04 March 2021

News Flash

48MP 3D कॅमेरा असलेला शानदार स्मार्टफोन आज होणार लाँच

48 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि पंचहोल डिस्प्ले असलेला पहिला स्मार्टफोन

ऑनर कंपनीचा 48 मेगापिक्सल 3D कॅमेरा असलेला बहुप्रतिक्षित Honor View 20 हा स्मार्टफोन अखेर आज भारतात लाँच होणार आहे. 48 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असलेला हा भारतातील पहिला फोन असल्याचं सांगितलं जातंय. याशिवाय भारतात लाँच होणारा हा पहिला पंचहोल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन आहे. या फोनच्या डिस्प्लेवर कॉर्नरमध्ये पंचहोलमध्ये फ्रंट कॅमेरा बसवला आहे. सेल्फीसाठी 25 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय.

कंपनीने हा स्मार्टफोन चीनमध्ये डिसेंबर महिन्यात लाँच केला होता. तेव्हापासून या फोनबाबत बरीच चर्चा होती. त्यानंतर या महिन्यात 22 जानेवारी रोजी हा फोन पॅरिसमध्ये लाँच करण्यात आला होता. हा मोबाइल 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅम अशा दोन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध असेल. तसंच मेमरीच्या बाबतीतही 128 जीबी आणि 256 जीबी मेमरी अशाप्रकारचे दोन पर्याय असतील. भारतात या मोबाइलची किंमत 40 ते 50 हजार रुपये इतकी असण्याची शक्यता आहे.

फिचर्सच्या बाबतीत सांगायचं झाल्यास यामध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले असून हायसिलीकॉन किरीन ९८० प्रोसेसर आहे. 4000 mAh क्षमतेची बॅटरी असलेल्या या फोनमध्ये अत्याधुनिक अँड्रॉयड 9 ‘पाय’चा सपोर्ट आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ड्युअल 4G VoLTE, ब्ल्यू-टुथ 5 एलई, वाय-फाय 802.11 एसी, जीपीएस, एनएफसी आणि युएसबी टाइप-सी सपोर्ट, तसंच 3.5 एमएम ऑडिओ जॅक आहे. फोनमध्ये 4,000 mAh पावरची बॅटरी असून फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 10:40 am

Web Title: 48 mp camera honor view 20 set for launching
Next Stories
1 शाओमीला टक्कर देण्यासाठी सॅमसंगचे दोन बजेट स्मार्टफोन लाँच
2 खूशखबर..! सिमकार्डप्रमाणे सेट-अप बॉक्सही पोर्टेबल
3 हलाल इंटरनेट: चांगल्या अनुभवाची हमी देणारं इस्लामिक वेब ब्राउजर
Just Now!
X