News Flash

2019 BMW 3 Series भारतात लाँच, किंमत किती?

पेट्रोल आणि डिझेल, अशा दोन्ही प्रकारात भारतीय बाजारात दाखल

2019 BMW 3 Series भारतात लाँच, किंमत किती?

BMW ने भारतीय बाजारात नवीन 3 Series कार लाँच केली आहे. ही कार म्हणजे सातवी जनरेशन BMW 3 Series आहे. ही नवी कार पेट्रोल आणि डिझेल, अशा दोन्ही प्रकारात भारतीय बाजारात उतरवण्यात आली आहे. ही कार 320d Sport, 320d Luxury Line, 330i M Sport अशा तीन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. यातील पहिले दोन व्हेरिअंटमध्ये डिझेल इंजिन आणि तिसरी पेट्रोल इंजिन प्रकारातील कार आहे. 41.40 लाखांपासून या कारची किंमत सुरू होते. ही एक्स-शोरुम किंमत आहे.

नवी बीएमडब्ल्यू 3 सीरिज कारची क्लस्टर आर्किटेक्चर प्लॅटफॉर्मवर निर्मिती करण्यात आली आहे. कारच्या पुढील बाजूला L-आकारातील एलईडी डीआरएल, एलईडी हेडलॅम्प, एलईडी फॉग लॅम्प आहे. पुढील बंपरच्या डिझाइनमध्येही बदल करण्यात आलेत. मागील बाजूलाही L- आकारातील टेललाइट्स आणि नव्या डिझाइनसह बंपर आहे. ही कार चार रंगांच्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे.

नवीन 3 – सीरिजच्या कॅबिनलाही अपडेट करण्यात आलं असून यामध्ये तुम्हाला 8.8-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, 3-स्पोक मल्टी-फंक्शन स्टिअरिंग व्हिल आणि 12.3-इंच डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर मिळेल. नव्या कारमध्ये क्लायमेट कंट्रोल सिस्टिम, वायरलेस मोबाइल चार्जिंग, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, रेन सेंसिंग वायपर्स, इलेक्ट्रिक सनरूफ आणि रिअर व्ह्यू कॅमेऱ्यासह पार्किंग असिस्टंट यांसारखे अनेक फीचर्स आहेत.

इंजिन –
बीएमडब्ल्यूच्या या कारमध्ये 2.0-लिटर, टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि डिझेल इंजिन आहे. पेट्रोल इंजिन 258hp ऊर्जा आणि 400Nm टॉर्क निर्माण करतं. तर, डिझेल इंजिन 190hp ची ऊर्जा आणि 400Nm टॉर्क निर्माण करतं. दोन्ही इंजिनमध्ये 8-स्पीड टॉर्क-कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. ही कार ऑडी ए4 आणि जग्वार एक्सई यांसारख्या कारसोबत स्पर्धा असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 1:21 pm

Web Title: 2019 bmw 3 series launched in india know all specifications and price sas 89
Next Stories
1 ‘मारुती’ची नवी कार XL6 झाली लाँच, किंमत आणि खासियत
2 साप चावल्यानंतर टाळा ‘या’ गोष्टी !
3 अॅसिडीटीपासून त्वचेच्या विकारांसाठी उपयोगी आहे पिंपळाचं झाड, जाणून घ्या फायदे
Just Now!
X