News Flash

21 हजारांत बुकिंगला सुरूवात, येतेय नवीन Honda WR-V

मारुती ब्रेझा, टाटा नेक्सॉनला टक्कर..

Honda भारतीय बाजारात आपली क्रॉसओव्हर एसयूव्ही WR-V फेसलिफ्ट मॉडेलमध्ये लाँच करणार आहे. कंपनीकडून नव्या Honda WR-V साठी बुकिंग घ्यायलाही सुरूवात केली आहे. 21 हजार रुपयांमध्ये होंडाच्या डीलरशिपमध्ये या कारच्या बुकिंगला सुरूवात झालीये. या महिन्याच्या अखेरपर्यंत ही कार भारतीय बाजारात लाँच केली जाण्याची शक्यता आहे. पण कंपनीकडून अद्याप तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. मारुती ब्रेझा, टाटा नेक्सॉन, महिंद्रा एक्सयूव्ही 300, ह्युंदाई व्हेन्यू आणि फोर्ड इकोस्पोर्ट यांसारख्या गाड्यांशी नव्या फेसलिफ्ट होंडा WR-V ची स्पर्धा असेल.

(आणखी वाचा – ’10 ऑटोमॅटिक गिअर’ असलेली देशातील एकमेव SUV लाँच, Fortuner ला टक्कर)

होंडा WR-V फेसलिफ्टच्या बाहेरील बाजूला काही बदल पाहायला मिळतील, यामध्ये नवीन ग्रिल, रिवाइल्ड बंपर आणि नवीन फॉग लॅम्प हाउसिंगचा समावेश आहे. नवीन होंडा WR-V कारमध्ये एलईडी पॅकेजसह इंटीग्रेटेड डीआरएलसोबत अॅडव्हान्स एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, नवीन एलईडी फॉग लॅम्प आणि नवीन एलईडी रिअर कॉम्बिनेशन लॅम्प मिळतील. तर आतील बाजूला थोडेफार बदल केले जाण्याची अपेक्षा आहे.

(आणखी वाचा – लाँचिंगआधीच बुकिंगला सुरूवात, ‘सेल्टॉस’ला Hyundai च्या ‘एसयूव्ही’ची टक्कर)

इंजिन :-
Honda WR-V फेसलिफ्टमध्ये बीएस6 कम्प्लायंट 1.2-लीटर पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन मिळेल. पेट्रोल इंजिन 89bhp ची पावर आणि 110Nm टॉर्क निर्माण करेल, तर डिझेल इंजिन 99bhp ची पावर आणि 200Nm टॉर्क निर्माण करेल. दोन्ही इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्याय असेल.

(आणखी वाचा – ‘मारुती’च्या SUV चा जलवा, फक्त 20 दिवसांत बुकिंग 10 हजारांपार)

किंमत :-
नवीन Honda WR-V ची किंमत सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मॉडेलपेक्षा 7-8 हजार रुपयांनी जास्त असण्याची शक्यता आहे. सध्या या कारची किंमत 8.08 लाख ते 10.48 लाख रुपयांदरम्यान आहे.

(आणखी वाचा – ‘सर्वात स्वस्त’ BS6 बुलेट आली, ‘रॉयल एनफील्ड’ची Classic 350 लाँच झाली)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 9:56 am

Web Title: 2020 honda wr v facelift bookings open know expected price specifications and all other details sas 89
Next Stories
1 येतेय बजाजची छोटी Dominar, किती असेल किंमत?
2 Holi 2020 : होळीचं सेलिब्रेशन; घरीच असे बनवा नैसर्गिक रंग
3 Holi 2020 : रंगाला घाबरु नका; त्वचा आणि केसांची अशी घ्या काळजी
Just Now!
X