25 January 2021

News Flash

MG Hector Facelift भारतात उद्या होणार लाँच, मिळेल ‘हिंग्लिश’ व्हॉइस कमांड्स फिचर; जाणून घ्या डिटेल्स

'हिंग्लिश' व्हॉइस कमांड्स हे खास फिचर ऑटो सेगमेंटमध्ये प्रथमच...

MG Motor India सात जानेवारी अर्थात उद्या भारतात नवीन 2021 MG Hector SUV फेसलिफ्ट लाँच करणार आहे. एमजी हेक्टर फेसलिफ्ट भारतात अनेक बदलांसह लाँच होणार आहे. कंपनीने भारतात सर्वप्रथम एमजी हेक्टर ही एसयूव्ही लाँच केली होती. या भारतातील पहिल्या इंटरनेट एसयूव्हीला ग्राहकांचा दमदार प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता कंपनी ही कार अपडेटेड व्हर्जनमध्ये लाँच करणार आहे. आधीपेक्षा जास्त बोल्ड आणि आक्रमक डिझाइनसोबतच इंटेरियरमध्येही काही बदल दिसतील.

या एसयूव्हीमध्ये काही अद्ययावत फीचर्सचा समावेश असणार आहे. यात ‘हिंग्लिश’ व्हॉइस कमांड्स हे ऑटो सेगमेंटमध्ये प्रथमच देण्यात येणाऱ्या फिचरचा समावेष असेल. म्हणजेच इंग्लिशसोबत हिंदीत व्हॉइस कमांडची सुविधा मिळेल. कारमध्ये बसताच तुम्ही हिंदीत एफएम चलाओ, एसी का टेंपरेचर कम कर दो, इंग्लिश गाना बजाओ असं बोलल्यानंतर कार त्यावर प्रतिसाद देईल. ही कार सिंगल टोन (ब्लॅक) इंटेरिअर, ड्युएल-टोन इंटेरिअर, ड्युएल टोन-एक्सटेरिअर अशा अनेक पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. नवीन एसयूव्हीमध्ये 17-इंचाच्या अलॉय व्हील्सऐवजी 18-इंच अलॉय व्हील्स मिळतील. एमजी हेक्टर फेसलिफ्टमध्ये ट्विन-5-स्पोक अलॉय व्हील्स असण्याची शक्यता आहे. तसेच या कारमध्ये वायरलेस चार्जिंग, फ्रंट व्हेंटिलेटेड सिट्स (फर्स्ट इन सेगमेंट), ड्युएल-टोन बेज आणि ब्लॅक इंटेरिअरचा पर्यायही उपलब्ध आहे.

नवीन एसयूव्ही 1.5-लिटर पेट्रोल, 1.5-लिटर पेट्रोल हायब्रिड आणि 2.0-लिटर डिझेल इंजिन व्हेरिअंट्समध्ये लाँच होऊ शकते. पेट्रोल आणि पेट्रोल-हायब्रिड इंजिन व्हेरिअंटमध्ये 141 bhp पॉवर आणि 250 Nm पीक टॉर्क जनरेट होतं. तर, डिझेल इंजिनमध्ये 168 bhp पॉवर आणि 350 Nm पीक टॉर्क जनरेट होतं. हेक्टर एक नवीन टेल-लॅम्प जॉइनिंग सेक्शन आणि एक नवीन ‘हेक्टर’ लोगोसोबत एका रीफ्रेश रिअर प्रोफाइलसह येईल. किंमतीबाबत बोलायचं झाल्यास सध्याची हेक्टर भारतात 12.84 लाख रुपये ते 18.09 लाख रुपयांदरम्यान (एक्स-शोरूम) आहे. त्यामुळे नवीन हेक्टरची किंमत यापेक्षा थोडी जास्त असण्याची शक्यता आहे.

यापूर्वी भारतातील पहिली इंटरनेट एसयूव्ही एमजी हेक्टर, इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही एमजी झेडएस ईव्ही आणि पहिली ऑटोनॉमस (लेव्हल-१) प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर या कंपनीच्या तिन्ही गाड्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2021 2:15 pm

Web Title: 2021 mg hector facelift india launch tomorrow will support hinglish voice commands in india check details sas 89
Next Stories
1 Airtel ऑफर! 298 रुपयांच्या रिचार्जवर 50 रुपये डिस्काउंट, मिळेल 2GB एक्स्ट्रा डेटाही
2 नवीन अटी स्वीकारा, नाहीतर अकाउंट Delete करा; WhatsApp ने अपडेट केली प्रायव्हसी पॉलिसी
3 नववर्ष आरोग्यदायी जावो!!
Just Now!
X