News Flash

धक्कादायक ! अजूनही ६२ टक्के तरुणी मासिक पाळीत वापरतात कापड

महिलांमध्ये जागृती गरजेची

‘पॅडमॅन’ या अक्षयकुमारच्या जागृतीपर चित्रपटाची एकीकडे जोरदार चर्चा सुरु असताना दुसरीकडे मात्र देशातील स्त्रियांची मासिक पाळीदरम्यानची उदासिनता एका अहवालातून नुकतीच समोर आली आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणांतर्गत नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार देशातील १५ ते २४ वयोगटातील तरुणींपैकी ६२ टक्के तरुणी आपल्या मासिक पाळीत पॅडचा वापर न करता कापडाचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.

या अहवालानुसार बिहारमध्ये २०१५ -१६ या वर्षात ८२ टक्के तरुणी मासिक पाळीतील संरक्षणासाठी कापडाचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे. छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशमध्येही ही स्थिती कमी-जास्त फरकाने अशीच आहे असे या अहवालात म्हटले आहे. ग्रामीण भागातील अनेक तरुणी आणि महिला आजही मासिक पाळीत आरोग्यदायी पद्धतींचा वापर करत नसल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागातील एकूण महिलांपैकी केवळ ४८ महिला सॅनिटरी नॅपकीन वापरतात. तर शहरी भागात ७८ टक्के महिला सॅनिटरी नॅपकीनचा वापर करतात. देशात एकूण महिलांपैकी ४२ टक्के महिला नॅपकीन वापरत असतील तर त्यातील १६ टक्के स्थानिक स्तरावर तयार केलेले नॅपकीन वापरतात.

त्यामुळे महिलांमध्ये स्वत:च्या आरोग्याबाबत पुरेशी जागरुकता नसल्याचे समोर आले आहे. या परिस्थितीमागे अज्ञान आणि आर्थिक परिस्थिती ही मुख्ये कारणे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र अशी स्थिती असताना काही राज्यांमध्ये मात्र आशादायक चित्र असल्याचीही नोंद या अहवालात करण्यात आली आहे. त्यानुसार, मिझोराममध्ये ९३ टक्के, तमिळनाडूमध्ये ९१ टक्के, केरळमध्ये ९० टक्के, गोवामध्ये ८९ टक्के आणि सिक्कीममध्ये ८५ टक्के महिला मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकीनचा वापर करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 1:02 pm

Web Title: 62 percent young women in country using cloth for menstrual protection report of nfhs
Next Stories
1 एअरटेल देणार ३९९ रुपयांत ८४ दिवस १ जीबी डेटा
2 …म्हणून लसूण खाणे आरोग्यासाठी फायदेशीर
3 या वर्षात ‘iPhone X’ ची विक्री होणार बंद?
Just Now!
X