला असून ‘विंटेज – रेट्रो’ लुकचा मेळ साधत अभिजात कलेक्शन विकसित करणारे सब्यासाची, रितू कुमार, शैलेश सिंघानियांसारखे अनेक फॅशन डिझायनर्स आणि त्यांचे लेबल्स सध्या सेलिब्रिटींमध्येही लोकप्रिय ठरले आहेत. जुन्याची परिमाणं संपली असं आपण म्हणतो पण अजूनही ती नशा फॅशन डिझायनर्सच्या नवनव्या कलेक्शनमधून जाणवते आहे. जुन्या शैलीत सतत नवी प्रयोग करून त्यात आपली वेगळी शैली विकसित करत तो ‘नॉस्टॅल्जिया’चा काळ परत फॅशनमध्ये डिझायनर्सच्या ‘टच’मुळे कायमस्वरूपी रुजू पाहतोय.

‘जुनं ते सोनं’ ही उक्ती आज जवळपास प्रत्येक क्षेत्राला चपखल लागू पडली आहे. जुन्याच्या संशोधनातून नव्यात काही प्रयोग करता येतात हे अचूक जोखलेल्या किमयागारांना फॅ शनच्या बाबतीत तर या उक्तीने चांगलाच हात दिला आहे. नुकतंच फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जीने ‘नीलया’ हे कलेक्शन आणलं आहे. त्यात दीपिका ही १९४० सालच्या एका सुंदर बंगाली अभिनेत्रीप्रमाणे दिसते आहे. त्याआधीही सब्यासाचीने त्याच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी १९३० सालच्या बनारस व राजस्थानच्या राजघराण्यातील सिल्क, कॉटन सिल्क या साडय़ांचा थाट पालेमीसारख्या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंगसाठी आणला. याआधी त्याने एकोणिसाव्या शतकातील राजपूत लुक त्याच्या ब्रायडल कलेक्शनसाठी वापरला होता. सब्यासाचीने सुरुवातीपासूनच ‘विंटेज’ लुकची कास धरून ठेवली आहे. सब्यासाचीप्रमाणेच फॅशन डिझायनर शैलेश सिंघानिया यानेही आपल्या कलेक्शनमध्ये महाराणी गायत्री देवी या राजपूत राणीचा लुक नव्याने आणला होता तसेच राजकुमारी दुर्गेश्वरी आणि राजकुमारी सीता कुमारी यांच्या साडय़ांचा जयपुरी ‘झरोका’ त्याच्या ब्रायडल कलेक्शनमध्ये आणला. फॅशन डिझायनर रीना सिंग हिनेही ख्यातनाम चित्रकार अमृता शेरगिल यांच्या चित्रकारितेतील रंग, छटा, टेक्श्चर, पॅटर्न हे लक्षात घेत आपल्या कलेक्शनमध्ये जुन्या पण आधुनिक विचारांच्या रूपात ‘विंटेज’मधलाच १९७० ते १९८०च्या दशकातील वेस्टर्न लुक आणला. गडद व फिकट रंगछटांपासून कलाकुसरीपर्यंत एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील भारतीय कलाकारांची नवी छबीच रीना सिंग तिच्या ‘एका’ या लेबलखाली सादर करते.

विंटेज लुक करताना केवळ भारतीयच नव्हे तर इतर कोणत्याही संस्कृतीतील छोटय़ा छोटय़ा कपडय़ांवरील कलाकुसरीला, त्यासाठी वापरल्या गेलेल्या कल्पनास्वातंत्र्याला एक जागतिक परिमाण प्राप्त होते. माझ्या लेबलची ओळख माझ्या आत्तापर्यंतच्या विन्टेंज लुकमधूनच झाली असली तरी काही गोष्टी मी जुन्या पद्धतीच्या ठेवून त्याला आजचे आधुनिक रुपडे द्यायचा प्रयत्न करतो. साडी हा पूर्वीचा खूप महत्त्वाचा लुक मानला जायचा आणि आज जॅकेट्ससारखे वेस्टर्न कपडे, लुक हे साडीला जोडून घेतल्यामुळे साहजिकच साडीचा हा नवा लुक थेट आजच्या काळातील पिढीला आपल्याशी जोडून घेतो. १९४० मध्येही साडीवरच्या ब्लाऊजची फॅशन वेस्टर्न होती, साडीचा ब्लाऊज हा क्रॅप टॉपप्रमाणे किंवा जॅकेट, कॉलरच्या लुकमध्ये होता. त्यामुळे आजच्या आधुनिकतेला जोडण्यासाठी साडीची परंपरा टिकवून त्यात मी प्रयोग करतो, असं फॅशन डिझायनर शैलेश सिंघानिया यांनी सांगितलं. वेस्टर्न आणि पूर्णत: पारंपरिक अशा पद्धतीचा लुक १९३०-४०च्या काळात महाराणी गायत्री देवी यांचाही होता, असं प्रामाणिक मत असल्याने त्यांचं कलेक्शन या लुकमधून प्रेरित झालं आहे, असेही आपल्या विंटेज कलेक्शनबद्दल माहिती देताना सिंघानिया यांनी सांगितलं.

