एसयुव्ही कार सेगमेंटमध्ये जगभरातील कंपन्या आपल्या वाहनांना नवं तंत्रज्ञान आणि लेटेस्ट फीचर्ससह लाँच करत आहेत. याशिवाय अनेक कंपन्यांनी आपल्या जुन्या वाहनांना अपडेट करुन पुन्हा लाँच केलं आहे. यामध्ये आता महिंद्रा अँड महिंद्राच्या (M&M) Mahindra TUV300 चाही समावेश झाला आहे. कंपनीने 2019 Mahindra TUV300 फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केलं आहे. या अपडेटेड व्हर्जनमध्ये कारच्या आतून आणि बाहेरुन अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. ग्राहकांना सात आकर्षक रंगांमधून निवड करता येणार असून त्यात हायवे रेड आणि मिस्टिक कॉपर या दोन नव्या रंगांचाही समावेश करण्यात आला आहे. स्टायलिश ड्युअल टोनशिवाय लाल आणि काळा/ चंदेरी आणि काळा, उठावदार काळा, मॅजेस्टिक सिल्व्हर आणि पर्ल व्हाइट हे मूळ रंगही उपलब्ध आहेत. सध्याच्या व्हेरिएंटशिवाय (टीफोरप्लस, टीसिक्सप्लस, टीएट आणि टीटेन) टी१०(ओ) चा पर्यायी पॅकही उपलब्ध आहे, ज्यात लेदर सीट्स आणि लंबर सपोर्ट मिळेल.

फीचर्स –
यामध्ये नवे, आक्रमक, पियानो ब्लॅक फ्रंट ग्रिल ब्लॅक क्रोमो इन्सर्टसह, दणकट साइड क्लॅडिंग आणि नव्याने तयार करण्यात आलेले एक्स आकाराचे मेटॅलिक ग्रे स्पेयर व्हील कव्हर समाविष्ट करण्यात आले आहे. डेटाइम रनिंग लॅम्प्ससह (डीआरएल) नवे हेडलॅम्प डिझाइन आणि कार्बन ब्लॅक फिनिश नव्या, बोल्ड टीयूव्ही 300 ची स्टाइल आणखी उठावदार करणार आहे. फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, GPS सह 17.8 सेंटीमीटर इंफोटेनमेंट सिस्टिम, स्टॅटिक बेंडिंग हेडलँप्स आणि मायक्रो-हायब्रिड टेक्नोलॉजी वापरण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या TUV300 मध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, ABS+EBD आणि कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल सिस्टिम आहे.

mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Google agreed to destroy browsing of data records to settle a lawsuit claiming it secretly tracked internet use of people
गूगल करणार अब्जावधी युजर्सचा डेटा डिलीट, नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या
blind beggar begging with QR code viral video
Video : वाह! भीक मागण्याची ‘आधुनिक’ पद्धत पाहून व्हाल चकित! पाहा अंध भिकाऱ्याचा ‘हा’ जुगाड

इंजिन –
Mahindra TUV300 एसयुव्हीमध्ये 1.5 लीटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे. हे इंजिन 100bhp पावर आणि 240Nm टॉर्क जनरेट करतं. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असून इलेक्ट्रॉनिक स्टॉप-स्टार्ट तंत्रज्ञानासह महिंद्राची मायक्रो हायब्रिड सिस्टिम आहे. कुशन सस्पेंशन तंत्रज्ञान आणि ऑप्टिमाइज्ड राइड हाइटमुळे गाडी चालवण्याचा आनंद दुणावतो. त्याव्यतिरिक्त मजबूत प्रकारच्या स्टीलपासून बनवलेल्या टफ बॉडी शेलमुळे प्रवासी सुरक्षित राहातील. टीयूव्ही 300 ची चासिस महिंद्रा स्कॉर्पिओवरून प्रेरणा घेऊन बनवण्यात आली आहे.

किंमत –
TUV300 फेसलिफ्ट व्हर्जनची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख ते 10.49 लाख रुपये आहे. यामध्ये TUV300 एसयुव्हीच्या T4+ व्हेरिअंटची किंमत 8.49 लाख रुपयांपासून सुरू होते, तर टॉप एंड T10 ऑप्शनल ड्युअल टोन ट्रिमची किंमत 10.49 लाख रुपये आहे.