News Flash

5000mAh बॅटरी + 64MP कॅमेरा, Samsung Galaxy A32 4G भारतात झाला लाँच

आला Samsung चा शानदार स्मार्टफोन Galaxy A32 4G

Samsung कंपनीने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Galaxy A32 4G लाँच केला आहे. हा फोन 5 मार्च रोजी लाँच होणार होता, पण त्याआधीच कंपनीने हा फोन अधिकृत भारतीय वेबसाइटवर उपलब्ध केला आहे.

Galaxy A32 4G स्पेसिफिकेशन्स :-
Galaxy A32 स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर AMOLED डिस्प्ले असून वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच देखील आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये हा फोन उपलब्ध असेल. माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवता येणंही शक्य आहे.  भारतात या फोनला ऑक्टा-कोर प्रोसेसरचा सपोर्ट आहे, तर रशियात मात्र या फोनसाठी मीडियाटेक हेलियो जी80 प्रोसेसरचा सपोर्ट आहे. याशिवाय फोनमध्ये ड्युअल-सिम कार्ड आणि 3.5mm ऑडिओ जॅकचा सपोर्टही मिळेल. मात्र, कोणत्या अँड्रॉइड व्हर्जनवर हा फोन कार्यरत असतो याची माहिती अद्याप मिळालेली नाही. Galaxy A32 4G मध्ये क्वॉड-रिअर कॅमेरा सेटअप अर्थात फोनच्या मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यातील मुख्य लेन्स 64 मेगापिक्सेल, दुसरी 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड लेन्स , तिसरी 5 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आणि चौथी 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर लेन्स आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळेल. तर, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G, ब्लूटूथ व्ही5.0, ड्युअल-बँड वाय-फाय, स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर आणि एनएफसी सपोर्ट आहे. तसेच, 15W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट 5000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरीही यात आहे. दमदार बॅटरीमुळे हा फोन 20 तासांचा व्हिडिओ प्ले-बॅक टाइम बॅकअप देतो असा कंपनीचा दावा आहे.

Galaxy A32 4G किंमत :-
21 हजार 999 रुपये इतकी Galaxy A32 4G ची किंमत ठेवण्यात आली आहे. मात्र अद्याप हा फोन विक्रीसाठी उपलब्ध झालेला नाही. ऑसम व्हॉयलेट, ऑसम ब्लॅक, ऑसम ब्लू आणि ऑसम व्हाइट अशा चार रंगांच्या पर्यायात खरेदी करता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 1:23 pm

Web Title: 5000mah battery samsung galaxy a32 with quad rear camera launched in india check price and specifications sas 89
Next Stories
1 सौंदर्यभान : अकाली केस पांढरे
2 ‘करण-अर्जुन’ स्टाइलमध्ये Ford ने जारी केलं टीझर पोस्टर, येतेय नवीन Ford Ecosport
3 Good News! भारतात High Speed इंटरनेट सेवा देणार एलन मस्कची कंपनी Starlink, प्री-बूकिंगसह रजिस्ट्रेशन झालं सुरू
Just Now!
X