मारुती सुझुकीने आपली Ignis ही  कार नव्या अवतारात लाँच केली आहे. 4.79 लाख रुपये(एक्स शोरुम किंमत) इतकी 2019 Maruti Suzuki Ignis च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत ठेवण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या कारमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. मात्र या कारच्या स्टाइलमध्ये बदल करण्यात आलेला नाही.

रिव्हर्स पार्किंग सेंसर, स्पीड अलर्ट सिस्टीम आणि पॅसेंजर सीटबेल्ट रिमाइंडर हे तीन फीचर्स नव्या इग्निसच्या सर्व व्हेरिअंटमध्ये देण्यात आले आहेत. तर, केवळ Zeta आणि Alpha व्हेरिअंटमध्येच रूफ रेल्सचा पर्याय आहे. पण नव्या इग्निसमध्ये जुनीच स्मार्ट-प्ले इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे.  म्हणजेच नुकत्याच लाँच झालेल्या फेसलिफ्ट बलेनो आणि नव्या वॅगनआर प्रमाणे स्मार्ट-प्ले स्टुडिओ नाहीये.

इंजिन –मॅकॅनिकली नव्या इग्निसमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये 1.2-लिटर K12 पेट्रोल इंजिन आहे. 1197cc आणि 4-सिलिंडर असलेलं हे इंजिन 6000 rpm वर 83 bhp ची पावर आणि 4200 rpm वर 113 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशनचाही पर्याय उपलब्ध आहे.

किंमत – 

– Ignis Sigma – 4.79 लाख रुपये

-Ignis Delta – 5.40 लाख रुपये

-Ignis Zeta – 5.82 लाख रुपये

-Ignis Alpha – 6.67 लाख रुपये

-Ignis Delta ऑटोमॅटिक – 5.87 लाख रुपये

-Ignis Zeta ऑटोमॅटिक -6.29 लाख रुपये

-Ignis Alpha ऑटोमॅटिक – 7.14 लाख रुपये