आयटीआर फाइल करताना प्राप्तिकर विभागाकडे सर्व उत्पन्ने सादर करणे आवश्यक असते. या उत्पन्नांमध्ये ठेवींवर आणि बचतींवर मिळवलेले व्याज, गुंतवणुकींमधून मिळवलेले भांडवली लाभ व तोटे इ. समाविष्ट असतात. आपल्या सर्व करपात्र उत्पन्नांची माहिती देणे आवश्यक असते हे करदात्यांना माहिती असते, पण स्रोताच्या ठिकाणी कापलेल्या करापलिकडे (टीडीएस) असणाऱ्या उत्पन्नाची माहिती देणे त्यांच्याकडून राहून जाते. कोणत्याही उत्पन्नाची माहिती देण्याचे राहून जाऊ नये, यासाठी आयटीआर फाइल करताना लक्षात ठेवावयाची ही काही उत्पन्ने आहेत.

नियत ठेवींवरील (एफडी) व्याज

एफडी आणि आरडीवरील एका आर्थिक वर्षातील १० हजार रुपयांहून जास्त असणाऱ्या व्याजावर टीडीएस वजावट लागू होते. हे उत्पन्न करपात्र उत्पन्नाच्या मोजणीत समाविष्ट होते. मग त्या व्याज उत्पन्नातून टीडीएस वजा झालेला असो अथवा नसो. तुम्ही बँकेने दिलेल्या फॉर्म १६ ए चा किंवा फॉर्म २६ एएसचा वापर करून टीडीएसची रक्कम नक्की करू शकता. आयटीआर फाइल करताना तुम्हाला हे व्याज उत्पन्न चुकवायचे नसते. हे सहज राहून जाते, विशेषत: जेव्हा एफडी बँक लॉकरसाठी ठेवलेली असते. व्याज थेट लॉकरच्या भाड्यातून डेबिट होत असते.

बचत खात्यावरील व्याज

बचत खाती द.सा. ३ टक्के ते ७ टक्के व्याज उत्पन्न देऊ करतात. बचत खात्यांवर १० हजार रुपयांपर्यंत कमावलेले व्याज कलम ८० (टीटीए) वजावटीसाठी पात्र असते. या उत्पन्नावर टीडीएस लागू होत नाही पण आयटीआर फाइल करताना त्याची माहिती द्यावी लागते. तुम्ही अशाप्रकारचे उत्पन्न ‘इतर स्रोतांमधून उत्पन्न’ या प्रवर्गामध्ये समाविष्ट करू शकता आणि कलम ८० (टीटीए) अंतर्गत वजावटीचा दावा करू शकता.

एनएससी गुंतवणुकीवरील व्याज

नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट्सवरील व्याज करपात्र असते आणि आयटीआर फाइल करताना उत्पन्न म्हणून दाखवणे गरजेचे असते. दरवर्षी कमावलेले व्याज परत गुंतवले जाते, जे कलम ८० (क) अंतर्गत एका आर्थिक वर्षात १.५ लाखापर्यंत वजावटीसाठी पात्र असते. पाचव्या वर्षी, संचयित व्याज पुन्हा गुंतवले जात नाही. म्हणून, अखेरच्या आर्थिक वर्षात कमावलेले व्याज कलम ८०(क) अंतर्गत वजावटीसाठी पात्र ठरत नाही आणि लागू स्तराच्या दरानुसार कर वजावटीच्या अधीन असते.

प्रलंबित टीडीएस परताव्यावरील व्याज

जर प्राप्तिकर विभागाने तुम्ही दावा केलेला कर परतावा पुरवण्यास उशीर केला, तर तुम्ही विहित दरानुसार परताव्याच्या रकमेवर व्याज मिळवण्यास पात्र असता. ही व्याजाची रक्कम तुम्हाला ती मिळालेल्या आर्थिक वर्षातील उत्पन्न म्हणून गणली जाते. म्हणूनच, आयटीआर भरताना तिची माहिती द्यायला हवी.

पीपीएफ गुंतवणुकीवरील व्याज

पीपीएफ गुंतवणुकीवर कमावलेले व्याज करामधून माफ केले जाते. परंतु, आयटीआर भरताना करमाफी असणाऱ्या उत्पन्नाच्या विभागात हे उत्पन्न दाखवणे आवश्यक असते. आयटीआर भरताना हे करमाफी असणारे उत्पन्न दाखवल्याने भविष्यात तुमचे एकूण उत्पन्न प्रस्थापित करण्यास मदत होते.

चुकवू नये अशी इतर व्याज उत्पन्ने

उपरोक्त व्याज उत्पन्नांखेरीज, तुम्ही टपाल खात्याच्या आरडी आणि एफडीवर कमावलेल्या व्याजांची माहिती द्यायला हवी. या उत्पन्नांवर टीडीएस लागू होत नाही. माहिती द्यावयाच्या इतर उत्पन्नांत वीज विभागाकडे दिलेल्या ठेवींवरील व्याज, बाँड इशुमधील गुंतवणुकीवरील व्याज, इ. चा समावेश होतो. परंतु, ही उत्पन्ने आयटीआर भरताना योग्य त्या शीर्षकांखाली भराल याची खात्री करा.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार