28 May 2020

News Flash

या १० चॉकलेट डिशेस एकदा तरी चाखून पाहाच

लहान मुलांच्या रडण्यावरचा अक्सीर उतारा आणि मोठय़ांच्या रुसव्या-फुगव्यावर महाऔषध म्हणून सर्वच आबालवृद्ध 'चॉकलेट'भक्त आहेत.

| September 26, 2014 04:31 am

चॉकलेट आणि त्यापासून बनवलेले पदार्थ आपल्यापैकी अनेकांचा वीक पाईंट असेल. लहान मुलांच्या रडण्यावरचा अक्सीर उतारा आणि मोठय़ांच्या रुसव्या-फुगव्यावर महाऔषध म्हणून सर्वच आबालवृद्ध ‘चॉकलेट’भक्त आहेत. दहा जणांपैकी कुणालाही चॉकलेट आवडते का विचाराल, तर नऊ जणांच्या प्रामाणिक आणि एकाच्या खोटय़ा विधानाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे तुम्हीदेखील चॉकलेटभक्त असाल तर या १२ डिशेस एकदा चाखून पाहाच.

१. चॉकलेट आणि चिली केक
तुम्ही जर पट्टीचे खवय्ये असाल आणि खाण्याच्या बाबतीत प्रयोग करून पाहणारे असाल, तर एकदा चॉकलेट आणि मिरची यांच्यापासून तयार करण्यात आलेला केक खाण्यास हरकत नाही.

२. चॉकलेटचे आवरण असलेले बटाटा वेफर्स
सतत कुरकुरीत पदार्थ खाणाऱ्यांसाठी चॉकलेटच्या आवरणातील वेफर्स खाण्याची कल्पना स्वर्गसुखापेक्षा कमी नाही.

३. चॉकलेट चीज सँडविच
चॉकलेट आणि चीजचे भन्नाट कॉम्बिनेशन असलेले सँडविच म्हणजे खवय्यांसाठी एकप्रकारची पर्वणीच.

४. चॉकलेट पॉपकॉर्न
आपल्यापैकी अनेकांनी पॉपकॉर्नचे कॅरामल,चीज फ्लेवर चाखून पाहिले असतील. पण चॉकलेट पॉपकॉर्न खाण्यातील आनंद हा काहीसा वेगळाच असतो.

५. चॉकलेट पिझ्झा
पिझ्झा आणि चॉकलेट तेही एकत्र, नुसती कल्पना करूनच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटले असेल.

६. चॉकलेट समोसा
सबकुछ चॉकलेटच्या यादीतील हा आणखी एक पदार्थ. त्यामुळे चॉकलेट समोसाचा हटके ऑप्शन एकदातरी ट्राय करून बघायला हरकत नाही.

७. चॉकलेट चिकन करी
ही कल्पना काहीशी विचित्र आणि न पचणारी वाटत असली तरी, पट्टीचे खवय्ये आणि चॉकलेटचे डाय हार्ड फॅन असलेल्या लोकांनी हा पदार्थ चाखून पहावा.

८. चॉकलेट डोसा
तुम्ही दक्षिण भारतीय पदार्थ विशेष करून डोसा खाण्याच्या मूडमध्ये असाल तर, चॉकलेट डोसाचा ऑप्शन ट्राय करण्यास हरकत नाही.

९. चॉकलेट श्रीखंड
गोड पदार्थांचे चाहते असणाऱ्यांच्या यादीत श्रीखंडाला कायमच वरचे स्थान मिळत आले आहे. अशा लोकांनी चॉकलेट श्रीखंडाचा भन्नाट फ्लेवर चाखून बघितलाच पाहिजे.

१०. चॉकलेट सूप
समजा, तुम्ही आजारी असाल आणि तुमच्यासमोर भाज्या घातलेल्या सुपऐवजी चॉकलेट सूप आले तर. ही कल्पना ऐकूनच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटले असेल. चॉकलेटच्या शोधानंतर सुरुवातीची काही शतके मात्र तो पिण्याची गोष्ट म्हणूनच ओळखला जायचा. कोर्टेझ याने स्पेनच्या दरबारात १५२८मध्ये प्रथम कोको आणला. त्याच्यापासून केलेले पेय फार स्वादिष्ट लागत असे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2014 4:31 am

Web Title: 12 chocolate dishes you have probably never tasted before
टॅग Lifestyle
Next Stories
1 जास्तवेळ काम केल्यास मधुमेहाचा धोका!
2 व्यक्तीची मानसिक स्थिती सांगणारे स्मार्टफोन अॅप्लिकेशन
3 स्मार्टफोनच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी ‘नो फोन’चा पर्याय
Just Now!
X