जेव्हा केव्हा आपण लग्नातील पेहरावाबद्दल विचार करतो तेव्हा बऱ्याचदा आपण साहजिकपणे आधी नवरी मुलगी लग्नात कशी दिसेल या गोष्टीचाच विचार करतो आणि आपल्या बिचाऱ्या नवरदेवाला पुरेपूर विसरून जातो. पण आता काळाप्रमाणे फॅशन ट्रेंड्सबद्दलची जागरूकता स्त्रियांबरोबर पुरुषांमध्येही तेवढय़ाच मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाली आहे; म्हणूनच गेल्या एक-दोन वर्षांत ‘ग्रुम्स वेअर’ बद्दल लोकांना तितकंच कुतूहल वाटतं आहे; आणि खरोखर नवरदेवही स्वत:च्या लग्नात वेगवेगळ्या स्टाइलच्या पेहरावांचे प्रयोग करत आहेत. एथनिक वेअर म्हटलं की आपल्यासमोर कुर्ता चुरीदार, शेरवानी, पठाणी, अंगरखा, धोती, नेहरू जॅकेट यासारखे पेहराव डोळ्यासमोर येतात. काळाप्रमाणे याच कपडय़ांमध्ये थोडे थोडे बदल होत राहतात. मग ते कपडय़ाच्या प्रकारात असो, रंगसंगती आणि त्यावरच्या सरफेस ऑरनामेंटबद्दल असो किंवा मग सिल्हाऊट्स आणि शिवणकामामधील विविध पैलूंमधले बदल असो. यावर्षीच्या कलर ट्रेंड्सप्रमाणे आपल्याला लिनेन, कॉटनसिल्क, सिल्क, ब्रोकेड, जामेवर या कपडय़ांच्या प्रकारातील पेस्टल शेड्समधले मोनोक्रोमाटीक कलर पॅटर्नचे एथनिक पेहराव जास्त पहायला मिळतील. या मोनोक्रोमाटीक शेरवानीबरोबर सिल्क किंवा ब्रोकेडचे कॉन्ट्रास्ट उपरणे किंवा दुपट्टे उत्तम दिसतात. या कपडय़ांवर खूप जास्त एम्ब्रॉयडरी न करता अगदी मोजक्या भागांमध्ये कॉन्ट्रास्ट किंवा थोडय़ा वेगळ्या रंगाची एम्ब्रॉयडरी नाहीतर गळयाभोवती, बाह्यांभोवती एका वेगळ्या रंगाची पायपिंग-कॉरडिंग होऊ शकते. याशिवाय, फ्लोरल किंवा अ‍ॅब्स्ट्रॅक्ट प्रिंटच्या शेरवानी, बंद गला, जोधपुरी पेहराव पण तेवढय़ाच चर्चेत आहेत. यंदाच्या वेडिंग सीझनमध्ये या एथनिक वेअर मध्येही विविध सिल्हाऊट्स, गळ्याचे प्रकार, जॅकेटचे प्रकार आपल्याला बघायला मिळतील. सध्या पुरुषांमध्ये ड्रेप्ड कुर्ता किंवा मग अंगरखा स्टाइलचे बंगाली पद्धतीचे कुर्ते, शेरवानी, जोधपुरीज एक हॉट ट्रेण्ड म्हणून ओळखले जात आहेत. या सर्व कुर्त्यांखाली इन्डोवेस्टर्न अथवा पारंपारिक पद्धतीच्या धोती, धोती-हेरम पँट्स, चुरीदार, पायजमा पँट्स असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. शेरवानी मधला हटके प्रकार घालायचा झाला तर फ्रंट बटन प्लाकेट आणि चायनीज कॉलर कुर्त्यांबरोबर फ्रंट ओपेन जॅकेट शेरवानी या वर्षी खूप चर्चेत राहील. आपले नेहमीचे प्लेन कुर्ते आणि खाली ट्रेंडी धोती पँट, ट्राऊ जर किंवा चुरीदारसोबत जर ब्रोकेड, वेल्वेट किंवा बोटॅनिकॅल अ‍ॅब्स्ट्रॅक्ट प्रिंटेड सिल्क या प्रकारच्या फॅब्रिकमध्ये ओव्हरलॅपिंग पद्धतीचे मोदी-नेहरू जॅकेट असेल तर एक मस्त फ्युजन वेअर म्हणून हा प्रकार खूप पॉप्युलर होईल. हे सर्व कुर्ता /शेरवानी किंवा जोधपुरीचे प्रकार मुख्य लग्नसोहळ्यातील कार्यक्रमांमध्ये घालण्याचा विचार नक्की करावा. संगीत, मेंदी किंवा साखरपुडय़ाच्या वेळेस ड्रेप्ड कुर्ता विथ नेहरू जॅकेट आणि चुरीदार किंवा धोती, किंवा मग अंगरखा शेरवानी, जॅकेट शेरवानी या प्रकारचे फ्युजन वेअर जास्त साजेसे दिसतील. तर मुख्य लग्न सोहळ्यात पारंपरिक शेरवानी, धोती, कुर्ता यांसारखे पेहराव नवरदेवावर जास्त उठावदार दिसतात. या कपडय़ांचे रंग निवडताना कायम त्या त्या कार्यक्रमाप्रमाणे नववधूचे कपडे कोणत्या रंगाचे आहेत हे कायम लक्षात ठेवावे. उदाहरणार्थ विधींच्या वेळेस जर नवऱ्यामुलीची साडी गडद हिरव्याला लाल काठाची असेल तर नवरदेवाने शक्यतो मरून किंवा लाल रंगाचा कुर्ता निवडावा. हे दिसताना छान तर दिसताच पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे तुम्ही नवरा नवरीपेक्षा उत्सवमूर्ती ‘जोडीदार’ म्हणून जास्त आकर्षक दिसू शकता.

