पोटाचा वाढता घेर ही सध्या अनेकांपुढील मोठी समस्या झाली आहे. ऑफिसमध्ये एकाच जागेवर बसून काम करावे लागत असल्यामुळे सध्या महिला आणि पुरुष अनेकांचा पोटाचा घेर वाढताना दिसतो. आता वाढलेली चरबी कमी करण्यासाठी काय उपाय करावा असा प्रश्न या लोकांपुढे असतो. मग कधी व्यायाम करुन तर कधी आहारातील बदलांनी हे साध्य होते. अंडी हे प्रोटीनचे उत्तम माध्यम असल्याने लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी अंडे खावे असे आहारतज्ज्ञ तसेच डॉक्टरांकडून सांगितले जाते. पण हेच अंडे पोटाचा घेर कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असते असे कोणी सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. अंड्याचे वेगवेगळे पदार्थ पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यास उपयुक्त ठरतात. अंड्यामध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात. तसेच ते खाल्ल्यावर दिर्घकाळ पोट भरलेले राहते त्यामुळे लवकर भूक लागत नाही. त्यात आयर्न, पोटॅशियम, व्हीटॅमिन्स याचेही प्रमाण जास्त असल्याने अंडे आरोग्यासाठी चांगले असते.

१. अंड़ा बुर्जी – अंड्याची भुर्जी हा अतिशय पटकन होणारा आणि सोपा पदार्थ आहे. भाजीला पर्याय असणाऱ्या अंडा बुर्जीमधून आरोग्याला उपयुक्त असे अनेक घटक मिळतात. अतिशय कमी कष्टात होणारी ही बुर्जी तुम्ही नाष्ता किंवा जेवण अशा कोणत्याही वेळेला खाऊ शकता.

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

२. ऑम्लेट – ऑम्लेट ही अंड्यापासून बनवली जाणारी सर्वात प्रसिद्ध अशी रेसिपी आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे ऑम्लेट बनवू शकता. यामध्ये कधी कांदा, टोमॅटो, मिरची असे सगळे घालून तर कधी हाफ फ्राय हा उत्तम पर्याय आहे. नाष्ता करणे उत्तम आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते.

३. अंडी आणि मटार किंवा इतर भाज्यांचे दाणे – मटार किंवा तत्सम गोष्टींमध्ये अंडे एकत्र केल्यास तेही आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. भाज्यांच्या दाण्यांमधूनही प्रोटीन्स मिळते. त्यामुळे हे एकत्र खाल्ल्याने पोट चांगल्या पद्धतीने भरलेले राहते.

४. कडधान्यासोबत अंडे – वजन कमी करण्यासाठी कडधान्ये हा उत्तम पर्याय आहे. कडधान्यातून आरोग्याला अनेक पोषक घटक मिळतात. त्यामुळे अंडे आणि कडधान्ये हा एकत्रितपणे अतिशय उत्तम आहार आहे.