News Flash

मुखवास म्हणून खाण्यात येणाऱ्या बडीशेपचे असेही फायदे

बडीशेप खाण्याचे 'हे' फायदे कदाचित तुम्हाला माहित नसतील

अलिकडे अनेक लग्नकार्यामध्ये जेवण झाल्यानंतर मुखवास हा दिला जातो. विशेष म्हणजे या मुखवासातही विविध प्रकार असल्याचं पाहायला मिळतं. बडीशेपचे वेगवेगळे प्रकार, काही पचनक्रिया सुरळीत करणाऱ्या चटपटीत गोळ्या, वाळवलेला आवळा किंवा खास लहान मुलांसाठी चॉकलेट्स हे हमखास पाहायला मिळतं. परंतु, जेवणानंतर बडीशेप खाणं हा नवा ट्रेण्ड नसून पूर्वापार चालत असेली एक पद्धत आहे. जेवण झाल्यानंतर पचनक्रिया सुरळीत रहावी यासाठी बडीशेप खाल्ली जाते. परंतु, केवळ योग्य अन्नपचन व्हावं इतकाच बडीशेपचा फायदा नसून त्याचे शास्त्रात अनेक फायदे दिले आहेत. चला तर मग पाहुयात बडीशेप खाण्याचे काही फायदे.-

१. बडीशेप खाल्ल्यामुळे त्वचेसंबंधीत असलेल्या तक्रारी दूर होतात. त्यामुळे चेहऱ्यावर मुरुम, पुटकुळ्या असतील तर बडीशेपचं नियमित सेवन केल्यास या तक्रारी दूर होतील.

२. रक्तशुद्धी करण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे बडीशेप. बडीशेपमध्ये विशिष्ट प्रकारचे तैलीय घटक असता, त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात.

३. ज्यांना डोळ्यांशी संबंधित कोणती समस्या आहे, अशा व्यक्तींनी दररोज बडीशेप खावी. बडीशेपध्ये व्हिटॅमिन अ, अमिनो अॅसिड आणि अँटीऑक्सिडेंट यांचं प्रमाण मुबलक प्रमाणात आहे. विशेष म्हणजे यामुळे डोळ्यांना त्याचा फायदा होतो.

४. शरीरात उष्णता निर्माण झाल्यास बडीशेपचं पाणी प्यावं. त्यामुळे त्वचेला आणि शरीराला थंडावा मिळतो.

५. अपचन, गॅस झाल्यास बडीशेप चावून खावी त्यामुळे अन्नपचन सुरळीत होतं आणि अॅसिडीटीचा त्रास कमी होतो.

दरम्यान, बडीशेप केवळ मुखवास म्हणून किंवा मसाल्याच्या पदार्थातील घटक म्हणूनच उपयोगी नाही, तर ती शरीरासाठीही तितकीच गुणकारी आहे. बडीशेपमध्ये कॅल्शिअम, सोडिअम, फॉस्फरस, आयर्न आणि पोटॅशिअम मोठ्या प्रमाणावर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 5:06 pm

Web Title: 5 benefits of eating saunf ssj 93
टॅग : Lifestyle News
Next Stories
1 BSNL चा नवीन ‘वर्क फ्रॉम होम’ प्लॅन, 90 दिवस दररोज मिळेल 5GB डेटा
2 गॅस सिलेंडर वापरताना ‘ही’ घ्या दक्षता
3 निती आयोगाच्या सीईओंनी केली Zoom आणि JioMeet ची तुलना , म्हणाले…
Just Now!
X