01 October 2020

News Flash

टोमॅटो खाण्याचे ६ गुणकारी फायदे

वजन कमी करण्यासाठी टोमॅटो आहे गुणकारी

कच्च्या खाल्ल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये काकडी, टोमॅटो, गाजर,मुळा यांचा आणि अन्य काही भाज्यांचा समावेश होतो. परंतु, यात अनेकदा टोमॅटोला सर्वाधिक पसंती मिळते. टोमॅटोपासून सूप, सार, भाजी असे विविध पदार्थ करतात येतात. त्यामुळे बाजारात गेल्यावर अनेकदा लालबुंद, चमकदार टोमॅटो अनेकांचं लक्ष वेधून घेतात. भाजी, आमटी यांची चव वाढविणाऱ्या टोमॅटोमध्ये अनेक फायदे आहेत. त्यामुळे टोमॅटो शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. चला तर मग पाहुयात टोमॅटो खाण्याचे फायदे.-

टोमॅटो खाण्याचे फायदे –

१. टोमॅटोमध्ये उष्मांकाचे प्रमाण तसेच कर्बोदकांचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, मधुमेह या आजारांमध्ये टोमॅटोचं सेवन गुणकारी ठरतं

२. वजन कमी करायचे असल्यास आहारात रोज टोमॅटोचा समावेश करावा. टोमॅटो खाल्ल्याने पोट भरल्याची भावना निर्माण होते व त्यामध्ये कमी उष्मांक असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
३. टोमॅटोमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने रातआंधळेपणा, दृष्टिदोष या विकारांवर टोमॅटो उपयुक्त आहे

४.रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया) असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे रोज २ टोमॅटो खावेत. यामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत होण्यास मदत होते.

५. यकृताचे विकार असल्यास टोमॅटो खावा.

६. मलावरोधाची तक्रार असणाऱ्यांनी टोमॅटोचे सेवन नियमितपणे करावे.

या व्यक्तींनी करु नये टोमॅटोचं सेवन

१.मूतखडा

२. संधिवात

३.आमवात व आम्लपित्त

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 4:40 pm

Web Title: 6 interesting benefits of tomato ssj 93
Next Stories
1 जाणून घ्या, शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे
2 लहान बाळांना ORS चं पाणी देताय? मग जाणून घ्या ही माहिती
3 Jawa BS6 आणि Jawa Forty Two BS6 च्या डिलिव्हरीला सुरूवात, पहिल्या तीन EMI वर 50% डिस्काउंट
Just Now!
X