चीनची स्मार्टफोन तयार करणारी कंपनी शाओमीने यावर्षाच्या सुरूवातीलाच आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Mi 9 लाँच केला होता. प्रिमिअम स्मार्टफोन डिव्हाईसमधला सर्वात लोकप्रिय ठरलेला हा स्मार्टफोन आहे. केवळ चीनमध्येच नाही, तर युरोपमध्येही या स्मार्टफोनचे अनेक चाहते आहेत. शाओमीने युरोपीयन देशांमध्येही हा फोन लाँच केला होता. स्वीडन त्यापैकीच एक प्रमुख देश. दरम्यान, स्वीडनने आता या स्मार्टफोनचे कस्टम गोल्ड एडिशन तयार केले आहे.

गोल्डन कॉन्सेप्ट नामक एका स्विडनच्या टेक कंपनीने 24K गोल्ड प्लेटेड Mi 9 चे कस्टमाइज लिमिटेड एडिशन तयार केले आहे. कस्टमाइज्ड आयफोन आणि आयफोनच्या केसेस तयार करण्यासाठी ही कंपनी प्रसिद्ध आहे. या कंपनीने तयार केलेल्या गोल्ड प्लेटेड आयफोन्सची विक्री तब्बल ४० हजार डॉलर्स (अंदाजे २८ लाख) रूपयांना विकण्यात आली होती. कस्टमाइज्ड आयफोन्सचा वापर करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. गोल्डन कॉन्सेप्ट या कंपनी व्यतिरिक्त अन्य कंपन्याही आयफोन आणि आयफोनच्या केसेस कस्टमाइज्ड करतात. परंतु शाओमीची स्मार्टफोन पहिल्यांदाच कस्टमाइज्ड करण्यात आले आहेत.

आगामी काळात कंपनी आणखी कंपन्यांचे प्रिमिअम स्मार्टफोन कस्टमाइज करण्याची शक्यता आहे. दरम्यान, Mi 9 च्या रिअर पॅनलला गोल्ड प्लेटेड पॅनलने रिप्लेस करण्यात आले आहे. तसेच यावर ड्रॅगनचेही चित्र रेखाटण्यात आले आहे. सध्या या मोबाइलची किंमत किती असेल याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

भारतात Mi 9 हा स्मार्टफोन लाँच झाला नसून या महिन्याच्या अखेरिस हा फोन भारतीय बाजारपेठेतही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारतात या फोनची किंमत ३२ ते ३५ हजारांदरम्यान असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या स्मार्टफोनच्या ग्लोबल व्हर्जनमध्ये १२८ जीबी इंटरनल मेमरी आणि ६ जीबी रॅम देण्यात आली आहे. तसेच यामध्ये २.८४ गेगाहर्ट्स कॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८८५ ऑक्टाकोअर फ्लॅगशिप प्रोसेसर, अँड्रॉइड Pie, MIUI 10,  फिंगरप्रिंट सेंसर, ३,३०० एमएएच क्षमतेची बॅटरी, फास्ट चार्जर देण्यात आला आहे. तसेच यात ६.३९ इंचाचा सुपर अॅमोलेड स्क्रिन देण्यात आला कॉर्निंग गोरिला ६ ग्लास देण्यात आले आहे. तसेच यावर अँटी ऑईल आणि अँटी फिंगरप्रिंट प्रोटेक्टिव्ह कोटींगही असेल. या मोबाईलमध्ये ४८ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा देण्यात आला असून १२ मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेराही आहे. तर सेल्फी लव्हर्ससाठी २० मेगा पिक्सेलचा फ्रँट कॅमेराही देण्यात आला आहे.