जग्वार लॅण्ड रोव्हरने आज २०१९ डिस्कव्हरी स्पोर्ट एसयूव्ही मॉडेलची घोषणा केली. २०१९ डिस्कव्हरी स्पोर्ट एसयूव्हीमधून आता साहसी आणि वैविध्यपूर्ण प्रवास अनुभवता येणार आहे.

“मॉडेल इयर २०१९ डिस्कव्हरी स्पोर्टसह आम्ही आमच्या ग्राहकांसमोर वैविध्यपूर्ण आणि सुधारित अशा शक्तीशाली वाहनांचे अधिक पर्याय ठेवले आहेत. या गाड्या अधिक कार्यक्षम आहेत तसेच त्या चालवण्याचा अनुभव अधिक चांगला आहे. डिझाइनमधील वेगळेपण हे आणखी एक वैशिष्ट्ये आहे असे जग्वार लॅण्ड रोव्हर इंडिया लिमिटेड (जेएलआरआयएल) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रोहित सुरी म्हणाले.

२.० आय इंजेनिअम डिझेल इंजिनची शक्ती लाभलेल्या एसई आणि एचएसई या प्रकारातील इंजिन आउटपुट आता अधिक शक्तिशाली म्हणजेच १३२ किलोवॅट झाले आहे. ११० किलोवॅट आउटपुटचे इंजिन असलेला मूळ प्रकार यापुढेही उपलब्ध राहील असे त्यांनी सांगितले.
केवळ एचएसई लग्झरीमध्ये उपलब्ध असलेल्या डायनॅमिक डिझाइन पॅकमध्ये काही महत्त्वाच्या बाह्य सुविधा देण्यात आल्या आहेत.

उदाहरणार्थ, बॉडी स्टायलिंग किट, क्रोम टेलपाइप फिनिशर, अनोख्या ब्लॅक ग्रिलसह ब्लॅक पॅक, ब्लॅक रिर लायसन्स प्लेट प्लिंथ आणि रेड ‘स्पोर्ट’ बॅज. या सर्व सुधारित घटकांसोबत सर्वाधिक अद्ययावत टच प्रो अपग्रेड्स देण्यात आले आहेत. ते टच प्रो ड्युओसारखेच आहेत.

भारतात उपलब्ध असलेली लँड रोव्हर उत्पादने
भारतातील लँड रोव्हर मालिकेत डिस्कव्हरी स्पोर्ट Discovery Sport (किंमत ४४.६८ लाख रुपयांपासून पुढे), रेंज रोव्हर इव्होक Range Rover Evoque (किंमत ५२.०६ लाख रुपयांपासून पुढे), ऑल-न्यू डिस्कव्हरी All-New Discovery (किंमत ७४.९५ लाख रुपयांपासून पुढे), न्यू रेंज रोव्हर वेलार New Range Rover Velar (किंमत ८२.९० लाख रुपयांपासून पुढे), रेंज रोव्हर स्पोर्ट Range Rover Sport (किंमत १०२.४६ लाखांपासून पुढे) आणि रेंज रोव्हर Range Rover (किंमत १७९.५२ लाख रुपयांपासून पुढे) उपलब्ध आहेत.