News Flash

64MP कॅमेरा + 5,020 mAh बॅटरी ; 20 हजारांपेक्षा कमी किंमतीच्या दमदार स्मार्टफोनचा ‘फ्लॅश-सेल’

फिंगरप्रिंट सेन्सरसोबत 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही...

‘शाओमी’ कंपनीचा ‘रेडमी नोट 9 प्रो मॅक्स’ हा शानदार स्मार्टफोन पुन्हा एकदा भारतात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. तब्बल 64 मेगापिक्सेल क्षमतेचा मुख्य कॅमेरा असलेल्या या फोनमध्ये 5,020 mAh  क्षमतेची दमदार बॅटरी आहे. Redmi Note 9 Pro Max च्या विक्रीसाठी आज (दि. 2) दुपारी 12 वाजेपासून अ‍ॅमेझॉन आणि mi.com या संकेतस्थळांवर ‘फ्लॅश सेल’चं आयोजन करण्यात आलं आहे. अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये एअरटेलच्या ग्राहकांना डबल डेटा बेनिफिटची ऑफर आहे. 298 आणि 398 रुपयांच्या प्लॅनवर ही ऑफर मिळेल.

रेडमी नोट 9 प्रो मॅक्स स्पेसिफिकेशन्स :

भारतात रेडमी नोट 9 प्रो मॅक्स हा फोन मार्चमध्ये लाँच करण्यात आला असून 16,499 रुपये इतकी या फोनची बेसिक किंमत आहे. रेडमी नोट 9 प्रो मॅक्समध्ये 64 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. याशिवाय फोनमध्ये 5,020 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ऑरोरा ब्लू, ग्लेशियर व्हाइट आणि इंटरस्टेलर ब्लॅक अशा तीन कलरमध्ये हा फोन उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात NavIC सपोर्ट आहे. NavIC हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(ISRO)विकसीत केलेले तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे जीपीएससाठी ‘मेड इन इंडिया’ पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. जीपीएसच्या तुलनेत NavIC अत्यंत अचूक माहिती देईल, असा ISRO चा दावा आहे. ड्युअल सिम सपोर्ट असलेल्या रेडमी नोट 9 प्रो मॅक्समध्ये 6.67 इंच फुल एचडी+ (1080×2400 पिक्सल) आयपीएस डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720 प्रोसेसर आणि 8 जीबी रॅम असून फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. तर मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप असून यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर, 8 मेगापिक्सल सेकंडरी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सल मॅक्रो शूटर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसरचे अन्य तीन कॅमेरे आहेत. एमआययूआय 11 सोबत अँड्रॉइड 10 वर कार्यरत असलेल्या रेडमी नोट 9 प्रो मॅक्समध्ये फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आले आहे. याशिवाय फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5020mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 4जी व्हीओएलटीई, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, इन्फ्रारेड, 3.5 एमएम ऑडियो जॅक आणि युएसबी टाइप-सी यांसारखे अन्य फीचर्स आहेत.

रेडमी नोट 9 प्रो मॅक्स किंमत :-

रेडमी नोट 9 प्रो मॅक्स 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये, 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 19,999 रुपये झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 11:01 am

Web Title: 64 megapixel main camera 5020mah battery redmi note 9 pro max goes on sale check price specifications sas 89
Next Stories
1 किंमत 10 हजार 499 रुपये ; 4GB रॅमसह 48MP क्वॉड कॅमेरा सेटअप + 5000mAh बॅटरी, ‘बजेट’ स्मार्टफोनचा ‘सेल’
2 लवकरच फक्त अर्ध्या तासात सामान पोहोचवणार Amazon, कंपनीला मिळाला ‘ग्रीन सिग्नल’
3 काय सांगता…ऑफिसमध्ये फक्त झोपा काढण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी देणार एक लाख रुपये पगार!
Just Now!
X