कर्मचारी भविष्य निधी संगठनेच्या (EPFO) सहा कोटींपेक्षा आधिक सदस्यांची २०१८-१९ या आर्थिक वर्षाची व्याजाची रक्कम ८.६५ टक्के दरांने लवकरच पीएफ खात्यात जमा होणार आहे. सहा कोटी पीएफ धारकांच्या खात्यावर लवकरच व्याजाची रक्कम जमा होईल. याला कामगार मंत्रालयाने मंजुरी दिली असून याबाबतची अधिसूचना काढल्याची माहिती कामगार मंत्री संतोष गंगावर यांनी दिली आहे.

२०१८-१९ या आर्थिक वर्षात पीएफच्या दरात केंद्र सरकारने ०.१० टक्के वाढ केली. त्यामुळे व्याजदर ८.५५ टक्क्यांवरून ८.६५ टक्के इतका झाला. दिवाळीच्या आधी व्याजाची सर्व रक्कम पीएफ धारकांच्या खात्यावर जमा केली जाण्याची शक्यता आहे. एसएमएस(SMS)द्वारे तूम्ही खात्यावर किती रक्कम आहे त्याची माहिती घेऊ शकता.

सण उत्सव तोंडावर असतानाच सरकारने नोकरदार वर्गाला खुशखबर दिली आहे. २०१८-१९ या कालावधीत ईपीएफओच्या ६ कोटी लाभधारकांना ८.६५ टक्के व्याजदर मिळणार आहे. सध्या ईपीएफवर दिला जाणार व्याजदर हा कोणत्याही शासकीय योजनेपेक्षा जास्त आहे. गेल्या महिन्यात अर्थमंत्री सीतारामण यांनी जीपीएफ (जनरल प्रॉव्हिडंट फंड) आणि इतर निधीवरील व्याजदर ७.९ टक्के करण्यात आले होते. त्याची मर्यादा ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपणार आहे.


चार प्रकारे तुम्हाला तुमच्या पीएफचा बॅलन्स तपासण्याची सोय आहे.
– ईपीएफओच्या वेबसाईटवर, ईपीओफओच्या अॅपवर, एसएमएसच्या माध्यमातून किंवा मिस कॉल देऊन.

– वेबसाईटवर बॅलन्स चेक करण्यासाठी https://epfindia.gov.in/site_en/index.php इथं भेट द्या. त्यासाठी तुमच्याकडे युनिव्हर्सल अकाउंट नंबर अॅक्टिवेट केलेला असण्याची गरज आहे. हा क्रमांक ईपीएफओ देतं व एम्प्लॉयर तो अॅक्टिवेट करतो. नोकरी बदलली तरी हा युएएन क्रमांक बदलत नाही, तो कायम राहतो. तुमच्या नोंदणी केलेल्या मोबाइलच्या माध्यमातून तुम्ही या पोर्टलवर पासवर्ड सेट करू शकता आणि नंतर तिथं दिलेल्या सूचनांनुसार पासबुकच्या माध्यमांमधून पीएफ बॅलन्स चेक करू शकता.

– ईपीएफओचं अॅप प्ले स्टोअरमध्ये असून ते डाऊनलोड करून मेंबर लॉगइनच्या ऑप्शनमधून बॅलन्स चेक करायची सोय आहे. इथंही नोंदणी असलेल्या मोबाइलच्या माध्यमातून जोडणी केली जाते.

– केवायसी डिटेल्स पूर्ण झाले असतील तरच एसएमएसच्या माध्यमातून बॅलन्स जाणून घेता येतो. EPFOHO UAN ENG असा मेसेज टाइप करायचा ENG च्या जागी MAR टाइप केलं तर मराठीत माहिती मिळेल. आपला UAN त्यात टाकून हा मेसेज 7738-299-899

– नोंदणीकृत मोबाइलवरून 011-22901406 या क्रमांकावर मिस कॉल दिल्यावर एसएमएस येतो आणि पीफच्या डिटेल्स तुम्हाला कळवल्या जातात.