News Flash

ब्रॅण्डनामा : झोमॅटो

काही लाखांत सुरू झालेल्या या स्टार्टअपच्या गुंतवणुकीची आजची किंमत २२५ दशलक्ष एवढी आहे.

झोमॅटो

रश्मि वारंग

हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

भारतीय मंडळींसाठी अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. या ब्रह्मत्वाचा शोध ते आपापल्या परीने घेत असतात. हॉटेलमध्ये जाऊन खाणं म्हणजे महत्पाप या संकल्पनेपासून ते हॉटेलिंग म्हणजे नित्यकर्म इथपर्यंतचा आपला प्रवास रोचक आहे. या प्रवासात आपली खाऊगिरी कमी कटकटीची, कमी प्रतीक्षेची सुखदायक अनुभूती व्हावी यासाठी प्रयत्नशील ब्रॅण्ड्समधला सर्वात यशस्वी ब्रॅण्ड म्हणजे झोमॅटो. तुम्हाला अपेक्षित परिसरातील सर्वोत्तम रेस्टॉरंटचा शोध आणि बोध देण्याचं काम हा ब्रॅण्ड करतो. २४ देशांत पसरलेल्या या स्टार्ट अप ब्रॅण्डची ही कहाणी!

दिल्ली आयआयटीमधून उत्तीर्ण झालेल्या दिपिंदर गोयल आणि पंकज चढ्ढा या दोन मित्रांना बेन अ‍ॅण्ड कंपनीत एकत्रच नोकरी मिळाली. दिपिंदर व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून कार्यरत होता. कॉलेजपासूनचे हे मित्र नेहमीच नवनव्या कल्पनांवर चर्चा करत. नियमित कामाच्या व्यापात एकदा दोघांची चर्चा हॉटेलमध्ये कराव्या लागणाऱ्या प्रतीक्षेकडे वळली. हॉटेलमध्ये जाऊन वाट पाहणे, पदार्थ निश्चित करणे,पदार्थाच्या किमती या सगळ्याविषयी असलेल्या अज्ञानामुळे एकूणच हॉटेलिंगचा अनुभव त्रासदायक होऊन जातो. यावर उपाय शोधण्याची गरज या दोन दोस्तांना  वाटली. त्यानंतर दोघांनी स्वत:च्या कंपनीच्या खासगी नेटवर्कवर एक संकेतस्थळ सुरू केले. ‘फूडी बे’ असं त्याचं नाव होतं. त्या संकेतस्थळावर आसपासच्या रेस्टॉरंटचा पत्ता, क्रमांक, प्रतीक्षेचा काळ, मेन्यू अशी उत्तम माहिती   कर्मचाऱ्यांना मिळू लागली. संकेतस्थळाला छान प्रतिसाद मिळू लागला. हेच संकेतस्थळ मग कंपनीबाहेर विस्तारण्यात आले. दिल्लीसह कोलकाता आणि मुंबई या शहरातील रेस्टॉरंटचा समावेश त्यात करण्यात आला. २०१० मध्ये या ‘फूडी बे’चं नाव बदललं.  त्यामागे दोन महत्त्वपूर्ण कारणं होती. एकतर ई-बे या कंपनीच्या नावाशी साधम्र्य, त्यामुळे होऊ शकणारा घोळ आणि दुसरं म्हणजे सहज सगळ्यांच्या मुखी राहणारं नाव हवं होतं. त्यातून जन्माला आलं झोमॅटो.

