News Flash

२० कोटी भारतीयांना उच्च रक्तदाब

जगभरातील १.१३ अब्ज नागरिक यामुळे त्रस्त आहेत.

| November 19, 2016 12:55 am

वीस कोटी भारतीयांना उच्च रक्तदाब असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात स्पष्ट झाले असून, जगभरातील १.१३ अब्ज नागरिक यामुळे त्रस्त आहेत.

लंडनमधील इम्पेरिअल कॉलेजमधील शास्त्रज्ञांनी जगभरातील उच्च रक्तदाब असलेल्या नागरिकांचा अभ्यास केला असून ही संख्या पुढील ४० वर्षांत दुप्पट होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. जगभरातील अध्र्यापेक्षा अधिक उच्च रक्तदाब असलेले प्रौढ २०१५मध्ये आशियात होते. तर चीनमधील २२६ दशलक्ष लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, असे ‘द लॅन्सेट’ मासिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनात मांडण्यात आलेले आहे. १९७५ ते २०१५ या कालावधीत जगभरातील उच्च रक्तदाब असलेल्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण अधिक असल्याचे संशोधन यात करण्यात आले आहे. तसेच जगभरात २०१५ या वर्षी महिलांपेक्षा पुरुषांनाच उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे स्पष्ट झाले आहे. जगभरात ५९७ दशलक्ष पुरुषांना तर  ५२९ दशलक्ष महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

उच्च उत्पन्न गटातील देशांतून उच्च रक्तदाबाचे प्रमाण कमी होत असून कमी आणि मध्यम उत्पन्न गटांतील विशेषत: आफ्रिका आणि दक्षिण आशियातील देशांत उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत आहे. ब्रिटन आणि युरोपातील देशांमध्ये तसेच दक्षिण कोरिया, अमेरिका आणि कॅनडा या देशांत उच्च रक्तदाबाचे प्रमाण कमी आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 12:54 am

Web Title: 20 crore indians have high blood pressure
Next Stories
1 राष्ट्रीय आयुष परिषद तयार करण्यासाठी सरकार विचाराधीन
2 कॉर्पोरट क्षेत्रातील २० टक्के कर्मचाऱ्यांना मधुमेह?
3 झोपण्यापूर्वी ‘या’ गोष्टींचा विचार नक्की करावा
Just Now!
X