10 Destinations to spot Firefiles near Mumbai this Pre Monsoon season मान्सून पुर्व पावसाच्या सरी पडून गेल्यात तशा अनेक मुंबईकर ट्रेकर्सला आणि भटकंतीची आवड असणाऱ्यांना आता मान्सून ट्रेक्सचे वेध लागले आहेत. पण थेट मान्सून ट्रेक्सवर उडी मारण्यापूर्वी तुम्हाला काजव्यांचा पाठशिवणीचा खेळ पाहण्यात रस असेल तर आमच्याकडे तुमच्यासाठी काहीतरी आहे. हो बरोबर ओळखलं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काजव्यांचे दर्शन घडणारी दहा ठिकाणे. रात्रीच्या काळोखात आपल्याकडील इवल्याश्या उजेडाने परिसर उजळवणाऱ्या या जमीनीवरील चांदण्याच जणू. याच काजव्यांचा हा खेळ तुम्हाला मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कोणकोणत्या ठिकाणी पाहता येईल हे जाणून घेऊयात या खास लेखामध्ये… आणि हो काजवे पाहण्याचा प्लॅन असेल तर लवकर तयारीला सुरुवात करा कारण पावसाळा सुरु झाला की ही संधी थेट पुढच्या वर्षी उपलब्ध होईल.

> राजमाची

In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
Amul dominates the Mumbai milk market
मुंबईच्या दूध बाजारपेठेवर ‘अमूल’चे वर्चस्व
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!
jalgaon gold price marathi news
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल

लोणावळ्यापासूनच जवळच असलेले हे ठिकाण मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे असे म्हणता येईल. लोणावळा स्थानकापासून अवघ्या १६ किलोमीटरवर असणाऱ्या राजमाचीवर तुम्हाला काजवे पाहता येतील. काजव्यांबरोबरच पहाटे दिसणारे सह्याद्री पर्वतरांगा आणि शिरोटा धरणाचे निसर्गरम्य दृष्य नक्कीच अविस्मरणीय असेच असते.

> सांधन व्हॅली

रॅपलींग, रॉक क्लाईबिंग आणि ट्रेकर्सची सर्वात आवडती जागा म्हणजे सांधन व्हॅली. पावसाला सुरुवात होण्याआधी काही आठवडे सांधन व्हॅलीमध्ये काजव्यांची जत्रा भरते असं म्हटल्यास वावगणे ठरणार नाही. मुंबईपासून रस्तेमार्गाने चार तासाच्या अंतरावर म्हणजेच अंदाजे १८५ किलोमीटरवर हे ठिकाण आहे.

> पुरुषवाडी

हे नाव तुम्ही या पूर्वी कधी ऐकले नसेल. मात्र पावसाळ्यापुर्वी काजवे पाहण्याच्या सर्वात सुंदर जागांपैकी एक असलेले पुरुषवाडी हे गाव कसाऱ्याजवळ आहे. ग्रासरुट्स नावाच्या एका संस्थेने हे गाव दत्तक घेतले असून गावातील सर्व पर्यटनाची देखरेख या संस्थेमार्फत केली जाते. मुंबईपासून हे ठिकाण १९० किलोमीटरवर आहे. स्वत:चा गाडी नसल्यास तुम्ही कसाऱ्यापर्यंत ट्रेनने आणि तिथून पुढे जीप किंवा बसने पुरुषवाडीला पोहचू शकता.

> प्रबळ माची

पनवेलपासून हाकेच्या अंतरावर असणारे प्रबळ माची हे काजवे पाहण्याचे आणखीन एक जवळचे ठिकाण. काजव्यांच्या प्रजनन काळात येथे मोठ्याप्रमाणात काजवे पाहता येतात. प्रबळगडावर पावसाळ्याआधी मोठ्या संख्येने काजवे दिसतात. तसेच प्रबळगडावरून दिसणाऱ्या डोंगररांगा म्हणजे चेरी ऑन द टॉप म्हणता येईल. मुंबईतून अवघ्या दीड तासात तुम्हाला या ठिकाणी पोहचता येते.

