तुम्ही कमवण्यास सुरुवात करता, तेव्हा इतर कोणासाठी तरी काम करावे की स्वत:चे काहीतरी सुरु करावे हा गोंधळ सतत मनात होत राहतो. याबरोबरच खूप मेहनत घेऊन भरपूर पैसे कमावण्याचे विचारही मनात येत राहतात. पण जर तुम्ही या सगळ्या खडतर प्रवासातून गेलेला नसाल, तरी तुम्ही हुशारीने काही पावले उचलून श्रीमंत होऊ शकता. सगळ्यांची आर्थिक स्थिती वेगवेगळी असल्यामुळे सगळ्यांना लागू होणारे असे ठराविक नियम किंवा सूत्रे नसली, तरी सर्वांना उपयोगी पडतील अशा काही स्मार्ट सूचनांकडे आपण नजर टाकू शकतो.

तुमच्या जोखमी कमी करा 

सर्व वेतनदार व्यक्तींनी संपत्ती निर्मितीसाठी पाळायचे पहिले सूत्र म्हणजे जोखीम कमी करणारी पावले उचलावीत. वेतनदार व्यक्तींचे निश्चित मासिक उत्पन्न असल्यामुळे, त्यांच्यावर अनपेक्षितपणे आर्थिक आपत्तीच्या परिस्थिती उद्भवू शकतात, जसे की नोकरी जाणे, आजारी पडणे आणि कर्जाचा भार येणे. म्हणूनच, एक नियम म्हणून, एकदा तुम्ही कमवायला सुरुवात केलीत, की तुम्ही कितीही तरुण असलात आणि तुमचे उत्पन्न कितीही कमी असले, तरी तुम्ही जोखमी करायला सुरुवात करायला हवीत. वैद्यकीय कारणांमुळे उद्भवू शकणाऱ्या जोखमी कमी करण्यासाठी तुम्ही आरोग्य विमा खरेदी करण्यासारखी योग्य ती आर्थिक पावले उचलू शकता. आर्थिक अनिश्चिततेदरम्यान पैशाची चणचण भासू नये यासाठी तुम्ही तुमचे पैसे रिकरिंग डिपॉझिटमध्ये जमा करू शकता.

स्वत:साठी काही ध्येय निश्चित करा 

श्रीमंत होणे हे तुमचे ध्येय ठेवा आणि दरमहा त्या दिशेने काम करा. पैशाची ध्येय तीन प्रकारची असू शकतात – लघुकालीन ध्येय, मध्यमकालीन ध्येय आणि दीर्घकालीन ध्येय. ध्येय ठरवल्याने तुम्हाला योग्य ती गुंतवणुकीची साधने निवडता येतात आणि त्या साधनासाठी आवश्यक तेवढा पैसा बाजूला काढता येतो. जर तुमच्या करिअरची ही सुरुवात असेल, तर घर खरेदी करण्यासारखे दीर्घकालीन ध्येय तुम्हाला एक कठीण आव्हान वाटू शकते. पण तुमचे उत्पन्न किंवा बचतीची क्षमता कितीही असली तरी, तुमच्या ध्येयाच्या दिशेने बचत आणि गुंतवणूक करत राहा, एका वेळी एकेक पाऊल उचलत राहा. कालौघात तुमचे उत्पन्न जसजसे वाढत जाईल, तसतसे तुम्ही अधिकाधिक वेगाने तुमच्या ध्येयाच्या दिशेने पुढे जात राहाल.

तुमच्या खर्चांचे व्यवस्थापन करा

संपत्ती निर्मितीसाठी पैसे कमावत असताना काटकसर करणे हे आणखी एक पाऊल तुम्ही उचलू शकता. तुमच्या आयुष्यात आवश्यक त्याच वस्तू खरेदी करा आणि बाहेर खाणे किंवा खरेदी करणे असे हौशीचे खर्च कमी करा. विशेषत: बाहेर खाण्यासारख्या हौशी खर्चांसाठी पैसे उसने घेणे कमी करा. टाळता येण्याजोगे खर्च कमी करा – उदाहरणार्थ अनेकांऐवजी एकाच सिनेमाचे स्ट्रीमिंग करण्यासाठीचे सबस्क्रिप्शन. खर्चाला सुरुवात करण्यापूर्वी महिन्याच्या सुरुवातीलाच बचतीचे पैसे काढून ठेवा. खर्चाचे अनुमान काढून ठेवल्याने हुशारीने खर्चांचा प्राधान्यक्रम ठरवण्यास मदत होते.

लवकर सुरुवात करा आणि चक्रवाढीचा लाभ घ्या

संपत्ती निर्मिती ही मंदगतीने होणारी दीर्घकालीन प्रक्रिया आहे, जिच्यासाठी संयमाची गरज असते. तुम्ही आयुष्यात लवकर सुरुवात करायला हवी ज्यामुळे तुमच्या गुंतवणुकीपासून तुम्ही आयुष्यात पुढे लाभ मिळवू शकता. तुमच्या करिअरच्या सुरुवातीला केलेल्या छोट्या गुंतवणुकीमध्ये चक्रवाढीच्या प्रभावामुळे पुढे दीर्घ कालांतराने तुम्हाला खूप मोठा धनसंचय मिळवून देण्याची क्षमता असते. सर्वोत्तम परिणामांसाठी, तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक करायला हवीत आणि पैसे काढून घेण्याचा मोह टाळायला हवा. तसेच, नियमितपणे तुमच्या गुंतवणुकीचा आढावा घेत जा आणि उत्पन्नात वाढ झाली तिच्यामध्ये वाढ करत राहा.

तुमच्या करांचे आणि गुंतवणुकीचे सक्रीयपणे व्यवस्थापन करा

जर तुम्ही तुमच्या करांचे सक्रीयपणे आणि हुशारीने व्यवस्थापन केलेत, तर तुम्ही तुमचे कितीतरी उत्पन्न वाचवू शकता. तुमच्या ध्येयासाठी योग्य गुंतवणुकीचे पर्याय निवडा, आणि तुम्हाला लागू होणारे सर्व करलाभ मिळवा. तसेच कर-कार्यक्षम असणाऱ्या गुंतवणुका निवडा, कारण तुमच्या मिळकतीवरही भरपूर कर आकारलेला तुम्हाला नको असतो.

आदिल शेट्टी,

सीईओ, बँकबझार