News Flash

Asus चा ‘गेमिंग स्पेशल स्मार्टफोन’ स्वस्तात खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या डिटेल्स

कॅश डिस्काउंटसह आकर्षक ऑफर्सचाही मिळेल लाभ

Asus कंपनीने आपल्या गेमिंग स्पेशल स्मार्टफोन ROG Phone 3 वर दोन हजार रुपये डिस्काउंटची घोषणा केली आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या Mobile Bonanza सेलमध्ये ROG Phone 3 हा फोन डिस्काउंटसह खरेदी करता येईल. फ्लिपकार्टचा Mobile Bonanza सेल 6 डिसेंबरपासून सुरू झाला असून 10 डिसेंबर म्हणजे आज या सेलचा अखेरचा दिवस आहे. सेलमध्ये अनेक ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर ऑफर्स आहेत. फ्लिपकार्ट सेलमध्ये पोको एम2 प्रो, सॅमसंग गॅलेक्सी एफ41, आयफोन एसई, रेडमी 9आय आणि रिअलमी सी11 हे फोन आकर्षक ऑफरसह उपलब्ध आहेत.

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये ROG Phone 3 या फोनच्या खरेदीवर काही आकर्षक ऑफर्सचाही लाभ मिळू शकतो. सेलमध्ये Asus ROG Phone 3 (8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंट) डिस्काउंटनंतर 44,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि EMI वर हा फोन 43,249 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर, 12 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंट डिस्काउंटनंतर 47,999 रुपयांमध्ये मिळेल. पण बँक ऑफर्ससह हा फोन 46,249 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.

Asus ROG Phone 3: स्पेसिफिकेशन्स :-
गेमिंगच्या दृष्टीकोनातून बनवण्यात आलेल्या Asus ROG Phone 3 मध्ये 6.59 इंचाचा फुल एचडी+ एमोलेड पॅनलसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865+ प्रोसेसर आहे. ग्राफिक्ससाठी अॅड्रेनो 650GPU आहे. फोनमध्ये चांगल्या परफॉर्मन्स एक कॉपर 3D व्हेपर चेंबर आहे आणि कूलिंगसाठी मोठी ग्रेफाइट फिल्म देण्यात आली आहे. याशिवाय टाइप-सी पोर्ट, X-मोडचाही समावेश आहे. रिअर कॅमेऱ्यासाठी या फोनमध्ये 64 मेगापिक्सेलचा सोनी IMX686 सेन्सर, 13 मेगापिक्सेल अल्ट्र-वाइड, 5 मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आहे. तर, सेल्फीसाठी 24 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 2:29 pm

Web Title: 2000 rupees flat discount on asus rog phone 3 flipkart mobile bonanza sale sas 89
Next Stories
1 अडचणीत वाढ! फेसबुकला विकावं लागणार इन्स्टाग्राम आणि WhatsApp ?
2 Apple अ‍ॅप स्टोअर मध्ये आणणार प्रायव्हसी लेबल; WhatsApp म्हणालं…
3 व्होडाफोन आयडियाच्या नव्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा, कॉलिंग; जाणून घ्या माहिती
Just Now!
X