संकेतस्थळाच्या जोडीने अ‍ॅपचा जमाना आला. दिपिंदर आणि पंकज यांना या संकेतस्थळांचे रूपांतर अ‍ॅपमध्ये करण्याची नितांत गरज वाटू लागली. निधीची चणचण होती पण नव्या कल्पनांना वाली मिळतोच. दिपिंदर आणि पंकजच्या कल्पकतेवर विश्वास ठेवून नौकरी डॉट कॉमच्या संजीव मिरचंदानी यांनी या स्टार्ट अपमध्ये गुंतवणूक केली. त्यानंतर अनेक गुंतवणूकदार स्वत:हून पुढे आले. हे दोन्ही मित्रांच्या नव्या कल्पनेचं यश होतं. काही लाखांत सुरू झालेल्या या स्टार्टअपच्या गुंतवणुकीची आजची किंमत २२५ दशलक्ष एवढी आहे.

आज झोमॅटो भारतापुरतं मर्यादित नाही. सप्टेंबर २०१२ मध्ये दुबई येथे आपली सेवा विस्तारत झोमॅटोने परदेशात पाऊल टाकलं. त्यानंतर श्रीलंका, युके, फिलीपिन्स, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, टर्की, ब्राझील अशा २४ देशांत या भारतीय ब्रॅण्डने आपले पंख विस्तारले. २४ देशांतील ५०० शहरं, १० लाख रेस्टॉरंट्स, नव्वद दशलक्ष वापरकर्ते झोमॅटो सेवेचा लाभ घेतात. पूर्वी स्वत: वेगवेगळ्या भागातील रेस्टॉरंट्सचा शोध घेऊन माहिती प्रसारित करणाऱ्या या अ‍ॅपवर आता आपल्या रेस्टॉरंट्सची नोंदणी करायला रेस्टॉरंट्स मालकांचं उत्सुक असणं या अ‍ॅपचं यश दर्शवतं. अर्थात स्टार्ट अपमध्ये यशासोबत अपयशही पचवावं लागतं. व्यवसाय विस्तारण्याच्या घाईत काही चुकीचे निर्णय घेतले जातात. त्याचं फळ म्हणून लखनौ, कोचीन, कोईमतूर इथे झोमॅटोला अपयश आलं.

तरीही रेस्टॉरंट्स, हॉटेल्स यांच्या सखोल माहितीसाठी झोमॅटो उत्तम पर्याय आहे. नवख्या ठिकाणी खाण्यासाठी जाताना ते ठिकाण झोमॅटोवर नोंदवलेलं आहे अथवा नाही हे आपण आवर्जून पहातो. आता याच धर्तीवर अनेक अ‍ॅप असली तरी ज्याचं मत आपल्याला अधिकृत, विश्वासार्ह वाटतं असं अ‍ॅप म्हणजे झोमॅटो!

आपल्या व आपल्या खाण्याच्यामध्ये येणारे सर्व अडथळे दूर करणाऱ्या कुठल्याही गोष्टीबद्दल आपल्याला आपुलकी वाटतेच. अमुक भागात कोणतं चांगलं शाकाहारी, मांसाहारी, अस्सल मराठमोळं किंवा गुजराती थाळी मिळणारं हॉटेल आहे? पंजाबी धाब्यावर आपल्याला रिझवणारा कोणता मेन्यू आहे? या चौकशांसाठी पूर्वी एखाद्या अस्सल खवय्या मित्राची मदत घेतली जायची. झोमॅटोसुद्धा आपला असाच मित्र आहे.

आपल्या अशक्त खिसापाकिटाला परवडेल असं साधं पण चांगलं, कौटुंबिक मेजवानीसाठी एखादं प्रशस्त किंवा खिसा सैल सोडून खास व्यक्तीलाच नेता येईल असं गोडगुलाबी अशा सगळ्या प्रकारच्या रेस्टॉरंटची अचूक माहिती हा मित्र देतो आणि त्यामुळेच तो ठरतो आपल्या खवय्येगिरीच्या खमंग प्रवासातला सच्चा वाट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2018 1:02 am

Web Title: zomato success story
Next Stories
1 चव ‘निराळी’
2 शिकत राहणे हेच ध्येय!
3 विरत चाललेले धागे : वृंदावनी वस्त्र
Just Now!
X