> माळशेज घाट

लॉग ड्राइव्हला जाणाऱ्यांचे आवडते ठिकाण म्हणजे माळशेज घाट. कल्याणवरून सत्तर किलोमीटरच्या अंतरावर असणारा माळशेज घाट हा बारा महिने पर्यटन स्थळ आहे असं म्हणू शकतो. पावसाळा सुरु होणाऱ्या आधी माळशेज घाटात अनेक ठिकाणी संध्याकाळच्या वेळी काजव्यांची शाळाच भरते जणू.

> दांडचे जंगल

गुजरातमधील दांडचे जंगल हे मुंबईपासून २८० किलोमीटरवर आहे. काजव्यांचे दर्शन होणाऱ्या सर्व ठिकाणांपैकी सर्वात शांत असणारे हे ठिकाण आहे. येथे इतर ठिकाणांपेक्षा पर्यटक संख्या कमी असते. नाकतोडे, फुलपाखरे, पतंगांचेही दर्शन या जंगलात दिवसभर होते तर संध्याकाळ होऊ लागते त्याप्रमाणे काजव्यांचे थक्क करणारे दर्शन होते.

> कोथळी गड (पेठचा किल्ला)

मुंबईपासून सव्वा दोन तासाच्या अंतरावर म्हणजे ९० किलोमीटरवर असणाऱ्या कोथळी गडाच्या पायथ्याचे गाव म्हणजेच अंबिवली गाव. या गावापासून जवळच असणाऱ्या पेढेवाडीजवळ काजवे पाहता येतात. गावातील स्थानिक लोक तुमच्या राहण्याची आणि जेवणाची सोय करतात. त्यामुळे तुम्ही अगदी नाईट स्टेसाठीही या गावचा विचार करु शकता.

> नाणेघाट

ठाणे आणि पुणे जिल्ह्याच्या सिमेवर असणारा नाणेघाट हे ट्रेकर्सचे आणखीन एक आवडते ठिकाण. पावसाळा सुरु झाल्यानंतर येथे ट्रेकर्सच्या वाऱ्या सुरु होतात. मात्र पावसळ्याच्या काही आठवडे आधी येथे गेल्यास तुम्हाला काजव्यांचा पाठशिवणीचा खेळ पाहता येईल. कल्याण वरुन अहमदनगरला जाणाऱ्या माळशेजच्या मार्गावरच वैशाखरे येथून नाणेघाटासाठी फाटा फुटतो. तुम्ही नाणेघाट चढून गेल्यावर वर असणाऱ्या गुफांमध्ये थांबू नाईट स्टे करु शकता. जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था तुमची तुम्हाला करावी लागेल.

> भीमाशंकर

भीमा नदीच्या तिरावर असलेले भीमाशंकर म्हणजे साह्याद्री डोंगररांगांमधील महत्वाचे ठिकाण. देवस्थान म्हणून लोकप्रिय असणारे भीमाशंकर ट्रेकर्ससाठीही तितकेच खास आहे. पावसाळा सुरु होणाऱ्याआधी भिमाशंकरचे जंगल रात्रीच्या वेळी काजव्यांच्या प्रकाशानत न्हाऊन निघते. ट्रेकिंगबरोबरच निर्सगदर्शन, पक्षी निरिक्षण आणि वनजीवन पाहण्याची हौस असणाऱ्या प्रत्येकासाठी भीमाशंकर हा उत्तम पर्याय आहे. या जंगलांमध्ये चित्ते, वाघ, हरणांबरोबरच इतरही प्राणी अढळतात. मुंबईपासून साडेचार तासांच्या अंतरावर म्हणजेच २१३ किलोमीटरवर हे ठिकाण आहे.

> कोंडाणाच्या गुहा

लोणावळा परिसरात काजवे पाहण्याचे आणखीन एक ठिकाण म्हणजे कोंडाणाच्या गुहा. मुंबईपासून दोन तासाच्या अंतरावर असलेल्या या गुहांच्या परिसरामध्ये काजव्यांचे दर्शन सहज होते. राजमाचीच्या तळाशी असणाऱ्या या बौद्ध गुहा या भारतीय स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमूना आहेत.