मारुती सुझुकीच्या नव्या Baleno साठी आजपासून बुकिंग सुरू झालं आहे. अवघ्या 11 हजार रुपयांमध्ये ग्राहकांना या कारसाठी बुकिंग करता येणार आहे. या महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्याच्या सुरूवातीला कंपनी ही कार लाँच करण्याची शक्यता आहे.

या नव्या फेसलिफ्ट बलेनोत आतून आणि बाहेरुन अनेक बदल करण्यात आले आहेत. नवी बलेनो बोल्ड व स्टायलिश डिझाइन आणि प्रीमियम इंटेरियरसह येईल. यामध्ये स्पीड अलर्ट सिस्टीम, को-ड्रायव्हर सीट बेल्ट रिमाइंडर आणि रिअर पार्किंग सेंसर्स यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय यामध्ये ड्युअल एअरबॅग्स, ISOFIX चाइल्ड सेफ्टी सीटही आहे.

आताप्रमाणेच ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिनांमध्ये असेल. यामध्ये 1.2 लीटरचे पेट्रोल इंजिन असून ते 83 bhp ची पावर आणि 115 Nm टॉर्क तयार करतो. 1.3 लीटरचे डिझेल इंजिन असून ते 74 bhp पॉवर आणि 190 Nm टॉर्क तयार करतो. आताच्या बलेनोपेक्षा या नव्या मॉडेलची किंमत 25 ते 30 हजारांनी जास्त असण्याची शक्यता आहे.

वर्ष 2016 पासून बलेनो भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. याशिवाय सर्वात जलद 5 लाख युनिट विकण्याचा(38 महिने) विक्रमही बलेनोच्या नावावर आहे.