सब्यासाचीची प्रत्येक स्टाईल ही विंटेजशी प्रेरित आहे. ‘कोलकत्ताच्या खूप जुन्या लुकचा फार प्रभाव माझ्यावर आहे. लहानपणापासूनच १९७० व १९८०च्या दशकातील त्या सुंदर कलेचा एक डिझायनर म्हणून मी उपयोग करून घेऊ शकलो, त्यामुळे मी माझ्या प्रत्येक कलेक्शनमधून त्यांच्या कलागुणांना एक आदर देतो. त्यांचे कलागुण आणि पारंपरिकता माझ्या कपडय़ांमधून रुजले आहेत याची खात्री आपण करून घेतो, असं सब्यासाचीचं म्हणणं आहे. सब्यासाचीच्या नव्या कलेक्शनमध्ये १९३० साली प्रचलित असलेली पारदर्शक पांढरी साडी आणि त्यावर सनग्लासेस असा समर लुक त्या काळाप्रमाणेच साकारण्यात आला आहे. रीना सिंगनेही १९४० तसेच त्याही पूर्वीच्या वेगवेगळ्या चित्रकारांच्या चित्रांतून दिसलेला विंटेज लुक असणारे गाऊन्स, स्कर्ट, रॉब आणि लॉन्ग टॉप्स, जॅकेट्स असे वेस्टर्न कपडे कलेक्शनमध्ये आणले आहेत. ‘मला एका विशिष्ट फॅब्रिकवर काम करायला आवडतं. जसे डाय, लीनेन, झारी यांसारख्या कपडय़ांवरच्या रंगीत छाप तसेच डिझाइनमधून एक वेगळा इतिहास व वेगळी कहाणी निर्माण होऊ  शकते. प्रत्येक चित्रकाराच्या चित्रात अशीच एक वेगळी कथा रंगवलेली असते. अमृता शेरगिल, फ्रिएडा काल्हो, पिकासो यांच्या चित्रकलेतून ती जास्त दिसून आली आहे, असं रीना सांगते. चित्रकलेतील गडद तसेच फिकट रंग कपडय़ांवर उतरवण्यासाठी वूल, जामदनी, सिल्क या फॅ ब्रिकवर रंगाची हलकी, कोमल लेयरिंग करावी लागते, असंही तिने सांगितलं. डिझाईनर रितू कुमार यांच्यापासून ते शैलेश सिंघानियापर्यंत या विंटेज लुकसाठी प्रत्येक जण विविध प्रयोग करताना दिसताहेत. रितू कुमार यांनी यापूर्वी अमेरिकेतील साधारण ६० ते ८०च्या दशकातील बॅटमिंटन खेळाडूच्या लुकचा वापर केला होता. तेव्हाच्या खेळाडूंचा ‘साधा तरी आकर्षक’ दिसणारा असा लुक तिच्या वेस्टर्न कपडय़ांसाठी वापरला होता. ज्यात इनर, टय़ूलिप, लॉन्ग स्कर्ट, फ्रॉक, स्लीवलेस गाऊन्सचा समावेश होता. डिझायनर्स हे नवीन विषयांवर स्वत:चा ठसा उमटवत असतात, त्यांची विंटेजमधली प्रेरणा वेगवेगळ्या प्रकारातून आलेली असते. कुणाला जुनी राजघराणी, जुन्या शहरी जीवनातील रॉयल लुक प्रेरित करतो. तर कुणासाठी पूर्वीच्या खेळांडूम्चा, गायकांचा किंवा चित्रकारांच्या राहणीमानाचा व त्यांच्या विशिष्ट शैलीचा लुकही प्रभावी ठरतो. मात्र एकंदरीत डिझायनर्सना आपल्या कलाकृतींसाठी जुना काळ जास्त खुणावतोय हे खरं..

नव्याने आलेली जुनी फॅब्रिक्स

शैलेश सिंघानिया याने काडवा बनारसी तसेच खादी जामदनी या धाग्यावर साडीवरचे लुक तयार केले आहेत. त्याचप्रमाणे सध्या पारंपरिक वीणकामावरचे कलेक्शन त्याने आणले आहे. रीना सिंगने जामदानी वूल, सिल्क, वूल सिल्क, कॉटनचा वापर हेरिटेज लुकसाठी केला आहे. तिने ‘मरिनो’ या ऑस्ट्रेलियन फॅब्रिकचाही विंटेज लुकसाठी वापर केला आहे.

ब्रॉकेड जॅकेट्स व ट्रेन्च कोट्स हा १९३० सालचा साडीसारखा स्टाईलच्या बाबतीतला एक नावाजलेला प्रकार. त्यामुळे केपसारख्या वेस्टर्न लुकचा साज जास्त करून आपल्या भारतीय सिल्क, वूलन साडय़ांवर ठेवून मी सतत त्यावर प्रयत्न करत असतो. आपल्याकडे हेरिटेज लुकचा विचार करताना नुसता जुन्यावर भर न देता वीणकामावर जोर देत नव्या-जुन्याचा मिलाफ करण्याच्या प्रयत्नात मी असतो.

शैलेश सिंघानिया, फॅशन डिझायनर

viva@expressindia.com

First Published on February 9, 2018 12:39 am

Web Title: vintage look fashion design vintage look ramp walk fashion designers