या सर्व एथनिक अथवा फ्युजन वेअरबरोबर योग्य अ‍ॅक्सेसरीजचा वापर हा एक महत्वाचा मुद्दा असतो. दागिन्यांमध्ये फार नाही पण गळ्यात न्युट्रल ऑफव्हाईट रंगाचा एक मोती आणि कुंदनचा हार नवरदेवाला छान दिसतो. नवरदेव राजबिंडा दिसण्यासाठी त्याच्या पेहरावाला फेटय़ाशवाय पूर्णत्व येत नाही. बदलत्या काळाप्रमाणे फेटय़ांमध्येही आजकाल बरेच वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. नवरदेवासाठी त्याच्या कपडय़ांना साजेसे दिसतील असेच फेटे आधीपासून तयार करून घेता येतात. त्याच्यावर साजेसा असा कुंदन आणि मोत्याचा ब्रृच असेल तर त्या पूर्ण गेटअपला आणखी उठाव येतो. या फेटय़ाचा रंग एकदम कॉन्ट्रास्ट आणि भडक न घेता आपल्या कपडय़ांच्या रंगसंगतीत बसेल असा निवडावा. जर तुम्हाला महाराष्ट्रीय पद्धतीचा कुर्ता, धोती आणि उपरणं घालायचं असेल तर त्याच्याबरोबर पेशवाई पगडीचा विचार निश्चित करता येईल. पायात घालण्यासाठी विविध प्रकारच्या मोजडय़ा किंवा कोल्हापुरी चपला एथनिक वेअरबरोबर कायमच छान दिसतात.

Narendra modi
Vision 2047 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं पुढच्या २५ वर्षांचं नियोजन, म्हणाले, “१५ लाखांहून अधिक…”
What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?
Why Are performing satisfactorily mutual funds Rates So Low A Performance Analysis
समाधानकारक कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडांची संख्या इतकी कमी कशी?
budh planet will make neechbhang rajyog these zodiac sign could be lucky
बुध ग्रहामुळे ५० वर्षांनंतर तयार होणार ‘नीचभंग राजयोग’; ‘या’ ३ राशींच्या लोकांना अचानक होऊ शकतो धनलाभ

लग्नविधी व इतर कार्यक्रमांमध्ये एकदा एथनिक वेअर घालून झालं की रिसेप्शनच्या वेळेस आपल्याला इंग्लिश पध्दतीचे सूट किंवा टक्सेडो कायमच एक   ‘आयडियल वेअर’ वाटतात. हे सूट किंवा टक्सेडो शक्यतो गडद रंगांचे असावेत.तुमच्या रिसेप्शनच्या कपडय़ांची रंगसंगती तुमच्या बेटर हाफच्या कपडय़ाच्या रंगसंगतीला मिळती जुळती असायला हवी. म्हणजे नववधूचे कपडे लाल किंवा राणी गुलाबी रंगाचे असतील तर  टक्सेडो काळ्या रंगाचा आणि त्यातला शर्ट पांढऱ्या रंगाचा असावा पण त्याचा बोटाय मात्र नववधूच्या कपडय़ांच्या जवळ जाणारा पाहिजे. पायात स्मार्ट फॉर्मल शूज तर आवश्यक आहेतच. बाकी अ‍ॅक्सेसरीजमध्ये एक छानसं घडय़ाळ आणि त्याला मॅचिंग कफलिंग्ज घालावेत. भावी नवरदेवाने ‘ग्रुम ट्रुसे’ तयार ठेवावा. यात काही चांगले फॉर्मल शर्ट पँट्स, कॉटनचे शर्ट व लॉंग कुर्ते चुरीदार अशा गोष्टी असाव्यात. आयत्या वेळेस काही नवीन कार्यक्रम, पूजा इत्यादी प्रसंग आले तर हे थोडे अधिक कपडे उपयुक्त ठरतात. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे नवरदेवाने देखील लाग्नासोहळ्य़ातील आपल्या सर्व पेहरावांची ट्रायल आणि फिटिंगसाठी वेळ ठेवावा. लग्नाच्या किमान आठवडाभर आधीच सर्व कपडे तयार ठेवावेत. नववधूसारखा अगदी मेकअप-हेअरस्टाईल शक्यतो मुले करत नाहीत. पण लग्नसोहळ्यात चेहरा तजेलदार दिसण्यासाठी बेसिक फेशिअल करावे आणि त्याचबरोबर हेअर स्पा पण करावा.

चला तर मग आता आपण उत्सवमूर्ती म्हणून पूर्ण लग्नसोहळ्यात नववधूच्या जोडीने आलेल्या पाहुण्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि लोकांच्या आठवणीतले ‘मोस्ट हॅंडसम मॅरीड कपल’ बनण्यासाठी सज्ज आहोत.