16 November 2019

News Flash

TVS Jupiter ZX स्कूटर नव्या अवतारात लाँच, ‘Activa 5G’ ला टक्कर

ड्रम ब्रेक आणि डिस्क ब्रेक अशा दोन्ही प्रकारात ही स्कूटर उपलब्ध

TVS कंपनीने आपली लोकप्रिय स्कूटर Jupiter ZX नव्या अवतारात लाँच केली आहे. ही स्कूटर ड्रम ब्रेक आणि डिस्क ब्रेक अशा दोन्ही प्रकारात सादर करण्यात आली. ड्रम ब्रेक असलेल्या व्हेरिअंटची एक्स शोरुम किंमत 56 हजार 93 रुपये तर डिस्क ब्रेक असलेल्या व्हेरिअंटची किंमत 58 हजार 645 रुपये आहे. सीबीएस अर्थात कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टिमचं एसबीटी हे फीटर या स्कूटरमध्ये आहे.

Jupiter ZX एलईडी हेडलाइट, डिजिटल-अॅनालॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि नवीन अॅड्जस्टेबल मोनोशॉक हे फीचर्स आहेत. यापूर्वी Jupiter Grand मध्ये हे सर्व फीचर्स होते, मात्र या मॉडलचं उत्पादन बंद करण्यात आलं आहे. याचा अर्थ कंपनीने Jupiter Grand लाच नव्या अवतारात लाँच केलंय असा होत नाही. कारण नव्या स्कूटरमध्ये युनीक अॅलॉय व्हिल्स आणि सीट कव्हर पॅटर्न नाहीये. ही नवी स्कूटर स्टारलाइट ब्ल्यू आणि रॉयल वाइन या दोन रंगांमध्येच उपलब्ध असेल. याशिवाय स्कूटरमध्ये मॅकेनिकली काहीही बदल करण्यात आलेला नाही. स्कूटरचं इंजिन 109.7cc क्षमतेचं असून 8hp ची ऊर्जा 8.4Nm पीक टॉर्क निर्माण करतं. टीव्हीएसची ही नवी स्कूटर बाजारातील 110cc क्षमतेच्या होंडा कंपनीच्या ‘अॅक्टिव्हा 5जी’साठी आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे. ‘अॅक्टिव्हा 5जी’मध्येही एलईडी हेडलाइट आणि डिजिटल-अॅनालॉग गेज अशे फीचर्स आहेत. ‘अॅक्टिव्हा 5जी’च्या ड्रम आणि डिस्क व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 54 हजार 632 आणि 56 हजार 497 रुपये आहे.

First Published on June 10, 2019 11:56 am

Web Title: 2019 tvs jupiter zx launched sas 89